Close Menu
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
What's Hot

‘ये पब्लिक है, सब जानती है!’ — निळवंडेच्या पाण्याचे श्रेय लाटणाऱ्याना संगमनेरची जनता निवडणुकीत देणार सडेतोड उत्तर; अमोल शेलकर यांचा घणाघात

14/10/2026

सरकारी जमिनीवर अतिक्रमण! प्रशासनाचा डोळेझाक कारभार; अधिकाऱ्यांना सरकारी मालमत्ता सांभाळता येईना

14/10/2026

मतचोरी अन् ‘SIR’च्या घोटाळ्याविरोधात संगमनेरमध्ये उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेसह समविचारी पक्षांचा घणाघात; माजी खासदार खैरे, जिल्हाप्रमुख कोते पाटलांच्या नेतृत्वात रस्ता रोको करत निवडणूक आयोगाचा तीव्र निषेध

14/10/2026
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
Home » पर्यावरण रक्षणात खांडगावचा राज्यात गौरव; ‘माझी वसुंधरा ४.०’ मध्ये ५० लाखांचे पारितोषिक
यश / निवड / पुरस्कार

पर्यावरण रक्षणात खांडगावचा राज्यात गौरव; ‘माझी वसुंधरा ४.०’ मध्ये ५० लाखांचे पारितोषिक

खांडगावने राबविलेले पर्यावरणपूरक उपक्रम आणि ग्रामस्थांच्या सक्रीय सहभागामुळे हा ऐतिहासिक क्षण अनुभवायला मिळाला आहे.
Annant PpangarkarBy Annant Ppangarkar22/02/2026No Comments2 Mins Read
Facebook Twitter WhatsApp
Share
Facebook Twitter Email Telegram WhatsApp

संगमनेर, प्रतिनिधी – 
पर्यावरण संवर्धन आणि निसर्ग रक्षणाच्या चळवळीत संगमनेर तालुक्यातील खांडगाव ग्रामपंचायतीने राज्याच्या नकाशावर आपली मोहोर उमटवली आहे. राज्य शासनाच्या वतीने राबविण्यात आलेल्या ‘माझी वसुंधरा अभियान ४.०’ अंतर्गत २,५०० ते ५,००० लोकसंख्या गटात खांडगावने उत्कृष्ट कामगिरीचे प्रदर्शन केले. या यशाबद्दल गावाला राज्यस्तरीय पुरस्कार आणि ५० लाख रुपयांचे रोख पारितोषिक देऊन सन्मानित करण्यात आले आहे.
मुंबई येथील सरदार वल्लभभाई पटेल स्टेडियममध्ये या विशेष गौरव सोहळ्याचेआयोजन करण्यात आले होते. महाराष्ट्र राज्याचे राज्यपाल आचार्य देवव्रत, उपमुख्यमंत्री सुनेत्राताई पवार यांच्या प्रमुख उपस्थितीत आणि पर्यावरण व वातावरणीय बदल मंत्री पंकजाताई मुंडे यांच्या हस्ते खांडगावच्या पदाधिकाऱ्यांनी हा बहुमान स्वीकारला. खांडगावने राबविलेले पर्यावरणपूरक उपक्रम आणि ग्रामस्थांच्या सक्रीय सहभागामुळे हा ऐतिहासिक क्षण अनुभवायला मिळाला आहे.
या यशामागे सरपंच ॲड. विकास रावसाहेब गुंजाळ, उपसरपंच सुनील लक्ष्मण रुपवते यांच्यासह सर्व ग्रामपंचायत सदस्यांचे नियोजन महत्त्वाचे ठरले. तसेच मार्गदर्शक सोमनाथ नबाजी गुंजाळ, भरत भीमाशंकर गुंजाळ, लक्ष्मीबाई संपत गुंजाळ, रमेश विश्वनाथ अरगडे, गंगाताई प्रभाकर गुंजाळ, पद्मावती संजय गुंजाळ, अनिता आप्पासाहेब गुंजाळ, शोभा लक्ष्मण खरे आणि नयना विलास गुंजाळ या सर्वांनी या अभियानासाठी विशेष परिश्रम घेतले. प्रशासकीय पातळीवर ग्रामसेविका उज्ज्वला नवले आणि सर्व ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांनी केलेल्या अचूक नियोजनामुळेच खांडगावचा हा डंका राज्यस्तरावर वाजू शकला.
खांडगावच्या या दैदीप्यमान यशाची दखल राज्याचे माजी महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांनीही घेतली असून, त्यांनी ग्रामपंचायत पदाधिकारी व ग्रामस्थांचे कौतुक करत पुढील विकासकामांसाठी शुभेच्छा दिल्या आहेत. या पुरस्कारामुळे संपूर्ण संगमनेर तालुक्यात खांडगावचे विशेष कौतुक होत आहे.

📌 हा पुरस्कार गावातील प्रत्येक ग्रामस्थाचा, स्वच्छता सैनिकाचा आणि पर्यावरणासाठी झटणाऱ्या प्रत्येक हाताचा सन्मान आहे. गावातील विविध संस्था आणि ग्रामस्थांच्या एकजुटीमुळेच हे यश साध्य झाले असून, या पुरस्कारामुळे भविष्यात पर्यावरण रक्षणाची जबाबदारी अधिक वाढली आहे. — ॲड. विकास गुंजाळ सरपंच.

anantpangarkar
Annant Ppangarkar

Post Views: 640
खांडगाव ग्रामपंचायत पुरस्कार माझी वसुंधरा ४.०
Share. Facebook Twitter Pinterest WhatsApp
Annant Ppangarkar
  • Website

Related Posts

संगमनेर येथे ३० ऑगस्टला ‘लोकनेते बाळासाहेब थोरात गुणगौरव पुरस्कार’ सोहळा; विविध क्षेत्रांतील मान्यवरांसह २० शिक्षकांचा होणार सन्मान

23/08/2026

प्रवीण बागडे यांना ‘लोकशाहीर अण्णाभाऊ साठे साहित्यरत्न’ राज्यस्तरीय पुरस्कार जाहीर

18/08/2026

संगमनेर तालुका व शहर काँग्रेसच्या नव्या पदाधिकाऱ्यांच्या निवडी जाहीर; अजय फटांगरे, सोमेश्वर दिवटे आणि अमोल शेलकर यांच्यावर मोठी जबाबदारी

18/07/2026
Leave A Reply Cancel Reply

Document
Our Picks
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
Advertisement 1 Advertisement 2 Advertisement 3 Advertisement 4
Don't Miss
पाण्याचे राजकारण

‘ये पब्लिक है, सब जानती है!’ — निळवंडेच्या पाण्याचे श्रेय लाटणाऱ्याना संगमनेरची जनता निवडणुकीत देणार सडेतोड उत्तर; अमोल शेलकर यांचा घणाघात

By Annant Ppangarkar14/10/20260

महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन- देशभरात वेगवेगळ्या मुद्यांवरून श्रेय लाटण्याचे प्रकार सुरू असताना, जिल्ह्यात आता निळवंडेच्या…

सरकारी जमिनीवर अतिक्रमण! प्रशासनाचा डोळेझाक कारभार; अधिकाऱ्यांना सरकारी मालमत्ता सांभाळता येईना

14/10/2026

मतचोरी अन् ‘SIR’च्या घोटाळ्याविरोधात संगमनेरमध्ये उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेसह समविचारी पक्षांचा घणाघात; माजी खासदार खैरे, जिल्हाप्रमुख कोते पाटलांच्या नेतृत्वात रस्ता रोको करत निवडणूक आयोगाचा तीव्र निषेध

14/10/2026

मतचोरी अन् ‘SIR’च्या घोटाळ्याविरोधात संगमनेरमध्ये उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेसह समविचारी पक्षांचा घणाघात; माजी खासदार खैरे, जिल्हाप्रमुख कोते पाटलांच्या नेतृत्वात रस्ता रोको करत निवडणूक आयोगाचा तीव्र निषेध

14/10/2026
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow

तुमचे हक्काचे व्यासपीठ

Facebook YouTube
Our Picks
October 2026
M T W T F S S
 1234
567891011
12131415161718
19202122232425
262728293031  
« Sep    
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • पत्रकारिता
  • फोटो / गॅलरी
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
  • शेती व सहकार
  • सामाजिक
  • CONTACT US
  • ABOUT US
  • PRIVACY POLICY
© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.