Close Menu
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
What's Hot

पंचनाम्यात वेळ घालवू नका, सरसकट मदत करा! दिल्लीवरून थेट शेतकऱ्यांच्या बांधावर पोहोचून बाळासाहेब थोरात आक्रमक!

13/10/2026

डीजेचा आवाज आणि लेझर लाईट्स खरोखरच जीवघेणे ठरू शकतात? तज्ज्ञ डॉक्टर काय म्हणतात, पाहा… शिंदेवाडीतील विद्यार्थ्यांच्या शिबिरात नेमकं काय घडलं…

13/10/2026

शिक्षण क्षेत्राची मान उंचावणारी बातमी! संगमनेरच्या या लेखकाच्या चार पुस्तकांचा शासनमान्य ग्रंथ निवडसुचित समावेश; वाचा सविस्तर

13/10/2026
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
Home » मराठी शाळा बंद करण्याच्या निर्णयाविरोधात संगमनेरात छात्र भारती आक्रमक; बस स्थानक, प्रांत कार्यालयासमोर तीव्र निदर्शने
आंदोलन

मराठी शाळा बंद करण्याच्या निर्णयाविरोधात संगमनेरात छात्र भारती आक्रमक; बस स्थानक, प्रांत कार्यालयासमोर तीव्र निदर्शने

आजच्या काळात खासगी शिक्षणाचा वाढता खर्च सामान्य कुटुंबांच्या आवाक्याबाहेर असताना, सरकारी शाळा बंद करणे म्हणजे या विद्यार्थ्यांना शिक्षणाच्या प्रवाहाबाहेर ढकलण्यासारखे आहे, असा आरोप आंदोलकांनी केला
Annant PpangarkarBy Annant Ppangarkar08/03/2026Updated:08/03/2026No Comments2 Mins Read
Facebook Twitter WhatsApp
Share
Facebook Twitter Email Telegram WhatsApp

संगमनेर, प्रतिनिधी-
कमी पटसंख्येचे कारण पुढे करत राज्यातील सरकारी मराठी शाळा बंद करण्याचा घाट राज्य सरकारने घातला असून, या निर्णयाविरोधात छात्र भारती विद्यार्थी संघटनेने संगमनेरमध्ये आक्रमक पवित्रा घेतला आहे. शनिवारी संघटनेच्या वतीने संगमनेर बसस्थानक परिसर आणि प्रांत अधिकारी कार्यालयासमोर जोरदार निदर्शने करत शासनाचा निषेध करण्यात आला.
या आंदोलनानंतर आपल्या मागण्यांचे निवेदन जिल्हाधिकाऱ्यांमार्फत मुख्यमंत्री आणि शालेय शिक्षण मंत्र्यांना पाठवण्यात आले.
विधानसभेच्या अधिवेशनादरम्यान शालेय शिक्षण मंत्र्यांनी राज्यातील २५८ शाळा बंद करण्याबाबत माहिती दिल्यानंतर विद्यार्थी आणि पालकांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. छात्र भारतीच्या मते, शासनाचा हा निर्णय अत्यंत अन्यायकारक असून तो विद्यार्थ्यांच्या भविष्याशी खेळ करणारा आहे.
सरकारी शाळांमध्ये प्रामुख्याने गोरगरीब, दलित, आदिवासी आणि वंचित समाजघटकातील मुले शिक्षण घेतात. आजच्या काळात खासगी शिक्षणाचा वाढता खर्च सामान्य कुटुंबांच्या आवाक्याबाहेर असताना, सरकारी शाळा बंद करणे म्हणजे या विद्यार्थ्यांना शिक्षणाच्या प्रवाहाबाहेर ढकलण्यासारखे आहे, असा आरोप आंदोलकांनी केला.
ग्रामीण भागातील अनेक सरकारी शाळांची अवस्था सध्या दयनीय आहे. तेथे पायाभूत सुविधांची वानवा, शिक्षकांची रिक्त पदे आणि शैक्षणिक साधनांची अनुपलब्धता अशा गंभीर समस्या आहेत. या मूलभूत समस्या सोडवून शाळांचे सक्षमीकरण करण्याऐवजी त्या थेट बंद करणे हा पर्याय पूर्णपणे चुकीचा असल्याची भूमिका संघटनेने मांडली आहे.
जर सरकारने हा निर्णय तातडीने मागे घेतला नाही, तर संपूर्ण महाराष्ट्रभर तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा यावेळी देण्यात आला.
या आंदोलनाचे नेतृत्व छात्र भारतीचे राज्याध्यक्ष अनिकेत घुले आणि राज्य संघटक विशाल शिंदे यांनी केले. यावेळी संगमनेर अध्यक्ष मोहम्मद तांबोळी, यश सानप, साई वर्पे, ऋतिक जोंधळे, सोहम घुले, अनिकेत खरात, अभिषेक वैराळ, मसिरा तांबोळी, वैष्णवी सोनुले, पायल कानवडे, भरत सोनवणे, किरण मेढे, अपेक्षा हांडे, अनुष्का खरात, आकांशा जमधडे, प्रणाली फटांगरे, आरती क्षीरसागर, स्नेहा शिरसाठ, सुरज पवार, मयूर घुले, दत्ता ढगे, रजत अवसक, राम अरगडे यांच्यासह मोठ्या संख्येने पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते.

anantpangarkar
Annant Ppangarkar

Post Views: 547
आंदोलन छात्रभारती
Share. Facebook Twitter Pinterest WhatsApp
Annant Ppangarkar
  • Website

Related Posts

MPSC आंदोलनाला डॉ. जयश्रीताई थोरात यांचा पाठिंबा; समाज आणि आयोगातील ब्लड कॅन्सर ठीक करायचाय!

10/10/2026

दुष्काळग्रस्तांकडून सक्तीची वीज बिल वसुली थांबवा; अन्यथा आंदोलन — शिवसेना ठाकरे शहर प्रमुख अमित चव्हाण

08/10/2026

प्रत्येक एफआयआर माझ्यासाठी एखाद्या मेडल प्रमाणे; ज्ञानेशकुमार यांच्या राजीनाम्याशिवाय माघार नाही- राहुल गांधी

07/10/2026
Leave A Reply Cancel Reply

Document
Our Picks
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
Advertisement 1 Advertisement 2 Advertisement 3 Advertisement 4
Don't Miss
नैसर्गिक आपत्ती

पंचनाम्यात वेळ घालवू नका, सरसकट मदत करा! दिल्लीवरून थेट शेतकऱ्यांच्या बांधावर पोहोचून बाळासाहेब थोरात आक्रमक!

By Annant Ppangarkar13/10/20260

महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन- महाराष्ट्राच्या ग्रामीण भागात सध्या दुष्काळाची अत्यंत भयानक परिस्थिती निर्माण झाली असून…

डीजेचा आवाज आणि लेझर लाईट्स खरोखरच जीवघेणे ठरू शकतात? तज्ज्ञ डॉक्टर काय म्हणतात, पाहा… शिंदेवाडीतील विद्यार्थ्यांच्या शिबिरात नेमकं काय घडलं…

13/10/2026

शिक्षण क्षेत्राची मान उंचावणारी बातमी! संगमनेरच्या या लेखकाच्या चार पुस्तकांचा शासनमान्य ग्रंथ निवडसुचित समावेश; वाचा सविस्तर

13/10/2026

नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना आर्थिक मदत कधी मिळणार? आमदार अमोल खताळांनी दिली ही माहिती

13/10/2026
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow

तुमचे हक्काचे व्यासपीठ

Facebook YouTube
Our Picks
October 2026
M T W T F S S
 1234
567891011
12131415161718
19202122232425
262728293031  
« Sep    
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • पत्रकारिता
  • फोटो / गॅलरी
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
  • शेती व सहकार
  • सामाजिक
  • CONTACT US
  • ABOUT US
  • PRIVACY POLICY
© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.