Close Menu
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
What's Hot

एलसीबी अन्‌ एफडीएची धडक कारवाई; १२.८१ लाखांच्या गुटख्यासह दोघांना अटक, चार जण फरार

05/10/2026

अहिल्यानगर जिल्हा बँकेसाठी संगमनेर तालुक्यातून शिवसेनेचे तीन उमेदवार मैदानात — यांनी केले अर्ज दाखल

05/10/2026

मोठी घडामोड: संगमनेर तालुका दूध उत्पादक संघाच्या चेअरमनपदाचा देशमुख यांचा राजीनामा, नवे चेअरमन कोण? तर विधानपरिषद सभापती राम शिंदे जिल्हा बँकेची निवडणूक लढविणार नाही

05/10/2026
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
Home » रविवार विशेष लेख — भारताच्या मानगुटीवर एपस्टिनचं भूत
विश्लेषण

रविवार विशेष लेख — भारताच्या मानगुटीवर एपस्टिनचं भूत

लेखक दैनिक आपलं महानगरचे माजी निवासी संपादक असून मुंबईतील जेष्ठ पत्रकार व राजकीय विश्लेषकआहेत.
Annant PpangarkarBy Annant Ppangarkar22/02/2026No Comments6 Mins Read
Facebook Twitter WhatsApp
Share
Facebook Twitter Email Telegram WhatsApp

जगाला हादरवून सोडणार्‍या जेफ्री एपस्टिनच्या भुताने भारताला हैराण करून सोडलं आहे. बाहेर येणार्‍या एकेका गोष्टीने जग हदरतो आहेच. पण स्वत:ला संस्कृती आणि परंपरेचा पायिक समजणार्‍या भारताचं आणि इथल्या राजकारण्यांचं नाव बाहेर येऊ लागल्याने गंभीर परिस्थिती निर्माण झालीय. फाईलमध्ये आपलं नाव येऊ नये म्हणून सत्ता ज्या प्रकारे अमेरिकेपुढे लोटांगण घालत आहे, ते पहाता हे देशाच्या अस्तित्वासाठी अतिगंभीर होऊ शकतं. एपस्टिनच्या फाईलमध्ये अडकलेला एका राष्ट्राचा प्रमुख इतर देशांना कसा ब्लॅकमेल करतो, हे भारताच्या सत्ताधार्‍यांना लक्षात आलं नसेल तर दुर्देवच. असल्या विकृतीच्या मागे लागल्यावर देशाचं भलं होईल, असं ज्यांना वाटतं ते त्याहून अधिक विकृतीने पछाडलेत असंच म्हणायला हवं.

ज्या महिला पत्रकाराने हे प्रकरण बाहेर काढलं त्या ज्युली ब्राऊनला जगाने सलाम केला पाहिजे. मरणापुढे न डगमगता तिने हे प्रकरण बाहेर आणलं आणि सत्तेच्या गुलामांना उघडं पाडलं. ज्यांनी आपला देश चालवावा अशा धनधांडग्यांना एक्सपोज करणं हे काही खायचं काम नाही. जे व्यवस्थेचं होत्याचं नव्हतं करतात ते महिला पत्रकाराचं काहीही करू शकतात. यामुळे शोध पत्रकारिता करणार्‍या ज्युली ब्राऊन यांना संरक्षण देण्याची नितांत गरज आहे. जगाने ज्यांच्यापुढे नतमस्तक व्हावं, अशा श्रीमंतांना आणि राष्ट्रप्रमुखांना नागडं करण्याचं सामर्थ्य आज अनेक पत्रकारांमध्ये आहे, हे ज्युलीने दाखवून दिलं आहे. यामुळे विकत घेण्याचा कितीही प्रयत्न केला तरी सगळेच पत्रकार विकले जातील, असं नाही. कोणीही स्वत:ला विकलं तरी तरी निष्ठेने आणि निर्भिडपणे पत्रकारिता करणारे आजही जगात आहेत, ही समर्थनीय बाब म्हटली पाहिजे.

जेफ्रीच्या लैंगिक शोषणाच्या आणि मानवी तस्करीच्या कथांनी जगाला हैराण करून सोडलंय. गुन्हयातील म्होरके आपल्यावरील गुन्हे लपवण्यासाठी पुरावे कसे नष्ट करतात, याविषयी ज्युलीने मियामी हेरॉल्ड या वृत्तपत्रात ‘परवर्शन ऑफ जस्टीस’ या प्रकाशित केलेल्या मालिकेने जेफ्रीचे गुन्हे बाहेर काढले. 2018 मध्ये प्रकाशित झालेल्या मालिकेची दखल घेत अमेरिकन न्यायालयांना एपस्टिनला पुन्हा ताब्यात घेण्यास भाग पाडलं. प्रकरण इतकंसं असतं तर त्याकडे नजरअंदाज करता आलं असतं. पण त्याची व्याप्ती पाहून न्यायालयाला जेफ्रीच्या मुसक्या आवळण्यावाचून पर्याय राहिला नाही. याच काळात डोनाल्ड ट्रम हे अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष होते. जेफ्रीने तोंड उघडू नये, म्हणून त्याला तुरुंगातच संपवण्यात आलं. जेफ्री मेला म्हणून ट्रम यांना आपण सुटलो असं वाटलं. जेफ्रीने आत्महत्या केल्याचं नाटक रचण्यात आलं. मात्र अमेरिकन न्याय व्यवस्था ही आजही न्यायासारखी वागते. यामुळे जेफ्रीचे कारनामे बाहेर आले आणि लाखो ई-मेल्स, हजारो फोटो खुले झाले.

फ्लोरिडाच्या तुरुंग व्यवस्थेतील खाचखळगे शोधताना जगाला हादरवणारं हे प्रकरण ज्युलीच्या हाती लागलं. अत्यंत क्रूर अशा बालहत्येच्या प्रकरणात 2008 मध्ये किरकोळ शिक्षा सुनावलेल्या जेफ्रीचं काळं सत्य उजेडात आणताना तो किती घातक आहे हे ज्युलीला कळून चुकलं. 13 वर्षांवरील मुलींचा अनन्वित छळ करून त्यांची क्रूर हत्या करण्याच्या या गुन्ह्यापुरतं हे प्रकरण स्तिमित नव्हतं. या मुलींचं मास शिजवून ते श्रीमंतांच्या तोंडी घालण्याचं विकृत कृत्य केवळ हादरवणारं नव्हतं. हे प्रकरण हाती लागण्यासाठी यातल्या आठजणी कारण ठरल्या. त्या तयार झाल्या. त्यांनी यातली सत्यता ज्युलीपुढे उघड केली. तेव्हा हे प्रकरण किती भयंकर आहे, हे ज्युलीला जगाला दाखवता आलं. सत्तेला विकलेल्यांप्रमाणे फ्लोरिडा पोलीस प्रमुख असलेल्या मायकेल रायटरने प्रकरण दाबण्याचा प्रयत्न केला. एपस्टिनचा वकील एलन डर्सहोविट्झ याने यासाठी आपली सारी ताकद खर्ची घातली. मात्र ज्युलीच्या लेखणीने त्याला अद्दल घडवलीच. इथे भारत असता तर?

2009 मध्ये मॅक्सिकोच्या गेब्रिला जेमिनी या 21 वर्षांच्या युवतीने शहरात अनवाणी फिरून या मानवी तस्करीविषयी लक्ष वेधण्याचा प्रयत्न केला तेव्हा अनेकांनी तिला वेडं ठरवलं. एका हायप्रोफाईल पार्टीत जगातले पैसेवाले आणि सत्ताधारी लहान मुलांचं मांस खात असल्याचं तिने ओरडून सांगण्याचा प्रयत्न केला होता. तेव्हा पोलिसांनी वेडी म्हणून तिला ताब्यात घेतलं. यानंतर गेब्रिला गायब झाली ती आजवर कुठे आहे, हे कोणालाच कळलं नाही. आता एपस्टिन फाईल उघड झाल्यावर अनेकांना गेब्रिलाची आठवण होऊ लागली आहे. 17 वर्षांपूर्वीच्या याघटनेकडे लक्ष दिलं असतं तर हजारो मुलींचं शोषण आणि त्यांची हत्या थांबली असती. पण हाय व्यवस्था.

हे सारं करताना जेफ्रीने संबंधितांशी ई-मेलद्वारे केलेला पत्रव्यवहार आणि त्यातील व्हिडिओ त्याने स्वत: राखून ठेवले. अमेरिकन न्यायालयाने ते उघड केल्याने जगाला यातलं वास्तव कळू लागलं. सुमारे 60 लाख ई-मेल्सद्वारे जेफ्रीने जगातल्या विकृत सत्ताधिशांना संपर्क साधला. त्यांच्या अय्याशीची बडदास्त राखली. मुली पुरवल्या आणि सारं काही संकलित करून ठेवलं. यातल्या पहिल्या 30 लाख ई-मेल्सनेच जगाला हादरे बसू लागले आहेत. अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम, माजी अध्यक्ष जॉर्ज बूश, बिल क्लिंटन, बराक ओबामा, जगभरातील सर्वात श्रीमंत माणूस इलॉन मस्क, बिल गेट्स अशांची नावं पुढे आली. बिल गेट्सला रशियन मुली आवडायच्या. त्या मुलींचा रोग गेट्सला झाला तो त्याच्या पत्नीला जडला आणि अखेर घटस्फोट. भारतातील अनील अंबानींपासून पेट्रोलियम मंत्री हरदिपसिंग पुरी यांच्यासह भारताच्या सत्ताधार्‍यांची नावं पुढे येऊ लागल्याने देशाच्या संसदेचं काम थांबलंय. अमेरिकेत अनाधिकाराने राहणार्‍या भारतीयांच्या पायात बेड्या घालून त्यांची धिंड काढणार्‍या अमेरिकेपुढे भारत इतका का लाचार होतो आहे, याविषयीच्या विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी विचारलेल्या प्रश्‍नांचं उत्तर याच एपस्टिनच्या फाईलमध्ये दडलं आहे. हे बाहेर येऊ नये म्हणून सत्ताधार्‍यांनी राहुल गांधी यांना बोलूच द्यायचं नाही, त्यांची खासदारकी काढून घ्यायची, निशिकांत दुबेसारख्या आगलाव्यांकरवी राहुल यांचा निवडणूक लढवण्याचा अधिकारच काढून घ्यायचा असले उद्योग सुरू केले आहेत. पण म्हणून जेफ्रीच्या प्रकरणातून सत्ताधारी वाचतील, हा समज त्यांनी काढून टाकला पाहिजे. संसदेत राहुल गांधी यांनी विचारलेले केवळ तीनच प्रश्‍न सत्तेला झोंबले. इस्त्राएलचे राष्ट्राध्यक्ष नेत्यानाहू यांच्यापुढे पंतप्रधान मोदी यांनी केलेलं नृत्य आमच्या सल्ल्यानुसारच होतं, असा सल्ला देणारा कोण, अमेरिकेबरोबरील ट्रेड डिलमध्ये भारताभारताचा फायदा काय आणि शेतीविषयी अमेरिकेबरोबर केलेल्या कराराचं कारण हे ते तीन प्रश्‍न. या प्रश्‍नांनी सत्ताधार्‍यांच्या बुडाखाली आग लागली. त्यांनी संसद थांबवली. महिला खासदार हल्ला करणार अशा वल्गना करून सभागृह थांबवलं.

महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी दोन महिन्यांपूर्वी एका गंभीर प्रकरणात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना राजीनामा द्यावा लागेल, असं म्हटलं तेव्हाच या प्रकरणाची कुणकूण लागली होती. मात्र भारतातल्या माध्यमांनी त्यांना हसण्यावर नेलं. चव्हाण यांनी जे सांगितलं ते आज बाहेर आलं. ज्यांची नावं या फाईलने उघड केली त्या राजघराण्यापासून अनेक राष्ट्रांच्या प्रमुखांनी आपल्या पदांचे राजीनामे दिले आहेत. अनेकांच्या पत्नींनी असल्या विकृतीत नाव आलेल्या नवर्‍याची साथ सोडली आहे. भारत असा एकच देश ज्या देशाच्या सत्तेत मुर्दाडांची भरती झालीय. नावं पुढे येऊनही त्यांना लाज वाटत नाही की सत्ता सोडावीशी वाटत नाही. ई-मेच्या संदेशात 30 वेळा नावाचा उल्लेख होऊनही ते स्वत:चं नाव लपवण्याचा प्रयत्न करत आहेत. देशाचे पेट्रोलियम मंत्री हरदिपसिंग पुरी, उद्योगपती अनील अंबानी, दिपक चोप्रा अशा दिग्गजांची नावं अतापर्यंत पुढे आली आहेत. ज्या जेफ्रीने हे सारं केलं त्याचा मुळ पेशा हा शिक्षकीचा. पुढे तो बँकर झाला. त्याला लहान मुली फार आवडायच्या. त्यांच्यावर अत्याचार करणं ही त्याची विकृती. यात त्याने अनेकांना ओढलं. जे ओढले गेले ते इतके फसले की त्यांनी साथीदारांना तिथे पोचवलं. जे पोहोचले त्यांना माघारी येणं अवघड बनलं. नरेंद्र मोदींचे विश्‍वासू अमेरिकन राजदूत हरदिपसिंग पुरी यांनी विकृत एपस्टिनची 14 वेळा भेटी घेतल्याचं उघड झालं. 2014 नंतर सत्ता मिळाल्यानंतरच्या या भेटी होत. 30 लाख पत्र, 1 लाख 80 हजार फोटो आणि 2000 व्हिडिओ हा या प्रकरणातला पहिला टप्पा. पुढच्या टप्प्यात भारताच्या माणगुटीवर बसलेलं जेफ्रीचं भूत भारताच्या वाट्याला काय वाढून ठेवणार ते लवकरच दिसेल.

anantpangarkar
Annant Ppangarkar

Post Views: 516
प्रवीण पुरो रविवार विशेष विशेष लेख विश्लेषण
Share. Facebook Twitter Pinterest WhatsApp
Annant Ppangarkar
  • Website

Related Posts

रविवार विशेष लेख— शिवसेना काल आज आणि उद्या

04/10/2026

रविवार विशेष लेख — फुले-आंबेडकर साहित्याला विष संबोधणारे बौद्धिक दलाल

04/10/2026

रविवार विशेष लेख — अस्थी नदीत विसर्जित करण्याऐवजी स्मृतींचे झाड लावू या!

04/10/2026
Leave A Reply Cancel Reply

Document
Our Picks
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
Advertisement 1 Advertisement 2 Advertisement 3 Advertisement 4
Don't Miss
गुन्हेगारी

एलसीबी अन्‌ एफडीएची धडक कारवाई; १२.८१ लाखांच्या गुटख्यासह दोघांना अटक, चार जण फरार

By Annant Ppangarkar05/10/20260

महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन- अहिल्यानगर येथून नगर-मनमाड रस्त्याने भिवंडी येथे बेकायदेशीरपणे विक्रीसाठी नेण्यात येणारा सुगंधीत…

अहिल्यानगर जिल्हा बँकेसाठी संगमनेर तालुक्यातून शिवसेनेचे तीन उमेदवार मैदानात — यांनी केले अर्ज दाखल

05/10/2026

मोठी घडामोड: संगमनेर तालुका दूध उत्पादक संघाच्या चेअरमनपदाचा देशमुख यांचा राजीनामा, नवे चेअरमन कोण? तर विधानपरिषद सभापती राम शिंदे जिल्हा बँकेची निवडणूक लढविणार नाही

05/10/2026

अहिल्यानगर जिल्हा बँकेच्या रणधुमाळीत मोठा ट्विस्ट: संगमनेरमधून यांची उमेदवारी फायनल; बाळासाहेब थोरातांच्या भूमिकेकडे जिल्ह्याचे सर्वांचे लक्ष!

05/10/2026
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow

तुमचे हक्काचे व्यासपीठ

Facebook YouTube
Our Picks
October 2026
M T W T F S S
 1234
567891011
12131415161718
19202122232425
262728293031  
« Sep    
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • पत्रकारिता
  • फोटो / गॅलरी
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
  • शेती व सहकार
  • सामाजिक
  • CONTACT US
  • ABOUT US
  • PRIVACY POLICY
© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.