Close Menu
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
What's Hot

राज्यात सरसकट दुष्काळ जाहीर करा; माजी कृषिमंत्री बाळासाहेब थोरात यांची मागणी, रेल्वेप्रश्नी लोकप्रतिनिधीच्या बालिश वक्तव्यावरही केले भाष्य

19/09/2026

थोरात कारखान्याचे ११ लाख मेट्रिक टनाचे गाळप उद्दिष्ट; बॉयलर अग्नीप्रदीपन समारंभात बाळासाहेब थोरात यांचे आवाहन

19/09/2026

बेकायदेशीर गॅस रिफिलींगच्या मोठ्या रॅकेटचा पर्दाफाश; २१.८० लाखांच्या मुद्देमालासह १३३ टाक्या जप्त

19/09/2026
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
Home » गुरु-शिष्याच्या नात्याला काळिमा: संगमनेर तालुक्यात अल्पवयीन विद्यार्थिनीवर अत्याचार, आरोपी शिक्षकाला अटक
गुन्हेगारी

गुरु-शिष्याच्या नात्याला काळिमा: संगमनेर तालुक्यात अल्पवयीन विद्यार्थिनीवर अत्याचार, आरोपी शिक्षकाला अटक

या अमानवी घटनेमुळे संपूर्ण संगमनेर तालुक्यात तीव्र संताप व्यक्त केला जात असून, आरोपी शिक्षकाला कठोर शिक्षा व्हावी अशी मागणी नागरिकांकडून होत आहे.
Annant PpangarkarBy Annant Ppangarkar03/03/2026No Comments2 Mins Read
Facebook Twitter WhatsApp
Share
Facebook Twitter Email Telegram WhatsApp

संगमनेर, प्रतिनिधी –
गुरु-शिष्याच्या पवित्र नात्याला काळिमा फासणारी एक अत्यंत संतापजनक घटना संगमनेर तालुक्यातील पठार भागातून समोर आली आहे. एका नामांकित शाळेत इयत्ता नववीत शिकणाऱ्या १५ वर्षीय अल्पवयीन विद्यार्थिनीवर त्याच शाळेतील शिक्षकाने वारंवार लैंगिक अत्याचार केल्याचे उघड झाले असून, या अत्याचारामुळे पीडित मुलगी गरोदर राहिली आहे. याप्रकरणी घारगाव पोलिसांनी तत्परता दाखवत आरोपी शिक्षक अमोल बाबासाहेब भोसले (रा. वरवंडी, ता. संगमनेर) याला बेड्या ठोकल्या आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, पीडित मुलगी साकूर परिसरात आपल्या कुटुंबासह वास्तव्यास आहे. तिचे आई-वडील उदरनिर्वाहासाठी घरापासून काही अंतरावर असलेल्या कपड्याच्या दुकानात कामाला जात असल्याने ती अनेकदा घरी एकटीच असायची. कौटुंबिक कारणातून ती काहीशी मानसिक तणावात होती, याच बाबीचा गैरफायदा आरोपी शिक्षक अमोल भोसले याने घेतला. त्याने मुलीशी जवळीक साधून तिच्या आईच्या मोबाईलवर फोन करून तिला प्रेमाच्या जाळ्यात ओढले. त्यानंतर ऑक्टोबर २०२४ ते जानेवारी २०२६ या कालावधीत मुलगी घरी एकटी असताना त्याने तिच्यावर वारंवार अत्याचार केले.
काही दिवसांपूर्वी पीडित मुलीच्या पोटात दुखू लागल्याने पालकांनी तिला उपचारासाठी खासगी रुग्णालयात नेले होते. वैद्यकीय तपासणी दरम्यान ती गरोदर असल्याचे निष्पन्न होताच पालकांना मोठा धक्का बसला. या घटनेची माहिती मिळताच पालकांनी घारगाव पोलीस ठाण्यात धाव घेऊन तक्रार दाखल केली. पोलिसांनी घटनेचे गांभीर्य ओळखून आरोपी शिक्षकाविरुद्ध बलात्कार आणि पोक्सो (Pocso) कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करून त्याला तातडीने अटक केली आहे.
या अमानवी घटनेमुळे संपूर्ण संगमनेर तालुक्यात तीव्र संताप व्यक्त केला जात असून, आरोपी शिक्षकाला कठोर शिक्षा व्हावी अशी मागणी नागरिकांकडून होत आहे. या प्रकरणाचा अधिक तपास घारगाव पोलीस करत आहेत.

anantpangarkar
Annant Ppangarkar

Post Views: 1,015
अल्पवयीन मुलीवर अत्याचार गुन्हेगारी घारगाव पोलीस
Share. Facebook Twitter Pinterest WhatsApp
Annant Ppangarkar
  • Website

Related Posts

बेकायदेशीर गॅस रिफिलींगच्या मोठ्या रॅकेटचा पर्दाफाश; २१.८० लाखांच्या मुद्देमालासह १३३ टाक्या जप्त

19/09/2026

संगमनेरमधील वादग्रस्त ड्रग प्रकरण अखेर स्थानिक गुन्हे शाखेकडे; मात्र निर्दोषाला गोवणाऱ्या खाकी वर्दीतील ‘त्या’ अधिकाऱ्यावर कारवाई कधी?

18/09/2026

अवैध वाळू तस्करांवर एलसीबीचा दणका; ३० लाख ४० हजारांचा मुद्देमाल जप्त, ३ आरोपींना बेड्या

18/09/2026
Leave A Reply Cancel Reply

Document
Our Picks
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
Advertisement 1 Advertisement 2 Advertisement 3 Advertisement 4
Don't Miss
शेती व सहकार

राज्यात सरसकट दुष्काळ जाहीर करा; माजी कृषिमंत्री बाळासाहेब थोरात यांची मागणी, रेल्वेप्रश्नी लोकप्रतिनिधीच्या बालिश वक्तव्यावरही केले भाष्य

By Annant Ppangarkar19/09/20260

महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन – राज्यामध्ये गेल्या अनेक दिवसांपासून पावसाने ओढ दिल्याने पिके जळून खाक…

थोरात कारखान्याचे ११ लाख मेट्रिक टनाचे गाळप उद्दिष्ट; बॉयलर अग्नीप्रदीपन समारंभात बाळासाहेब थोरात यांचे आवाहन

19/09/2026

बेकायदेशीर गॅस रिफिलींगच्या मोठ्या रॅकेटचा पर्दाफाश; २१.८० लाखांच्या मुद्देमालासह १३३ टाक्या जप्त

19/09/2026

सुफियाना सुरावटींनी संगमनेरकर रसिक मंत्रमुग्ध; ‘सजदा’ सोहळ्याने संगमनेर फेस्टिव्हलची रंगली तिसरी संध्याकाळ

19/09/2026
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow

तुमचे हक्काचे व्यासपीठ

Facebook YouTube
Our Picks
September 2026
M T W T F S S
 123456
78910111213
14151617181920
21222324252627
282930  
« Aug    
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • पत्रकारिता
  • फोटो / गॅलरी
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
  • शेती व सहकार
  • सामाजिक
  • CONTACT US
  • ABOUT US
  • PRIVACY POLICY
© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.