Close Menu
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
What's Hot

कर्ज वसुलीच्या नावाखाली संगमनेरात महिलेचा विनयभंग; आरोपीवर गुन्हा दाखल

15/10/2026

‘ब्रिक्स’ आंतरराष्ट्रीय महोत्सवात संगमनेरी योगवैभव! अहमदाबादेत ध्रुव ग्लोबलच्या १० खेळाडूंनी घडवले योगपरंपरेचे दर्शन

15/10/2026

१९७२ पेक्षा भयावह दुष्काळ; राजकारण बाजूला ठेवून जनतेला दिलासा द्या, मागेल त्याला पिण्याच्या पाण्याचे टँकर द्या – सत्यजित तांबे यांचे अधिकाऱ्यांना निर्देश

15/10/2026
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
Home » संगमनेरात ३३ KV वीज वाहिनीच्या विरोधात एल्गार; बाधित शेतकरी व नागरिक कृती समितीचे उद्यापासून साखळी उपोषण
आंदोलन

संगमनेरात ३३ KV वीज वाहिनीच्या विरोधात एल्गार; बाधित शेतकरी व नागरिक कृती समितीचे उद्यापासून साखळी उपोषण

भविष्यात होणारी जीवितहानी आणि मालमत्तेचे नुकसान टाळण्यासाठी ही ३३ KV ची वाहिनी तातडीने सुरक्षित अंतरावर हलवण्यात यावी, अशी प्रमुख मागणी आंदोलनकर्त्यांनी केली आहे
Annant PpangarkarBy Annant Ppangarkar05/03/2026No Comments2 Mins Read
Facebook Twitter WhatsApp
Share
Facebook Twitter Email Telegram WhatsApp

संगमनेर, प्रतिनिधी-
संगमनेर शहर आणि परिसरातील गावांतून बेकायदेशीरपणे टाकण्यात आलेल्या ३३ KV वीज वाहिनीमुळे नागरिकांच्या सुरक्षेचा आणि पिण्याच्या पाण्याचा प्रश्न गंभीर बनला आहे. या धोकादायक वीज वाहिनीच्या विरोधात ‘३३ KV बाधित शेतकरी व नागरिक कृती समिती’ आक्रमक झाली असून, उद्या शुक्रवार, ६ मार्च २०२६ रोजी महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनीच्या संगमनेर कार्यालयासमोर साखळी उपोषण करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. या संदर्भात समितीने स्थानिक लोकप्रतिनिधींना निवेदन देऊन या प्रकरणात तातडीने हस्तक्षेप करण्याची मागणी केली आहे.
संगमनेर शहर १३२ KV ते धांदरफळ दरम्यान ही वीज वाहिनी टाकण्याचे काम सध्या सुरू आहे. मात्र, ही वाहिनी टाकताना अनेक गंभीर नियमबाह्य बाबी समोर आल्याचा आरोप समितीने केला आहे. शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या निळवंडे पाईपलाईनवरच अत्यंत धोकादायक पद्धतीने वीज खांब उभे करण्यात आले असून, यामुळे भविष्यात पाईपलाईनची देखभाल किंवा दुरुस्ती करताना मोठा अडथळा निर्माण होऊ शकतो, तसेच अपघाताची टांगती तलवार कायम राहणार आहे. राजापूर, मंगळापूर, चिखली आणि धांदरफळ या गावांच्या हद्दीतून ही वाहिनी जात असताना स्थानिक ग्रामपंचायतींची परवानगी डावलण्यात आली असून नागरिकांची घरे, गोठे, शाळा, मंदिरे आणि स्मशानभूमीच्या अत्यंत जवळून ही उच्च दाबाची वाहिनी नेण्यात आली आहे.
विशेष म्हणजे, कोल्हार-घोटी या राज्य महामार्गाच्या लगत आधीच अस्तित्वात असलेल्या ११ KV च्या वाहिन्या, पथदिवे आणि शेती पंपांच्या तारांमध्येच हे नवीन ३३ KV चे खांब घुसवण्यात आले आहेत. यामुळे या भागातील संपूर्ण वीज वितरण व्यवस्था विस्कळीत होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. या गंभीर प्रकाराची दखल घेत गुंजाळवाडी, राजापूर, चिखली आणि धांदरफळ बुद्रुक या ग्रामपंचायतींनी दिलेली नाहरकत प्रमाणपत्रे (NOC) रद्द केली आहेत. चिखली ग्रामपंचायतीने तर थेट मुख्यमंत्र्यांकडे हे काम थांबवण्याची लेखी मागणी केली आहे. संगमनेर नगरपरिषदेच्या मुख्याधिकाऱ्यांनी देखील जुलै २०२५ मध्ये महावितरणला दोन वेळा पत्र देऊन हे खांब स्थलांतरित करण्याच्या सूचना दिल्या होत्या, परंतु महावितरणने त्याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष केल्याचे दिसून येत आहे.
भविष्यात होणारी जीवितहानी आणि मालमत्तेचे नुकसान टाळण्यासाठी ही ३३ KV ची वाहिनी तातडीने सुरक्षित अंतरावर हलवण्यात यावी, अशी प्रमुख मागणी आंदोलनकर्त्यांनी केली आहे. महावितरण आणि संबंधित खाजगी कंपनीच्या मनमानी कारभाराचा निषेध करण्यासाठी उद्या सकाळी ११ वाजल्यापासून हे आंदोलन सुरू होणार आहे. जोपर्यंत या बेकायदेशीर कामाला स्थगिती मिळत नाही आणि खांब सुरक्षित ठिकाणी हलवण्याचा ठोस निर्णय घेतला जात नाही, तोपर्यंत लढा सुरूच ठेवण्याचा निर्धार कृती समितीने व्यक्त केला आहे. या आंदोलनाकडे आता प्रशासन आणि लोकप्रतिनिधी कशा प्रकारे लक्ष देतात, याकडे लक्ष लागले आहे.

anantpangarkar
Annant Ppangarkar

Views: 848
33 केव्ही उच्चदाब ओव्हरहेड वीज वाहिनी साखळी उपोषण
Share. Facebook Twitter Pinterest WhatsApp
Annant Ppangarkar
  • Website

Related Posts

मतचोरी अन् ‘SIR’च्या घोटाळ्याविरोधात संगमनेरमध्ये उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेसह समविचारी पक्षांचा घणाघात; माजी खासदार खैरे, जिल्हाप्रमुख कोते पाटलांच्या नेतृत्वात रस्ता रोको करत निवडणूक आयोगाचा तीव्र निषेध

14/10/2026

मतचोरी अन् ‘SIR’च्या घोटाळ्याविरोधात संगमनेरमध्ये उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेसह समविचारी पक्षांचा घणाघात; माजी खासदार खैरे, जिल्हाप्रमुख कोते पाटलांच्या नेतृत्वात रस्ता रोको करत निवडणूक आयोगाचा तीव्र निषेध

14/10/2026

दुष्काळग्रस्तांकडून सक्तीची वीज बिल वसुली थांबवा; अन्यथा आंदोलन — शिवसेना ठाकरे शहर प्रमुख अमित चव्हाण

08/10/2026
Leave A Reply Cancel Reply

Document
Our Picks
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
Advertisement 1 Advertisement 2 Advertisement 3 Advertisement 4
Don't Miss
गुन्हेगारी

कर्ज वसुलीच्या नावाखाली संगमनेरात महिलेचा विनयभंग; आरोपीवर गुन्हा दाखल

By Annant Ppangarkar15/10/20260

महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन- खाजगी बँकेच्या कर्जाचा हप्ता भरण्यासाठी सतत फोन करून धमकावणे, घरी येऊन…

‘ब्रिक्स’ आंतरराष्ट्रीय महोत्सवात संगमनेरी योगवैभव! अहमदाबादेत ध्रुव ग्लोबलच्या १० खेळाडूंनी घडवले योगपरंपरेचे दर्शन

15/10/2026

१९७२ पेक्षा भयावह दुष्काळ; राजकारण बाजूला ठेवून जनतेला दिलासा द्या, मागेल त्याला पिण्याच्या पाण्याचे टँकर द्या – सत्यजित तांबे यांचे अधिकाऱ्यांना निर्देश

15/10/2026

गुरुवार, १५ ऑक्टोंबर — आजचा दिवस कसा असेल जाणून घ्या!

15/10/2026
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow

तुमचे हक्काचे व्यासपीठ

Facebook YouTube
Our Picks
October 2026
M T W T F S S
 1234
567891011
12131415161718
19202122232425
262728293031  
« Sep    
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • पत्रकारिता
  • फोटो / गॅलरी
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
  • शेती व सहकार
  • सामाजिक
  • CONTACT US
  • ABOUT US
  • PRIVACY POLICY
© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.