Close Menu
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
What's Hot

अध्यात्म सांगणे सोपे, पण जगणे कठीण : नंदकुमार पोवार

June 10, 2026

धार्मिक कार्यानंतर नदीत पोहण्यासाठी गेलेल्या दोघांचा बुडून मृत्यू

June 10, 2026

आज बुधवार, १० जून २०२६ – कसा असेल तुमचा आजचा दिवस जाणून घ्या

June 10, 2026
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
Home » संगमनेरातील सराईत गो-तस्करांवर ‘मकोका’ अंतर्गत कारवाई करा; बजरंग दलाचे पोलीस प्रशासनाला निवेदन
गुन्हेगारी

संगमनेरातील सराईत गो-तस्करांवर ‘मकोका’ अंतर्गत कारवाई करा; बजरंग दलाचे पोलीस प्रशासनाला निवेदन

तालुक्यातील सर्व संशयित गो-तस्कर आणि कसायांची सविस्तर यादी तयार करून त्यांच्यावर तातडीने प्रतिबंधात्मक कारवाई करण्यात यावी, अशी आग्रही मागणी यावेळी करण्यात आली.
अनंत पांगारकरBy अनंत पांगारकरFebruary 24, 2026No Comments2 Mins Read
Facebook Twitter WhatsApp
Share
Facebook Twitter Email Telegram WhatsApp
संगमनेर | अनंत पांगारकर – 
संगमनेर शहर आणि तालुक्यामध्ये गेल्या काही दिवसांपासून गोवंश हत्या आणि अवैध मांस विक्रीचे प्रमाण वाढल्याने हिंदू संघटना आक्रमक झाल्या आहेत. या पार्श्वभूमीवर, तालुक्यातील सराईत कसाई आणि गो-तस्करांच्या विरोधात कठोर कायदेशीर पावले उचलून त्यांच्यावर महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण कायदा (MCOCA) आणि ‘एमपीडीए’ (MPDA) अंतर्गत कारवाई करावी, अशी मागणी बजरंग दलाच्या वतीने करण्यात आली आहे. यासंदर्भातील मागणीचे निवेदन उपविभागीय पोलीस अधिकारी डॉ. कुणाल सोनवणे, पोलीस निरीक्षक समीर बारवकर यांना देण्यात आले.
अहिल्यानगर जिल्ह्याला असलेला ऐतिहासिक आणि धार्मिक वारसा जपण्यासाठी गोवंश हत्या रोखणे आवश्यक असल्याचे निवेदनात नमूद करण्यात आले आहे. स्थानिक पोलीस आणि स्थानिक गुन्हे शाखेने अनेकदा कारवाया करून गोवंशाची सुटका केली असली, तरी संबंधित गुन्हेगार जामिनावर सुटल्यानंतर पुन्हा त्याच बेकायदेशीर कृत्यांमध्ये सहभागी होत असल्याचे समोर आले आहे. या सराईत गुन्हेगारांचे जाळे तोडण्यासाठी केवळ साधी कारवाई पुरेशी नसून, त्यांच्यावर संघटित गुन्हेगारीचे गुन्हे दाखल करण्याची आवश्यकता असल्याचे संघटनेने म्हटले आहे.
तालुक्यातील सर्व संशयित गो-तस्कर आणि कसायांची सविस्तर यादी तयार करून त्यांच्यावर तातडीने प्रतिबंधात्मक कारवाई करण्यात यावी, अशी आग्रही मागणी यावेळी करण्यात आली. प्रशासनाने या प्रकरणाचे गांभीर्य ओळखून वेळीच कठोर पावले उचलली नाहीत, तर तीव्र आंदोलन छेडले जाईल, असा इशाराही निवेदनातून देण्यात आला आहे.
हे निवेदन महाराष्ट्र प्रदेश गोरक्षा प्रमुख ऋषिकेश भागवत यांच्या नेतृत्वाखाली देण्यात आले. यावेळी विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दल संगमनेर प्रखंडाचे कुलदीप ठाकूर, सुरेश कालडा, ओमकार भालेराव, कृष्णा डंबीर, अनिकेत पवार, सागर पाटील, आकाश बनकर, चिराग साहू, साई ठाकूर, संतोष भोसले, गौरव वराडे आणि श्रीकांत मोरे यांच्यासह अनेक पदाधिकारी उपस्थित होते. या निवेदनाच्या प्रती मुख्यमंत्री, गृहमंत्री, जिल्ह्याचे पालकमंत्री आणि पोलीस अधीक्षक यांनाही माहिती व उचित कारवाईसाठी पाठवण्यात आल्या आहेत.

anantpangarkar
अनंत पांगारकर

Post Views: 683
गो हत्या निवेदन बजरंग दल
Share. Facebook Twitter Pinterest WhatsApp
अनंत पांगारकर
  • Website

Related Posts

…अन् थेट कोर्टातच झाली घोषणाबाजी!संगमनेरमधील ‘त्या’ प्रकाराने खळबळ, २० ते २५ जणांवर गुन्हा दाखल

June 9, 2026

पाच कोटींच्या सोने तस्करी प्रकरणी भाजप पदाधिकाऱ्यासह सात जणांना अटक

June 8, 2026

राजूर ‘फेक मर्डर केस’ : दोन पोलीस निरीक्षक निलंबित, DGP सदानंद दाते आढावा बैठक घेण्याची शक्यता

June 8, 2026
Leave A Reply Cancel Reply

Document
Our Picks
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
Advertisement 1 Advertisement 2 Advertisement 3 Advertisement 4
Don't Miss
धार्मिक

अध्यात्म सांगणे सोपे, पण जगणे कठीण : नंदकुमार पोवार

By अनंत पांगारकरJune 10, 20260

महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन संगमनेर: अध्यात्मावर बोलणे आणि त्याचा उपदेश करणे सोपे असते, मात्र त्यानुसार…

धार्मिक कार्यानंतर नदीत पोहण्यासाठी गेलेल्या दोघांचा बुडून मृत्यू

June 10, 2026

आज बुधवार, १० जून २०२६ – कसा असेल तुमचा आजचा दिवस जाणून घ्या

June 10, 2026

संगमनेरमधील भेसळखोरांना कोणाचे अभय? तुकाराम मुंढेंच्या धडक कारवाईनंतरही संगमनेरचे अन्न व औषध प्रशासन सुस्तच! शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे उपजिल्हाप्रमुख अमर कतारी यांचा प्रशासनाला सवाल; आंदोलनाचा इशारा

June 9, 2026
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow

तुमचे हक्काचे व्यासपीठ

Facebook YouTube
Our Picks
June 2026
M T W T F S S
1234567
891011121314
15161718192021
22232425262728
2930  
« May    
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • पत्रकारिता
  • फोटो / गॅलरी
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
  • शेती व सहकार
  • सामाजिक
  • CONTACT US
  • ABOUT US
  • PRIVACY POLICY
© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.