Close Menu
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
What's Hot

“गंभीर दुष्काळाने साखर कारखानदारी अडचणीत; सरकारने तातडीने मदत करावी” – बाळासाहेब थोरात यांची जोरदार मागणी

14/10/2026

‘ये पब्लिक है, सब जानती है!’ — निळवंडेच्या पाण्याचे श्रेय लाटणाऱ्याना संगमनेरची जनता निवडणुकीत देणार सडेतोड उत्तर; अमोल शेलकर यांचा घणाघात

14/10/2026

सरकारी जमिनीवर अतिक्रमण! प्रशासनाचा डोळेझाक कारभार; अधिकाऱ्यांना सरकारी मालमत्ता सांभाळता येईना

14/10/2026
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
Home » शासकीय निधीची वाट न पाहता वर्षभरात शिवस्मारक असे पूर्ण करणार; आमदार सत्यजित तांबे यांचा निर्धार
महाराष्ट्र संवाद विशेष

शासकीय निधीची वाट न पाहता वर्षभरात शिवस्मारक असे पूर्ण करणार; आमदार सत्यजित तांबे यांचा निर्धार

तीन दिवस चालणाऱ्या या मोहिमेच्या पहिल्याच दिवशी ६,११३ नागरिकांनी आपल्या पसंतीचा पर्याय निवडून या उपक्रमाला मोठा पाठिंबा दर्शवला आहे. जनतेच्या बहुमताचा आदर करूनच स्मारकाचे अंतिम स्वरूप निश्चित केले जाईल
Annant PpangarkarBy Annant Ppangarkar06/03/2026No Comments2 Mins Read
Facebook Twitter WhatsApp
Share
Facebook Twitter Email Telegram WhatsApp

संगमनेर, प्रतिनिधी-
संगमनेर शहराच्या वैभवात भर घालणाऱ्या हायटेक बसस्थानकासमोर छत्रपती शिवाजी महाराजांचे भव्य आणि देखणे स्मारक उभारण्यासाठी शासनाकडून निधीची मागणी केलेली आहेच; मात्र शासन निधी देण्यास विलंब करत असेल तर केवळ त्यांच्यावर अवलंबून न राहता लोकवर्गणी, नगरपरिषद, आमदार निधी आणि जिल्हा नियोजन समितीच्या माध्यमातून येत्या वर्षभरात हे स्मारक पूर्ण केले जाईल, असा निर्धार आमदार सत्यजित तांबे यांनी व्यक्त केला आहे.
संगमनेर नगरपरिषदेच्या वतीने स्मारकाच्या स्वरूपाबाबत आयोजित करण्यात आलेल्या नागरिक मत नोंदणी अभियानाच्या शुभारंभ प्रसंगी ते बोलत होते. या मोहिमेला संगमनेरकरांनी पहिल्याच दिवशी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला असून, हजारो नागरिकांनी आपले मत नोंदवले आहे.
आमदार सत्यजित तांबे यांनी यावेळी स्मारकाच्या आतापर्यंतच्या प्रवासावर सविस्तर प्रकाश टाकला. ते म्हणाले की, संगमनेरकरांच्या इच्छेनुसार या स्मारकासाठी माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांनी सर्वप्रथम पाठपुरावा सुरू केला होता. २०१८ मध्ये तत्कालीन नगराध्यक्षा दुर्गाताई तांबे यांच्या कार्यकाळात नगरपरिषदेने याचा पहिला प्रस्ताव तयार केला होता. त्यानंतर २०१९ मध्ये महाविकास आघाडी सरकार असताना या कामाला खऱ्या अर्थाने गती मिळाली आणि २०२३ मध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या माध्यमातून बसस्थानकाची जागा स्मारकासाठी मंजूर करून घेण्यात आली. सध्या जे लोक स्मारकाची अचानक मागणी करत आहेत, ते या दीर्घ प्रक्रियेच्या सुरुवातीला कुठेच नव्हते, असा टोलाही त्यांनी यावेळी विरोधकांना लगावला.
छत्रपती शिवाजी महाराज हे १८ पगड जातींचे आणि बारा बलुतेदारांचे आराध्य दैवत असून, त्यांचे हे स्मारक संगमनेरची अस्मिता ठरेल. संगमनेर सेवा समितीने पहिल्याच बैठकीत महापुरुषांची स्मारके उभारण्याचा जो ठराव घेतला, तो अत्यंत कौतुकास्पद असल्याचेही आमदार तांबे यांनी यावेळी नमूद केले.
याप्रसंगी नगराध्यक्षा डॉ. मैथिलीताई तांबे यांनी सांगितले की, संगमनेर हे एक सुसंस्कृत शहर असून शहराच्या विकासकामात नागरिकांचा थेट सहभाग असावा, या लोकशाहीवादी हेतूने ही मत नोंदणी प्रक्रिया राबवली जात आहे. स्मारकासाठी ‘अश्वारूढ स्मारक’, ‘भव्य उभे स्मारक’ आणि ‘सिंहासनाधीश्वर पूर्णाकृती स्मारक’ असे तीन पर्याय नागरिकांसमोर ठेवण्यात आले आहेत.
तीन दिवस चालणाऱ्या या मोहिमेच्या पहिल्याच दिवशी ६,११३ नागरिकांनी आपल्या पसंतीचा पर्याय निवडून या उपक्रमाला मोठा पाठिंबा दर्शवला आहे. जनतेच्या बहुमताचा आदर करूनच स्मारकाचे अंतिम स्वरूप निश्चित केले जाईल, असे आश्वासनही प्रशासनाकडून देण्यात आले.
या कार्यक्रमाला माजी आमदार डॉ. सुधीर तांबे, माजी नगराध्यक्ष दुर्गाताई तांबे, युवक काँग्रेसच्या अध्यक्ष डॉ. जयश्रीताई थोरात, उपनगराध्यक्ष नूर मोहम्मद शेख यांच्यासह नगरपरिषदेचे पदाधिकारी, विविध संघटनांचे प्रतिनिधी आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

anantpangarkar
Annant Ppangarkar

Post Views: 721
मतदान शिवस्मारक सत्यजित तांबे
Share. Facebook Twitter Pinterest WhatsApp
Annant Ppangarkar
  • Website

Related Posts

“राजा किती क्रूर आणि खोटारडा आहे…” आई-बाळाची आर्त हाक अन् पोलिसांचा पाशवी हात; संजय राऊतांनी शेअर केलेल्या ‘त्या’ एका छायाचित्राने हादरवला महाराष्ट्र!

12/10/2026

माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांच्या मार्गदर्शनाखाली संगमनेर तालुक्यातील विविध रस्ते मजबुतीकरणासाठी ३ कोटी रुपयांचा निधी मंजूर; आमदार सत्यजित तांबे यांच्या पाठपुराव्याला यश

10/10/2026

MPSC आंदोलनाला डॉ. जयश्रीताई थोरात यांचा पाठिंबा; समाज आणि आयोगातील ब्लड कॅन्सर ठीक करायचाय!

10/10/2026
Leave A Reply Cancel Reply

Document
Our Picks
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
Advertisement 1 Advertisement 2 Advertisement 3 Advertisement 4
Don't Miss
शेती व सहकार

“गंभीर दुष्काळाने साखर कारखानदारी अडचणीत; सरकारने तातडीने मदत करावी” – बाळासाहेब थोरात यांची जोरदार मागणी

By Annant Ppangarkar14/10/20260

महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन- राज्यात यावर्षी दुष्काळाची परिस्थिती अत्यंत गंभीर बनली असून, ग्रामीण भागातील अर्थकारणाचा…

‘ये पब्लिक है, सब जानती है!’ — निळवंडेच्या पाण्याचे श्रेय लाटणाऱ्याना संगमनेरची जनता निवडणुकीत देणार सडेतोड उत्तर; अमोल शेलकर यांचा घणाघात

14/10/2026

सरकारी जमिनीवर अतिक्रमण! प्रशासनाचा डोळेझाक कारभार; अधिकाऱ्यांना सरकारी मालमत्ता सांभाळता येईना

14/10/2026

मतचोरी अन् ‘SIR’च्या घोटाळ्याविरोधात संगमनेरमध्ये उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेसह समविचारी पक्षांचा घणाघात; माजी खासदार खैरे, जिल्हाप्रमुख कोते पाटलांच्या नेतृत्वात रस्ता रोको करत निवडणूक आयोगाचा तीव्र निषेध

14/10/2026
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow

तुमचे हक्काचे व्यासपीठ

Facebook YouTube
Our Picks
October 2026
M T W T F S S
 1234
567891011
12131415161718
19202122232425
262728293031  
« Sep    
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • पत्रकारिता
  • फोटो / गॅलरी
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
  • शेती व सहकार
  • सामाजिक
  • CONTACT US
  • ABOUT US
  • PRIVACY POLICY
© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.