Close Menu
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
What's Hot

संगमनेर तालुक्यातील तीन जिल्हा परिषद शाळांसाठी ६२ लाखांचा निधी मंजूर; नवीन वर्गखोल्यांचे होणार बांधकाम

12/09/2026

धांदरफळ खुर्द सबस्टेशनवर शेतकऱ्यांचा धडक आक्रोश मोर्चा; अनियमित वीजपुरवठ्यामुळे महावितरणविरोधात संताप, ८ दिवसांत प्रश्न न सुटल्यास तीव्र आंदोलनाचा इशारा

12/09/2026

गणेशोत्सवात कोकणासाठी बसेस वळविल्याने ग्रामीण महाराष्ट्राचे हाल; संगमनेरमध्ये तीव्र असंतोष ग्रामीण भागातील एसटी फेऱ्या रद्द झाल्यास आगारप्रमुखांच्या कार्यालयाला टाळे ठोकू; काँग्रेस कार्याध्यक्ष अमोल शेलकर यांचा परिवहन विभागाला इशारा

12/09/2026
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
Home » नाशिक-पुणे महामार्गावर दरोड्याचा कट उधळला; पोलिसांकडून केरळच्या टोळीला अटक
गुन्हेगारी

नाशिक-पुणे महामार्गावर दरोड्याचा कट उधळला; पोलिसांकडून केरळच्या टोळीला अटक

पोलिसांची चाहूल लागताच हॉटेलच्या खोलीत असलेल्या सात जणांमध्ये एकच खळबळ उडाली. अटकेच्या भीतीने दोन संशयितांनी गच्चीच्या दिशेने धाव घेत पळण्याचा प्रयत्न केला. मात्र,
Annant PpangarkarBy Annant Ppangarkar19/02/2026No Comments2 Mins Read
Facebook Twitter WhatsApp
Share
Facebook Twitter Email Telegram WhatsApp

सिन्नर:
नाशिक-पुणे महामार्गावरील मनेगाव शिवारामध्ये दरोडा टाकण्याच्या तयारीत असलेल्या एका आंतरराज्य टोळीचा सिन्नर पोलिसांनी पर्दाफाश केला आहे. मंगळवारी (१७ फेब्रुवारी) मध्यरात्री करण्यात आलेल्या या धाडसी कारवाईत केरळ राज्यातील दहा संशयितांना ताब्यात घेण्यात आले असून त्यांच्याकडून मोठ्या प्रमाणावर शस्त्रास्त्रे जप्त करण्यात आली आहेत. या कारवाईमुळे महामार्गावर सक्रिय असलेल्या एका मोठ्या गुन्हेगारी टोळीचे धाबे दणाणले आहेत.
पोलिसांना मंगळवारी रात्री अकराच्या सुमारास मनेगाव शिवारातील ‘सिन्नर गेस्ट हाऊस’ या हॉटेलमध्ये काही संशयास्पद हालचाली होत असल्याची माहिती मिळाली होती. या माहितीचे गांभीर्य ओळखून पोलीस निरीक्षक हेमंतकुमार भामरे यांच्या नेतृत्वाखाली हवालदार समाधान बोराडे, नितीन डावखर, कृष्णा कोकाटे आणि गुन्हे अन्वेषण विभागाच्या पथकाने हॉटेलवर छापा टाकला.
पोलिसांनी अत्यंत सावधगिरीने परिसराची पाहणी केली असता, हॉटेलबाहेर उभ्या असलेल्या वाहनांमध्ये तीन संशयित बसलेले आढळले. पोलिसांनी सर्वप्रथम या तिघांना ताब्यात घेतले आणि त्यानंतर हॉटेलमधील खोलीकडे आपला मोर्चा वळवला.
पोलिसांची चाहूल लागताच हॉटेलच्या खोलीत असलेल्या सात जणांमध्ये एकच खळबळ उडाली. अटकेच्या भीतीने दोन संशयितांनी गच्चीच्या दिशेने धाव घेत पळण्याचा प्रयत्न केला. मात्र, पोलिसांनी पाठलाग करून त्यातील एकाला पकडण्यात यश मिळवले, तर दुसरा संशयित अंधाराचा फायदा घेऊन पसार झाला. उर्वरित सहा जणांना हॉटेलच्या खोलीतूनच पोलिसांनी बेड्या ठोकल्या. या संपूर्ण कारवाईत एकूण अकरापैकी दहा संशयित पोलिसांच्या जाळ्यात अडकले असून एका फरार आरोपीचा शोध पोलीस युद्धपातळीवर घेत आहेत.
या घटनेची माहिती मिळताच पोलीस उपअधीक्षक के. के. पाटील यांनी सिन्नर पोलीस ठाण्यात धाव घेत तपासाची चक्रे फिरवली. पकडण्यात आलेले सर्व आरोपी केरळ राज्यातील असून, त्यांच्याकडे असलेली शस्त्रास्त्रे आणि वाहने पोलिसांनी जप्त केली आहेत.
ही टोळी नाशिक जिल्ह्यात कोणत्या मोठ्या दरोड्याच्या उद्देशाने आली होती, तसेच त्यांचे स्थानिक कनेक्शन काय आहे, याबाबतची कसून चौकशी रात्री उशिरापर्यंत सुरू होती. या प्रकरणी सिन्नर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून फरार आरोपीच्या अटकेसाठी पथके रवाना करण्यात आली आहेत.

anantpangarkar
Annant Ppangarkar

Post Views: 1,198
गुन्हेगारी टोळी
Share. Facebook Twitter Pinterest WhatsApp
Annant Ppangarkar
  • Website

Related Posts

समृद्धी महामार्गावर चाकूचा धाक दाखवून दरोडा टाकणाऱ्या सराईत टोळीचा पर्दाफाश; स्थानिक गुन्हे शाखेकडून चार आरोपींना अटक, एक लाख दोन हजारांचा मुद्देमाल जप्त

12/09/2026

चार अवैध कत्तलखान्यांवर एलसीबीचे छापे, १०५० किलो गोमांसासह ९ जनावरांची सुटका

12/09/2026

बेकायदेशीर भंगार दुकानांवर पोलिसांचा छापा; विनापरवाना वाहने तोडणाऱ्या दोघांना अटक, लाखो रुपयांचा मुद्देमाल जप्त

12/09/2026
Leave A Reply Cancel Reply

Document
Our Picks
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
Advertisement 1 Advertisement 2 Advertisement 3 Advertisement 4
Don't Miss
शिक्षण

संगमनेर तालुक्यातील तीन जिल्हा परिषद शाळांसाठी ६२ लाखांचा निधी मंजूर; नवीन वर्गखोल्यांचे होणार बांधकाम

By Annant Ppangarkar12/09/20260

Annant Ppangarkar महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन – समग्र शिक्षा योजना सन २०२६-२७ अंतर्गत संगमनेर विधानसभा…

धांदरफळ खुर्द सबस्टेशनवर शेतकऱ्यांचा धडक आक्रोश मोर्चा; अनियमित वीजपुरवठ्यामुळे महावितरणविरोधात संताप, ८ दिवसांत प्रश्न न सुटल्यास तीव्र आंदोलनाचा इशारा

12/09/2026

गणेशोत्सवात कोकणासाठी बसेस वळविल्याने ग्रामीण महाराष्ट्राचे हाल; संगमनेरमध्ये तीव्र असंतोष ग्रामीण भागातील एसटी फेऱ्या रद्द झाल्यास आगारप्रमुखांच्या कार्यालयाला टाळे ठोकू; काँग्रेस कार्याध्यक्ष अमोल शेलकर यांचा परिवहन विभागाला इशारा

12/09/2026

शांतता समितीचा प्रशासनाला विसर; ‘ठाकरे’ शिवसेनेचा थेट हल्लाबोल, शहरप्रमुख अमित चव्हाणांनी वेधले लक्ष!

12/09/2026
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow

तुमचे हक्काचे व्यासपीठ

Facebook YouTube
Our Picks
September 2026
M T W T F S S
 123456
78910111213
14151617181920
21222324252627
282930  
« Aug    
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • पत्रकारिता
  • फोटो / गॅलरी
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
  • शेती व सहकार
  • सामाजिक
  • CONTACT US
  • ABOUT US
  • PRIVACY POLICY
© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.