Close Menu
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
What's Hot

१९७२ पेक्षा भयावह दुष्काळ; राजकारण बाजूला ठेवून जनतेला दिलासा द्या, मागेल त्याला पिण्याच्या पाण्याचे टँकर द्या – सत्यजित तांबे यांचे अधिकाऱ्यांना निर्देश

15/10/2026

गुरुवार, १५ ऑक्टोंबर — आजचा दिवस कसा असेल जाणून घ्या!

15/10/2026

संगमनेरच्या बाजारपेठेला मोठा दिलासा, दुष्काळाच्या संकटातही थोरात कारखान्याचा मोठा निर्णय; कामगारांना मिळणार इतका बोनस अन् सानुग्रह अनुदान; ऊस उत्पादकांना प्रतिटन एवढी मदत! लोकनेते बाळासाहेब थोरात यांची घोषणा

14/10/2026
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
Home » अवैध धंदे मोडून काढण्यासाठी लवकरच विशेष ‘हेल्पलाईन’; तक्रारदाराची ओळख राहणार गुप्त – पालकमंत्री डॉ. राधाकृष्ण विखे पाटील
राजकारण

अवैध धंदे मोडून काढण्यासाठी लवकरच विशेष ‘हेल्पलाईन’; तक्रारदाराची ओळख राहणार गुप्त – पालकमंत्री डॉ. राधाकृष्ण विखे पाटील

जिल्ह्यातील गुन्हेगारीवर नियंत्रण मिळवण्यासाठी सीसीटीव्ही यंत्रणेचे जाळे विस्तारले जात असून...
Annant PpangarkarBy Annant Ppangarkar03/03/2026No Comments2 Mins Read
Facebook Twitter WhatsApp
Share
Facebook Twitter Email Telegram WhatsApp

कोपरगाव:
जिल्ह्यात कायदा व सुव्यवस्था अधिक मजबूत करण्यासाठी आणि गुन्हेगारी प्रवृत्तींना मिळणारा आश्रय पूर्णपणे नष्ट करण्यासाठी प्रशासन कटिबद्ध आहे. नागरिकांच्या मनातील भीती दूर करून त्यांना थेट प्रशासनाशी जोडण्याच्या उद्देशाने लवकरच एक विशेष ‘हेल्पलाईन’ क्रमांक सुरू करण्यात येईल. या हेल्पलाईनद्वारे तक्रार करणाऱ्या नागरिकाची ओळख पूर्णपणे गुप्त ठेवून दोषींवर कठोर कायदेशीर कारवाई केली जाईल, अशी ग्वाही राज्याचे जलसंपदामंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री डॉ. राधाकृष्ण विखे पाटील यांनी दिली.
कोपरगाव तालुका पोलीस ठाण्याच्या नूतन इमारतीचे आणि पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांसाठी बांधण्यात आलेल्या ६४ निवासस्थानांच्या लोकार्पण सोहळ्यात ते बोलत होते. यावेळी पोलीस दलाच्या ताफ्यात दाखल झालेल्या चार अत्याधुनिक फॉरेन्सिक लॅब व्हॅनचेही लोकार्पण करण्यात आले.
या कार्यक्रमास आमदार आशुतोष काळे, माजी आमदार स्नेहलता कोल्हे, पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.
पालकमंत्री पुढे म्हणाले की, राज्य शासनाने पोलिसांच्या कल्याणासाठी गृहनिर्माण प्रकल्पांना विशेष प्राधान्य दिले आहे. जिल्हा मुख्यालयात ३२२ निवासस्थानांचे काम प्रगतीपथावर असून कोपरगाव आणि पाथर्डी येथील कामे पूर्ण झाली आहेत. समृद्धी महामार्ग आणि राष्ट्रीय महामार्गांमुळे वाढणारी अंमली पदार्थांची तस्करी आणि गुन्हेगारी रोखण्यासाठी पोलीस दलाचे मनुष्यबळ वाढवणे गरजेचे आहे, त्यासाठी ५०० अतिरिक्त पोलीस कर्मचाऱ्यांची मागणी शासनाकडे करण्यात आली आहे.
जिल्ह्यातील गुन्हेगारीवर नियंत्रण मिळवण्यासाठी सीसीटीव्ही यंत्रणेचे जाळे विस्तारले जात असून सर्व महाविद्यालयांच्या परिसरात कॅमेरे बसवण्याचे नियोजन जिल्हा नियोजन मंडळामार्फत करण्यात आले आहे. ग्रामपंचायतींनीही लोकसहभागातून आपापल्या गावांत सीसीटीव्ही बसवून सुरक्षा वाढवावी, असे आवाहन त्यांनी केले. गुन्ह्यांचा तपास जलद व्हावा आणि पुराव्यांशी छेडछाड होऊ नये यासाठी उपविभागीय स्तरावर उपलब्ध करून दिलेल्या ‘फॉरेन्सिक व्हॅन’ मैलाचा दगड ठरतील, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.
आमदार आशुतोष काळे यांनी तालुक्यातील अवैध दारूविक्री व इतर बेकायदेशीर धंद्यांवर कठोर कारवाईची मागणी केली. पोलीस ठाण्याच्या सुसज्ज इमारतीमुळे पोलीस दलाची कार्यक्षमता वाढेल, असेही त्यांनी नमूद केले. कार्यक्रमाच्या शेवटी प्रातिनिधिक स्वरूपात पोलीस कर्मचाऱ्यांना घरांच्या चाव्या सुपूर्द करण्यात आल्या. पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे यांनी प्रास्ताविक केले, तर पोलीस निरीक्षक संदीप काळे यांनी उपस्थितांचे आभार मानले.

anantpangarkar
Annant Ppangarkar

Views: 520
पोलीस निवासस्थान पोलीस नूतन इमारत राधाकृष्ण विखे
Share. Facebook Twitter Pinterest WhatsApp
Annant Ppangarkar
  • Website

Related Posts

नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना आर्थिक मदत कधी मिळणार? आमदार अमोल खताळांनी दिली ही माहिती

13/10/2026

संगमनेर आगारात आणखी पाच इलेक्ट्रिक शिवाई बसेस; जिल्ह्यांतर्गत मार्गांवर धावणार

12/10/2026

दिल्लीतील भव्य आंदोलनात बाळासाहेब थोरात यांचा सहभाग: लोकशाही आणि संविधान वाचवण्यासाठी मुख्य निवडणूक आयुक्तांचा राजीनामा आवश्यक

12/10/2026
Leave A Reply Cancel Reply

Document
Our Picks
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
Advertisement 1 Advertisement 2 Advertisement 3 Advertisement 4
Don't Miss
बैठक

१९७२ पेक्षा भयावह दुष्काळ; राजकारण बाजूला ठेवून जनतेला दिलासा द्या, मागेल त्याला पिण्याच्या पाण्याचे टँकर द्या – सत्यजित तांबे यांचे अधिकाऱ्यांना निर्देश

By Annant Ppangarkar15/10/20260

महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन- संगमनेर तालुका विस्ताराने मोठा असून यंदा पावसात झालेल्या मोठ्या घटीमुळे तालुक्यात…

गुरुवार, १५ ऑक्टोंबर — आजचा दिवस कसा असेल जाणून घ्या!

15/10/2026

संगमनेरच्या बाजारपेठेला मोठा दिलासा, दुष्काळाच्या संकटातही थोरात कारखान्याचा मोठा निर्णय; कामगारांना मिळणार इतका बोनस अन् सानुग्रह अनुदान; ऊस उत्पादकांना प्रतिटन एवढी मदत! लोकनेते बाळासाहेब थोरात यांची घोषणा

14/10/2026

रस्त्यावरील वादातून मारहाण, जीवे मारण्याची धमकी; संगमनेर न्यायालयाने सुनावली ही शिक्षा

14/10/2026
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow

तुमचे हक्काचे व्यासपीठ

Facebook YouTube
Our Picks
October 2026
M T W T F S S
 1234
567891011
12131415161718
19202122232425
262728293031  
« Sep    
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • पत्रकारिता
  • फोटो / गॅलरी
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
  • शेती व सहकार
  • सामाजिक
  • CONTACT US
  • ABOUT US
  • PRIVACY POLICY
© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.