Close Menu
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
What's Hot

गुरुवार, १५ ऑक्टोंबर — आजचा दिवस कसा असेल जाणून घ्या!

15/10/2026

संगमनेरच्या बाजारपेठेला मोठा दिलासा, दुष्काळाच्या संकटातही थोरात कारखान्याचा मोठा निर्णय; कामगारांना मिळणार इतका बोनस अन् सानुग्रह अनुदान; ऊस उत्पादकांना प्रतिटन एवढी मदत! लोकनेते बाळासाहेब थोरात यांची घोषणा

14/10/2026

रस्त्यावरील वादातून मारहाण, जीवे मारण्याची धमकी; संगमनेर न्यायालयाने सुनावली ही शिक्षा

14/10/2026
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
Home » संगमनेरमध्ये ‘आनंदी रस्ते’ उपक्रमाचा जल्लोष; दहाव्या वर्षीही संगमनेरकरांचा उत्स्फूर्त प्रतिसाद
महाराष्ट्र संवाद विशेष

संगमनेरमध्ये ‘आनंदी रस्ते’ उपक्रमाचा जल्लोष; दहाव्या वर्षीही संगमनेरकरांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

आमदार अमोल खताळ यांनी रोटरीच्या ४२ वर्षांच्या सामाजिक कार्याचा गौरव करत या उपक्रमाला शुभेच्छा दिल्या. तसेच माजी आमदार डॉ. सुधीर तांबे यांनी रोटरीच्या विशेषतः एकल महिलांसाठीच्या कार्याचे कौतुक करून, जीवन आनंदी ठेवण्याचे हे कार्य अत्यंत महत्त्वाचे असल्याचे प्रतिपादन केले.
Annant PpangarkarBy Annant Ppangarkar23/02/2026No Comments2 Mins Read
Facebook Twitter WhatsApp
Share
Facebook Twitter Email Telegram WhatsApp

संगमनेर, प्रतिनिधी –

रोटरी क्लब संगमनेरच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या ‘आनंदी रस्ते’ या उपक्रमाने रविवारी संगमनेर शहरात चैतन्याचे वातावरण निर्माण केले. रोटरी इंटरनॅशनलच्या १२१ व्या वर्धापन दिनाचे औचित्य साधून आयोजित करण्यात आलेल्या या उपक्रमाचे यंदा दहावे वर्ष होते. या सोहळ्याला संगमनेरकरांनी आबालवृद्धांसह मोठी गर्दी करत प्रतिसाद दिला.

कार्यक्रमाच्या निमित्ताने आमदार अमोल खताळ, नाशिक पदवीधर मतदारसंघाचे आमदार सत्यजित तांबे, माजी आमदार डॉ. सुधीर तांबे, रोटरी डिस्ट्रीक्ट ३१३२ चे असिस्टंट गव्हर्नर अमोल वैद्य आणि माजी नगराध्यक्ष दुर्गाताई तांबे यांच्यासह शहरातील अनेक मान्यवर उपस्थित होते. रो. दिलीप मालपाणी यांनी दहा वर्षांपूर्वी संगमनेरमध्ये रुजवलेली ही संकल्पना आता जनचळवळ बनली आहे.

यावर्षीच्या उपक्रमात सांस्कृतिक आणि मनोरंजनात्मक कार्यक्रमांची मोठी मेजवानी होती. स्ट्रॉबेरी इंग्लिश मिडियम स्कूल, श्री श्री रविशंकर विद्या मंदिर आणि शारदा विद्या मंदिर या शाळांच्या विद्यार्थ्यांनी गायन, पथनाट्य, मल्लखांब, वादन आणि योगाची उत्कृष्ट प्रात्यक्षिके सादर केली. झुंबा डान्सने उपस्थितांमध्ये उत्साह भरला, तर ओंकार केसेकर यांच्या मार्गदर्शनाखालील मल्लखांब सादरीकरण आणि अरविंद गाडेकर यांची व्यंगचित्रे आकर्षणाचे केंद्र ठरली. जय भोले ग्रुपच्या भजनाने वातावरण भक्तीमय झाले होते. बच्चे कंपनीसाठी ‘जायंट गोरिला’ विशेष आकर्षण ठरला. अक्षय वर्मा (वर्मा आर्टस्) यांनी रस्ते सुशोभीकरणाचे कठीण काम लिलया पेलले, तर लहान मुलांना खेळणी व खाऊचे वाटप करण्यात आले.

आमदार अमोल खताळ यांनी रोटरीच्या ४२ वर्षांच्या सामाजिक कार्याचा गौरव करत या उपक्रमाला शुभेच्छा दिल्या. तसेच माजी आमदार डॉ. सुधीर तांबे यांनी रोटरीच्या विशेषतः एकल महिलांसाठीच्या कार्याचे कौतुक करून, जीवन आनंदी ठेवण्याचे हे कार्य अत्यंत महत्त्वाचे असल्याचे प्रतिपादन केले.

हा सोहळा यशस्वी करण्यासाठी रोटरी क्लबचे अध्यक्ष विश्वनाथ मालाणी, सेक्रेटरी सौरभ म्हाळस, उपाध्यक्ष महेश वाकचौरे, खजिनदार संकेत काजळे, प्रकल्प प्रमुख समीर शहा, धीरज देशमुख, समन्वयक अजित काकडे, नरेंद्र चांडक, सीए संजय राठी, दिपक मणियार, राजेंद्र खोसे, भारतभूषण नावंदर, आनंद हासे, विकास लावरे आणि डॉ. किशोर पोखरकर यांच्यासह सर्व सदस्यांनी अथक परिश्रम घेतले. कार्यक्रमाचा समारोप पावणे दोन हजार चौरस फुटांच्या भव्य तिरंग्याच्या प्रदर्शनाने आणि ‘वंदे मातरम’च्या जयघोषाने झाला.

या उपक्रमाला मे. माधव गंगाधर काजळे अँड सन्स्, मायक्रोन एरोसोल, लॅव्हीप्युअर नेक्स्ट, राजपाल क्लॉथ स्टोअर्स, रॉयल इव्हेंट्स, गॅझेट हब, राजेंद्र होंडा, डॉ. सचदेव सोनोग्राफी सेंटर, साईरत्न पेंटिंग वर्क्स, संत गुलाब बाबा रंग भांडार, साईनाथ एल. साबळे अँड कंपनी, स्ट्रॉबेरी इंग्लिश मिडीयम स्कूल, सत्यम कॉम्प्युटर्स, साई आशिर्वाद व साई गजानन इंडस्ट्रीज, मोहित कॉम्प्युटर्स, पोखरकर नेत्रालय, चांडक पाईप हाऊस, विश्वविहार हॉलिडेज, खोसे कुल्फी आणि युवा पॉलिप्रिंट अँड पॅकेजिंग इंडस्ट्रीज यांनी मोलाचे सहकार्य केले.

anantpangarkar
Annant Ppangarkar

Views: 266
आनंदी रस्ते उपक्रम रोटरी क्लब
Share. Facebook Twitter Pinterest WhatsApp
Annant Ppangarkar
  • Website

Related Posts

“राजा किती क्रूर आणि खोटारडा आहे…” आई-बाळाची आर्त हाक अन् पोलिसांचा पाशवी हात; संजय राऊतांनी शेअर केलेल्या ‘त्या’ एका छायाचित्राने हादरवला महाराष्ट्र!

12/10/2026

MPSC आंदोलनाला डॉ. जयश्रीताई थोरात यांचा पाठिंबा; समाज आणि आयोगातील ब्लड कॅन्सर ठीक करायचाय!

10/10/2026

महात्मा गांधी हे भारतीय तत्त्वज्ञानाचे प्रतिबिंब: संदीप वाकचौरे

07/10/2026
Leave A Reply Cancel Reply

Document
Our Picks
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
Advertisement 1 Advertisement 2 Advertisement 3 Advertisement 4
Don't Miss
राशिभविष्य

गुरुवार, १५ ऑक्टोंबर — आजचा दिवस कसा असेल जाणून घ्या!

By Annant Ppangarkar15/10/20260

आजचे राशिभविष्य- मेष – घरात शुभ कार्याचे आयोजन होईल. वाहन विषयक काम मार्गी लागेल. एखादी…

संगमनेरच्या बाजारपेठेला मोठा दिलासा, दुष्काळाच्या संकटातही थोरात कारखान्याचा मोठा निर्णय; कामगारांना मिळणार इतका बोनस अन् सानुग्रह अनुदान; ऊस उत्पादकांना प्रतिटन एवढी मदत! लोकनेते बाळासाहेब थोरात यांची घोषणा

14/10/2026

रस्त्यावरील वादातून मारहाण, जीवे मारण्याची धमकी; संगमनेर न्यायालयाने सुनावली ही शिक्षा

14/10/2026

माझं गाव माझा अभिमान… राजापूर

14/10/2026
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow

तुमचे हक्काचे व्यासपीठ

Facebook YouTube
Our Picks
October 2026
M T W T F S S
 1234
567891011
12131415161718
19202122232425
262728293031  
« Sep    
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • पत्रकारिता
  • फोटो / गॅलरी
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
  • शेती व सहकार
  • सामाजिक
  • CONTACT US
  • ABOUT US
  • PRIVACY POLICY
© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.