Close Menu
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
What's Hot

संगमनेर तालुक्यासाठी ३५७ मेट्रिक टन युरियाचा बफर स्टॉक खुला; आमदार अमोल खताळ यांच्या सूचनेनंतर कृषी विभागाची कारवाई

August 7, 2026

डॉ. अनिल काकोडकर यांना हटवा, अन्यथा आंदोलन तीव्र करणार; नाशिक-पुणे रेल्वे कृती समितीचा इशारा

August 7, 2026

पुणे-नाशिक रेल्वे आणि एसटीच्या मुद्यावरून संगमनेरमध्ये राजकीय रणकंदन; ‘आमदार साहेब बनवाबनवी थांबवा’, कृती समितीचा आक्रमक इशारा

August 7, 2026
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
Home » व्वा सीओ साहेब, नगरपरिषदेचा ‘अजब न्याय’: गरिबांच्या पोटावर पाय आणि धनदांडग्यांच्या चारचाकी गाड्यांना पायघड्या!
पत्रकारिता

व्वा सीओ साहेब, नगरपरिषदेचा ‘अजब न्याय’: गरिबांच्या पोटावर पाय आणि धनदांडग्यांच्या चारचाकी गाड्यांना पायघड्या!

अनंत पांगारकरBy अनंत पांगारकरMarch 10, 2026No Comments2 Mins Read
Facebook Twitter WhatsApp
Share
Facebook Twitter Email Telegram WhatsApp

संगमनेर | अनंत पांगारकर
शहराला शिस्त लावण्याच्या नावाखाली संगमनेर नगरपरिषदेने राबवलेली अतिक्रमण हटाव मोहीम आता संशयाच्या भोवऱ्यात सापडली आहे. नवीन नगर रस्त्यावरील ज्या जागांवरून गरिबांच्या हातगाड्या आणि छोटी दुकाने हटवण्यात आली, तिथे आता चक्क आलिशान चारचाकी गाड्यांनी तळ ठोकला आहे. यामुळे ही मोहीम नेमकी शहर सुशोभीकरणासाठी होती की श्रीमंतांच्या बेकायदेशीर पार्किंगला रान मोकळे करून देण्यासाठी, त्यांचे पार्किंगचे चोचले पुरविण्यासाठी असा संतप्त सवाल सामान्य नागरिक विचारत आहेत.
काही दिवसांपूर्वी मुख्याधिकारी दयानंद गोरे आणि प्रशासन अधिकारी प्रल्हाद देवरे यांच्या नेतृत्वाखाली मोठा गाजावाजा करत, फौजफाटा घेऊन शहरात अतिक्रमण विरोधी मोहीम राबवण्यात आली. वाहतुकीला अडथळा होतो, शहराचे विद्रूपीकरण होते असे कारण देत अनेक हातावर पोट असणाऱ्या व्यावसायिकांचे संसार उघड्यावर पाडण्यात आले. त्यावेळी प्रशासनाच्या या ‘धडक’ कारवाईचे कौतुक झाले खरे, पण अवघ्या काही दिवसांतच या कारवाईमागचा खरा चेहरा समोर आला आहे. ज्या जागेवरून गरिबांना हुसकावून लावले, तिथे आता शिस्त लागण्याऐवजी बेदरकार पार्किंगचे साम्राज्य पसरले आहे.
धक्कादायक बाब म्हणजे, ज्या वाहतुकीच्या कोंडीचे कारण देऊन गरिबांवर कारवाई झाली, त्याच रस्त्यावर आता रांगांच्या रांगा लावून उभ्या असलेल्या चारचाकी गाड्यांमुळे वाहतुकीचा प्रश्न अधिकच बिकट झाला आहे. प्रशासनाने ही जागा मोकळी केल्यानंतर तिथे शिस्त लावण्यासाठी कोणतेही ठोस नियोजन केले नाही. परिणामी, ही मोहीम म्हणजे ‘गरिबांच्या पोटावर लाथ आणि चारचाकी वाल्यांना पायघड्या’ असाच प्रकार ठरला आहे.
शहरात शिस्त लावणे म्हणजे केवळ गरिबांची बांधकामे पाडणे नव्हे, तर त्या जागेचा वापर सार्वजनिक हितासाठी कसा होईल हे पाहणे प्रशासनाचे कर्तव्य होते. मात्र, संगमनेर नगरपरिषदेने केवळ ‘इव्हेंट’ म्हणून ही मोहीम राबवली की काय, अशी शंका आता उपस्थित होत आहे. अतिक्रमण हटवणे हा कायमस्वरूपी पर्याय नसून, त्या जागेवर पुन्हा बेकायदेशीर कृत्ये होणार नाहीत याची काळजी घेणे गरजेचे होते. सध्याची परिस्थिती पाहता, नगरपरिषदेने संगमनेरला शिस्त लावली की उलट शिस्त बिघडवून धनदांडग्यांचे फावले, असा सवाल आता जनता विचारत आहे. या दुटप्पी धोरणामुळे सर्वसामान्यांमध्ये प्रशासनाविरुद्ध तीव्र असंतोष पसरला असून, मुख्याधिकारी आणि पोलीस प्रशासन आता या बेकायदेशीर पार्किंगवर काय कारवाई करतात, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

anantpangarkar
अनंत पांगारकर

Post Views: 1,292
अतिक्रमण मोहीम चार चाकी पार्किंग दयानंद गोरे संगमनेर नगर परिषद
Share. Facebook Twitter Pinterest WhatsApp
अनंत पांगारकर
  • Website

Related Posts

जिल्हाधिकारी साहेब एकदा रस्त्यावर पायी फिराच! संगमनेरातील अतिक्रमण हटाव मोहीम दिखावा की केवळ समाधान?

August 5, 2026

संगमनेरमध्ये रेशनच्या धान्याचा काळा बाजार? पोलीस अन् पुरवठा विभागाच्या संशयास्पद भूमिकेने संभ्रम!

August 5, 2026

अतिक्रमणाच्या नावाखाली संगमनेरात गरिबांवर बुलडोझर, धनदांडग्यांवर मेहेरनजर; ‘सिंघम’ बनलेल्या प्रशासनाविरोधात नागरिकांचा संतप्त सवाल

July 19, 2026
Leave A Reply Cancel Reply

Document
Our Picks
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
Advertisement 1 Advertisement 2 Advertisement 3 Advertisement 4
Don't Miss
राजकारण

संगमनेर तालुक्यासाठी ३५७ मेट्रिक टन युरियाचा बफर स्टॉक खुला; आमदार अमोल खताळ यांच्या सूचनेनंतर कृषी विभागाची कारवाई

By अनंत पांगारकरAugust 7, 20260

महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन संगमनेर (प्रतिनिधी):  खरीप हंगामाच्या पार्श्वभूमीवर संगमनेर तालुक्यातील शेतकऱ्यांना युरिया खताची टंचाई…

डॉ. अनिल काकोडकर यांना हटवा, अन्यथा आंदोलन तीव्र करणार; नाशिक-पुणे रेल्वे कृती समितीचा इशारा

August 7, 2026

पुणे-नाशिक रेल्वे आणि एसटीच्या मुद्यावरून संगमनेरमध्ये राजकीय रणकंदन; ‘आमदार साहेब बनवाबनवी थांबवा’, कृती समितीचा आक्रमक इशारा

August 7, 2026

शुक्रवार, ०७ ऑगस्ट २०२६ — तुमचा आजचा दिवस कसा असेल, जाणून घ्या

August 7, 2026
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow

तुमचे हक्काचे व्यासपीठ

Facebook YouTube
Our Picks
August 2026
M T W T F S S
 12
3456789
10111213141516
17181920212223
24252627282930
31  
« Jul    
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • पत्रकारिता
  • फोटो / गॅलरी
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
  • शेती व सहकार
  • सामाजिक
  • CONTACT US
  • ABOUT US
  • PRIVACY POLICY
© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.