Close Menu
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
What's Hot

‘ये पब्लिक है, सब जानती है!’ — निळवंडेच्या पाण्याचे श्रेय लाटणाऱ्याना संगमनेरची जनता निवडणुकीत देणार सडेतोड उत्तर; अमोल शेलकर यांचा घणाघात

14/10/2026

सरकारी जमिनीवर अतिक्रमण! प्रशासनाचा डोळेझाक कारभार; अधिकाऱ्यांना सरकारी मालमत्ता सांभाळता येईना

14/10/2026

मतचोरी अन् ‘SIR’च्या घोटाळ्याविरोधात संगमनेरमध्ये उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेसह समविचारी पक्षांचा घणाघात; माजी खासदार खैरे, जिल्हाप्रमुख कोते पाटलांच्या नेतृत्वात रस्ता रोको करत निवडणूक आयोगाचा तीव्र निषेध

14/10/2026
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
Home » संगमनेरमध्ये उद्या रंगणार ‘आनंदी रस्ते’; रोटरी क्लबच्या उपक्रमाचे यंदा १० वे वर्ष
सामाजिक

संगमनेरमध्ये उद्या रंगणार ‘आनंदी रस्ते’; रोटरी क्लबच्या उपक्रमाचे यंदा १० वे वर्ष

लहान मुलांपासून ज्येष्ठांपर्यंत सर्वांना एकत्र आणणारा हा उपक्रम शहरात सकारात्मक ऊर्जा निर्माण करणारा ठरेल, असा विश्वास आयोजकांनी व्यक्त केला आहे
Annant PpangarkarBy Annant Ppangarkar21/02/2026No Comments2 Mins Read
Facebook Twitter WhatsApp
Share
Facebook Twitter Email Telegram WhatsApp

संगमनेर, प्रतिनिधी – 

दैनंदिन जीवनातील धावपळ विसरून नागरिकांनी आनंदाचे क्षण अनुभवावेत यासाठी रोटरी क्लब ऑफ संगमनेरच्यावतीने अत्यंत लोकप्रिय असलेल्या ‘आनंदी रस्ते’ अर्थात ‘हॅपी स्ट्रीट’ या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. लहान मुलांपासून ज्येष्ठांपर्यंत सर्वांना एकत्र आणणारा हा उपक्रम शहरात सकारात्मक ऊर्जा निर्माण करणारा ठरेल, असा विश्वास आयोजकांनी व्यक्त केला आहे.

यंदा या उपक्रमाचे विशेष महत्त्व असून, हे या उपक्रमाचे १० वे वर्ष आहे. हा उपक्रम उद्या रविवारी (२२ फेब्रुवारी) सकाळी ७ ते १० या वेळेत स्व. ओंकारनाथ मालपाणी मार्गावर, राजपाल क्लॉथ स्टोअर ते जाणता राजा मैदान या दरम्यान पार पडणार आहे.

या उपक्रमाच्या माध्यमातून नागरिकांना विविध खेळ, गाणी, गप्पा आणि झुंबा डान्सच्या तालावर विरंगुळा मिळवता येणार आहे. रस्ते आकर्षक चित्रांनी सजवले जाणार असून, रंगकाम केलेली झाडे आणि फुग्यांच्या सजावटीमुळे परिसरात उत्साहाचे वातावरण असेल. कार्यक्रमात ऑर्केस्ट्रा, वासुदेव, नृत्य, लेझीम, मल्लखांब, व्यंगचित्रे, आकर्षक निवेदन आणि बहारदार झुंबा डान्स अशा विविध सांस्कृतिक कार्यक्रमांची मेजवानी संगमनेरकरांना मिळणार आहे. 

याशिवाय सहभागी नागरिकांनी लिंगोरचा, दोरी-उड्या, क्रिकेट, व्हॉलीबॉल, गोट्या, टायर-चकरी, फ्लाइंग डिश यांसारखे पारंपरिक खेळ किंवा मिमिक्री, जोक्स आणि विडंबन गीतांचे सादरीकरण करण्यासाठी स्वतःचे साहित्य सोबत आणल्यास त्यांचे विशेष स्वागत केले जाणार आहे.

नागरिकांमध्ये सामाजिक एकोपा वाढवणे, कुटुंबासोबत वेळ घालवणे आणि पारंपारिक कलांना प्रोत्साहन देणे हा या उपक्रमाचा मुख्य हेतू असल्याचे आयोजकांनी नमूद केले आहे. रोटरी क्लब ऑफ संगमनेरचे अध्यक्ष रो. विश्वनाथ मालाणी आणि सेक्रेटरी सौरभ म्हाळस यांनी सर्व नागरिकांना सहकुटुंब उपस्थित राहण्याचे आवाहन केले आहे. या उपक्रमाच्या यशस्वीतेसाठी प्रकल्प प्रमुख रोटेरियन संकेत काजळे यांच्यासह धीरज देशमुख, महेश वाकचौरे आणि समीर शहा हे परिश्रम घेत आहेत.

या भव्य उपक्रमाच्या प्रकल्प समितीमध्ये दिलीप मालपाणी, दीपक मणियार, अजित काकडे, ओंकार सोमाणी, नरेंद्र चांडक, ऋषिकेश मोंढे, आनंद हासे, अमित पवार, मधुसूदन करवा, सोनू राजपाल, किशोर पोखरकर, राजेंद्र खोसे, विकास लावरे, डॉ. मनोहर सचदेव, डॉ. विनायक नागरे आणि संदीप फटांगरे अशा सर्व सदस्यांचा सक्रिय सहभाग आहे. 

anantpangarkar
Annant Ppangarkar

Post Views: 329
आनंदी रस्ते रोटरी क्लब
Share. Facebook Twitter Pinterest WhatsApp
Annant Ppangarkar
  • Website

Related Posts

संगमनेर ड्रग्ज प्रकरणातील सत्य जनतेसमोर आणा; सोशल मीडियावरील ‘मीडिया ट्रायल’ त्वरित थांबवा! — काँग्रेस कार्याध्यक्ष अमोल शेलकर यांचे पोलीस प्रशासनाला आवाहन; वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी संयुक्त पत्रकार परिषद घेऊन पारदर्शक चौकशीचे पुरावे मांडण्याची मागणी

24/09/2026

संगमनेर शहरात वाहतूक कोंडीचा बोजवारा: बेशिस्त रिक्षाचालक, फुटपाथवरील अतिक्रमणे अन् अवैध पार्किंगमुळे नागरिक त्रस्त; पोलीस प्रशासन ढिम्म

24/09/2026

‘संगमनेर फेस्टिव्हल’ हा संगमनेरकरांचा सांस्कृतिक मानबिंदू : मनीष मालपाणी १८ व्या संगमनेर फेस्टिव्हलचा सांगता सोहळा उत्साहात; विनोदी नाटकाने प्रेक्षकांना हसवले मनमुराद

22/09/2026
Leave A Reply Cancel Reply

Document
Our Picks
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
Advertisement 1 Advertisement 2 Advertisement 3 Advertisement 4
Don't Miss
पाण्याचे राजकारण

‘ये पब्लिक है, सब जानती है!’ — निळवंडेच्या पाण्याचे श्रेय लाटणाऱ्याना संगमनेरची जनता निवडणुकीत देणार सडेतोड उत्तर; अमोल शेलकर यांचा घणाघात

By Annant Ppangarkar14/10/20260

महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन- देशभरात वेगवेगळ्या मुद्यांवरून श्रेय लाटण्याचे प्रकार सुरू असताना, जिल्ह्यात आता निळवंडेच्या…

सरकारी जमिनीवर अतिक्रमण! प्रशासनाचा डोळेझाक कारभार; अधिकाऱ्यांना सरकारी मालमत्ता सांभाळता येईना

14/10/2026

मतचोरी अन् ‘SIR’च्या घोटाळ्याविरोधात संगमनेरमध्ये उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेसह समविचारी पक्षांचा घणाघात; माजी खासदार खैरे, जिल्हाप्रमुख कोते पाटलांच्या नेतृत्वात रस्ता रोको करत निवडणूक आयोगाचा तीव्र निषेध

14/10/2026

मतचोरी अन् ‘SIR’च्या घोटाळ्याविरोधात संगमनेरमध्ये उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेसह समविचारी पक्षांचा घणाघात; माजी खासदार खैरे, जिल्हाप्रमुख कोते पाटलांच्या नेतृत्वात रस्ता रोको करत निवडणूक आयोगाचा तीव्र निषेध

14/10/2026
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow

तुमचे हक्काचे व्यासपीठ

Facebook YouTube
Our Picks
October 2026
M T W T F S S
 1234
567891011
12131415161718
19202122232425
262728293031  
« Sep    
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • पत्रकारिता
  • फोटो / गॅलरी
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
  • शेती व सहकार
  • सामाजिक
  • CONTACT US
  • ABOUT US
  • PRIVACY POLICY
© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.