Close Menu
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
What's Hot

संगमनेर महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. अरुण गायकवाड यांना ‘डॉ. जे. पी. नाईक आदर्श राज्य शिक्षक पुरस्कार’ प्रदान

06/09/2026

महात्मा फुले जन्मद्विशताब्दी निमित्त संगमनेरात उद्या प्रा. डॉ. शरद बाविस्कर यांचे ‘अस्वस्थ भारताचे अंतरंग’ विषयावर व्याख्यान

06/09/2026

आज रविवार, ०६ सप्टेंबर २०२६ — तुमचा आजचा दिवस कसा असेल, जाणून घ्या

06/09/2026
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
Home » संगमनेर नगरपालिकेतर्फे १५०० जन्म-मृत्यू दाखल्यांचे तातडीने वाटप; नगराध्यक्षा डॉ. मैथिलीताई तांबे यांच्या पुढाकाराने नागरिकांना दिलासा
राजकारण

संगमनेर नगरपालिकेतर्फे १५०० जन्म-मृत्यू दाखल्यांचे तातडीने वाटप; नगराध्यक्षा डॉ. मैथिलीताई तांबे यांच्या पुढाकाराने नागरिकांना दिलासा

जन्म-मृत्यू विभागात अनेक प्रकरणे प्रलंबित राहिल्याने नागरिकांची मोठी वर्दळ होत असे. यातूनच काही वेळा नागरिक व कर्मचारी यांच्यात वादाचे प्रसंगही ओढवत होते.
Annant PpangarkarBy Annant Ppangarkar26/02/2026No Comments2 Mins Read
Facebook Twitter WhatsApp
Share
Facebook Twitter Email Telegram WhatsApp

संगमनेर, प्रतिनिधी –
प्रशासकीय राजवटीच्या कालखंडानंतर नव्याने पदभार स्वीकारताच संगमनेरच्या नगराध्यक्षा डॉ. मैथिलीताई तांबे यांनी नागरिकांच्या प्रलंबित प्रश्नांची तातडीने सोडवणूक करण्यास सुरुवात केली आहे. नगरपालिकेच्या जन्म-मृत्यू विभागात अनेक दिवसांपासून रखडलेल्या सुमारे १५०० दाखल्यांचे विशेष मोहीम राबवून तातडीने वितरण करण्यात आले आहे. या निर्णयामुळे शहरातून आणि बाहेरगावावरून येणाऱ्या अनेक नागरिकांना मोठा दिलासा मिळाला असून प्रशासकीय कामकाजाला गती मिळाली आहे.
लोकनेते बाळासाहेब थोरात, माजी आमदार डॉ. सुधीर तांबे व आमदार सत्यजित तांबे यांच्या मार्गदर्शनाखाली संगमनेर सेवा समितीच्या सर्व नवनिर्वाचित नगराध्यक्ष व नगरसेवकांनी शहरवासीयांना दर्जेदार सुविधा देण्याचे धोरण आखले आहे. प्रशासकीय काळात विविध विभागांतील कर्मचाऱ्यांची संख्या कमी असल्याने कार्यरत असलेल्या कर्मचाऱ्यांवर कामाचा अतिरिक्त भार होता. परिणामी, जन्म-मृत्यू विभागात अनेक प्रकरणे प्रलंबित राहिल्याने नागरिकांची मोठी वर्दळ होत असे. यातूनच काही वेळा नागरिक व कर्मचारी यांच्यात वादाचे प्रसंगही ओढवत होते. ही बाब गांभीर्याने घेत नगराध्यक्षा डॉ. मैथिलीताई तांबे यांनी तातडीने पुढाकार घेतला आणि शहरातील रुग्णालयांमध्ये जन्म झालेल्या व मृत पावलेल्या व्यक्तींची नोंदणी करण्यासाठी विशेष मोहीम राबवली.
या मोहिमेअंतर्गत प्रलंबित असलेल्या पंधराशे नोंदी पूर्ण करून नागरिकांना दाखल्यांचे वाटप करण्यात आले आहे. केवळ दाखले वाटप करून न थांबता, नगराध्यक्षा डॉ. मैथिलीताई तांबे व मुख्याधिकारी दयानंद गोरे यांनी यापुढील काळातही नागरिकांना जन्म-मृत्यूचे दाखले त्वरित मिळावेत, यादृष्टीने सर्व संबंधित कर्मचाऱ्यांना कडक सूचना दिल्या आहेत. प्रशासनातील रिक्त जागा आणि कामाचा ताण असूनही लोकप्रतिनिधींनी घेतलेल्या या तत्पर निर्णयाचे शहरातून कौतुक होत आहे. या कार्याची दखल घेऊन संगमनेरच्या नागरिकांनी नगराध्यक्षांसह उपनगराध्यक्ष नूर मोहम्मद शेख व मुख्याधिकारी दयानंद गोरे यांचे विशेष आभार मानले आहेत.

anantpangarkar
Annant Ppangarkar

Post Views: 412
जन्ममृत्यू दाखले दयानंद गोरे मैथिली तांबे संगमनेर नगरपरिषद
Share. Facebook Twitter Pinterest WhatsApp
Annant Ppangarkar
  • Website

Related Posts

संगमनेर शहरात वाढणार सीसीटीव्हीची नजर; विविध विकासकामांचे सोमवारी बाळासाहेब थोरात यांच्या हस्ते होणार लोकार्पण

05/09/2026

अधिकृत आदेश नसताना भारनियमन कोणाच्या दबावाखाली? महावितरणच्या कारभारावर काँग्रेस कार्याध्यक्ष अमोल शेलकरांचा हल्लाबोल

05/09/2026

आमदार अमोल खताळ यांच्या सूचनेनंतर लोहारे-कासारे पाझर तलावातून पाण्याचा विसर्ग सुरू

30/08/2026
Leave A Reply Cancel Reply

Document
Our Picks
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
Advertisement 1 Advertisement 2 Advertisement 3 Advertisement 4
Don't Miss
पुरस्कार

संगमनेर महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. अरुण गायकवाड यांना ‘डॉ. जे. पी. नाईक आदर्श राज्य शिक्षक पुरस्कार’ प्रदान

By Annant Ppangarkar06/09/20260

Annant Ppangarkar महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात पार पडलेल्या दिमाखदार सोहळ्यात महाराष्ट्र…

महात्मा फुले जन्मद्विशताब्दी निमित्त संगमनेरात उद्या प्रा. डॉ. शरद बाविस्कर यांचे ‘अस्वस्थ भारताचे अंतरंग’ विषयावर व्याख्यान

06/09/2026

आज रविवार, ०६ सप्टेंबर २०२६ — तुमचा आजचा दिवस कसा असेल, जाणून घ्या

06/09/2026

रविवार विशेष लेख — बोगस जीडीपीचा फज्जा…!

06/09/2026
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow

तुमचे हक्काचे व्यासपीठ

Facebook YouTube
Our Picks
September 2026
M T W T F S S
 123456
78910111213
14151617181920
21222324252627
282930  
« Aug    
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • पत्रकारिता
  • फोटो / गॅलरी
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
  • शेती व सहकार
  • सामाजिक
  • CONTACT US
  • ABOUT US
  • PRIVACY POLICY
© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.