Close Menu
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
What's Hot

‘ये पब्लिक है, सब जानती है!’ — निळवंडेच्या पाण्याचे श्रेय लाटणाऱ्याना संगमनेरची जनता निवडणुकीत देणार सडेतोड उत्तर; अमोल शेलकर यांचा घणाघात

14/10/2026

सरकारी जमिनीवर अतिक्रमण! प्रशासनाचा डोळेझाक कारभार; अधिकाऱ्यांना सरकारी मालमत्ता सांभाळता येईना

14/10/2026

मतचोरी अन् ‘SIR’च्या घोटाळ्याविरोधात संगमनेरमध्ये उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेसह समविचारी पक्षांचा घणाघात; माजी खासदार खैरे, जिल्हाप्रमुख कोते पाटलांच्या नेतृत्वात रस्ता रोको करत निवडणूक आयोगाचा तीव्र निषेध

14/10/2026
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
Home » कवी अनंत फंदी नाट्यगृहात लवकरच नाटकांची नांदी; ज्येष्ठ अभिनेते प्रशांत दामले यांनी केली पाहणी
महाराष्ट्र संवाद विशेष

कवी अनंत फंदी नाट्यगृहात लवकरच नाटकांची नांदी; ज्येष्ठ अभिनेते प्रशांत दामले यांनी केली पाहणी

प्रशांत दामले यांनी आमदार सत्यजित तांबे यांना राज्यात नाट्यगृहांची संख्या वाढवण्यासाठी सरकारकडे पाठपुरावा करण्याची विनंती केली, जेणेकरून मराठी कला आणि कलाकार यांना अधिक वाव मिळेल
Annant PpangarkarBy Annant Ppangarkar20/02/2026No Comments2 Mins Read
Facebook Twitter WhatsApp
Share
Facebook Twitter Email Telegram WhatsApp

संगमनेर, प्रतिनिधी – 

संगमनेर शहराच्या सांस्कृतिक वैभवात भर घालणाऱ्या कवी अनंत फंदी खुल्या नाट्यगृहाचे काम आता अंतिम टप्प्यात आले असून, लवकरच याठिकाणी मराठी नाटकांचे प्रयोग सुरू होणार आहेत.

ज्येष्ठ मराठी अभिनेते प्रशांत दामले यांनी नुकतीच आमदार सत्यजित तांबे यांच्या समवेत या नाट्यगृहाची पाहणी केली. संगमनेरची समृद्ध सांस्कृतिक परंपरा आणि माजी महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांनी दिलेले प्रोत्साहन यामुळे या शहरात नाटक सादर करण्याची आपली अनेक दिवसांची इच्छा आता लवकरच पूर्ण होणार असल्याचे दामले यांनी यावेळी आवर्जून नमूद केले.

नाट्यगृहाच्या भेटीदरम्यान प्रशांत दामले यांनी संपूर्ण वास्तूची बारकाईने पाहणी केली आणि अद्ययावत सुविधांबाबत काही महत्त्वपूर्ण सूचनाही केल्या. प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना ते म्हणाले की, संगमनेर हे राज्यातील एक प्रगत आणि सुसंस्कृत शहर आहे. येथील नाट्यगृह पुढील काही महिन्यांतच कलाकार आणि प्रेक्षकांसाठी खुले होईल. केवळ शासनावर अवलंबून न राहता सार्वजनिक मालमत्तेचे जतन करणे ही नागरिकांची नैतिक जबाबदारी असल्याचे सांगत, त्यांनी नाट्यगृहांची स्वच्छता आणि पावित्र्य राखण्याचे आवाहन केले. तसेच, उन्हाळी सुट्ट्यांमध्ये नगर परिषदेने याठिकाणी ‘नाट्यवाचन’ चळवळ सुरू करावी, जेणेकरून स्थानिक पातळीवर नवीन कलाकार घडण्यास मदत होईल, अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली.

या प्रसंगी आमदार सत्यजित तांबे यांनी प्रशांत दामले यांच्या मार्गदर्शनाचे स्वागत केले. बाळासाहेब थोरात, डॉ. सुधीर तांबे आणि माजी नगराध्यक्षा दुर्गाताई तांबे, नगराध्यक्ष डॉ. मैथिली तांबे यांच्या मार्गदर्शनाखाली या नाट्यगृहाचे काम प्रगतीपथावर असल्याचे त्यांनी सांगितले. तालुक्यातील कलाकार आणि रसिक प्रेक्षकांच्या सूचनांचा विचार करूनच या वास्तूची उभारणी होत असून, प्रशांत दामले यांच्या लोकप्रिय विनोदी नाटकांचे प्रयोग या रंगमंचावर लवकरच पाहता येतील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

प्रशांत दामले यांनी आमदार सत्यजित तांबे यांना राज्यात नाट्यगृहांची संख्या वाढवण्यासाठी सरकारकडे पाठपुरावा करण्याची विनंती केली, जेणेकरून मराठी कला आणि कलाकार यांना अधिक वाव मिळेल.

यावेळी उपनगराध्यक्ष नूर मोहम्मद शेख, मुख्याधिकारी दयानंद गोरे, शहर अभियंता प्रशांत जुन्नरे, नाट्य परिषदेचे प्रा. डॉ. संजय दळवी, उपाध्यक्ष बाबासाहेब मेमाने, नितीन अभंग, मोहसीन शेख, डॉ. सुनील चव्हाण डॉ. रवींद्र गायकवाड, अंतनु घोडके गणेश राजदेव यांच्यासह अनेक मान्यवर आणि नाट्यप्रेमी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

anantpangarkar
Annant Ppangarkar

Post Views: 560
कवी अनंत फंदी नाट्यगृह पाहणी प्रशांत दामले सत्यजित तांबे
Share. Facebook Twitter Pinterest WhatsApp
Annant Ppangarkar
  • Website

Related Posts

पंचनाम्यात वेळ घालवू नका, सरसकट मदत करा! दिल्लीवरून थेट शेतकऱ्यांच्या बांधावर पोहोचून बाळासाहेब थोरात आक्रमक!

13/10/2026

“राजा किती क्रूर आणि खोटारडा आहे…” आई-बाळाची आर्त हाक अन् पोलिसांचा पाशवी हात; संजय राऊतांनी शेअर केलेल्या ‘त्या’ एका छायाचित्राने हादरवला महाराष्ट्र!

12/10/2026

माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांच्या मार्गदर्शनाखाली संगमनेर तालुक्यातील विविध रस्ते मजबुतीकरणासाठी ३ कोटी रुपयांचा निधी मंजूर; आमदार सत्यजित तांबे यांच्या पाठपुराव्याला यश

10/10/2026
Leave A Reply Cancel Reply

Document
Our Picks
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
Advertisement 1 Advertisement 2 Advertisement 3 Advertisement 4
Don't Miss
पाण्याचे राजकारण

‘ये पब्लिक है, सब जानती है!’ — निळवंडेच्या पाण्याचे श्रेय लाटणाऱ्याना संगमनेरची जनता निवडणुकीत देणार सडेतोड उत्तर; अमोल शेलकर यांचा घणाघात

By Annant Ppangarkar14/10/20260

महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन- देशभरात वेगवेगळ्या मुद्यांवरून श्रेय लाटण्याचे प्रकार सुरू असताना, जिल्ह्यात आता निळवंडेच्या…

सरकारी जमिनीवर अतिक्रमण! प्रशासनाचा डोळेझाक कारभार; अधिकाऱ्यांना सरकारी मालमत्ता सांभाळता येईना

14/10/2026

मतचोरी अन् ‘SIR’च्या घोटाळ्याविरोधात संगमनेरमध्ये उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेसह समविचारी पक्षांचा घणाघात; माजी खासदार खैरे, जिल्हाप्रमुख कोते पाटलांच्या नेतृत्वात रस्ता रोको करत निवडणूक आयोगाचा तीव्र निषेध

14/10/2026

मतचोरी अन् ‘SIR’च्या घोटाळ्याविरोधात संगमनेरमध्ये उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेसह समविचारी पक्षांचा घणाघात; माजी खासदार खैरे, जिल्हाप्रमुख कोते पाटलांच्या नेतृत्वात रस्ता रोको करत निवडणूक आयोगाचा तीव्र निषेध

14/10/2026
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow

तुमचे हक्काचे व्यासपीठ

Facebook YouTube
Our Picks
October 2026
M T W T F S S
 1234
567891011
12131415161718
19202122232425
262728293031  
« Sep    
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • पत्रकारिता
  • फोटो / गॅलरी
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
  • शेती व सहकार
  • सामाजिक
  • CONTACT US
  • ABOUT US
  • PRIVACY POLICY
© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.