Close Menu
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
What's Hot

बोटा परिसरात स्कॉर्पिओतून होणारी बेकायदेशीर दारू वाहतूक घारगाव पोलिसांकडून उघडकीस; ५ लाख ३२ हजारांचा मुद्देमाल जप्त

21/09/2026

विजेचा खेळखंडोबा अन् पाणी पळवण्याचा डाव; संगमनेरमध्ये उद्या महाआक्रोश मोर्चा!

21/09/2026

सोशल मीडियावर खोटे पसरवणाऱ्यांचा बंदोबस्त करा: माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांचा इशारा; संगमनेरची आर्थिक समृद्धी टिकवण्यासाठी संघर्षाचे आवाहन

21/09/2026
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
Home » डॉ. अनिल काकोडकर यांना हटवा, अन्यथा आंदोलन तीव्र करणार; नाशिक-पुणे रेल्वे कृती समितीचा इशारा
राजकारण

डॉ. अनिल काकोडकर यांना हटवा, अन्यथा आंदोलन तीव्र करणार; नाशिक-पुणे रेल्वे कृती समितीचा इशारा

केवळ अभ्यास समिती नेमून आंदोलनाची धार कमी करण्याचा सत्ताधाऱ्यांचा प्रयत्न असून, अभ्यास समिती ही जनतेला दाखवलेली एक प्रकारची गाजर ठरू शकते.
Annant PpangarkarBy Annant Ppangarkar07/08/2026Updated:07/08/2026No Comments2 Mins Read
Facebook Twitter WhatsApp
Share
Facebook Twitter Email Telegram WhatsApp

महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन 

संगमनेर:

नाशिक-पुणे रेल्वेमार्गाचा प्रश्न तत्काळ मार्गी लावावा यासाठी नाशिक-पुणे रेल्वे कृती समिती संगमनेरच्या वतीने ९ ऑगस्ट रोजी पुकारण्यात आलेल्या चक्काजाम आंदोलनाची तयारी अंतिम टप्प्यात आली आहे. जीएमआरटी हे रेल्वेपेक्षा अधिक महत्त्वाचे आहे, असे स्पष्ट मत मांडणाऱ्या डॉ. काकोडकर यांच्या समितीकडून रेल्वेच्या बाजूने सकारात्मक अभिप्रायाची अपेक्षा करणे म्हणजे आंदोलनाच्या तोंडावर जनतेच्या तोंडाला पाने पुसण्याचा प्रकार आहे, असा आरोप कृती समितीने केला आहे. त्यामुळे डॉ. काकोडकर यांना या समितीतून तत्काळ हटवावे, अन्यथा जनआंदोलन अधिक तीव्र केले जाईल, असा रोखठोक इशारा देण्यात आला आहे.

जुन्नर तालुक्यातील खोडद येथील ‘जीएमआरटी’ (GMRT) प्रकल्पाच्या कारणास्तव रेल्वे प्रकल्पात अडथळे निर्माण होत असताना, यावर तोडगा काढण्यासाठी शासनाने डॉ. अनिल काकोडकर यांच्या अध्यक्षतेखाली अभ्यास समिती स्थापन केली आहे. मात्र, २४ डिसेंबर २०२४ च्या ‘टाइम्स ऑफ इंडिया’च्या वृत्तानुसार, खासदार डॉ. अमोल कोल्हे यांनी विकासकामांसाठी जीएमआरटी प्रकल्प इतरत्र हलवण्याची मागणी केली होती, तेव्हा डॉ. काकोडकर यांनी या प्रकल्पाची जोरदार पाठराखण केली होती.

अनेक वर्षांनंतर रेल्वेसारख्या महत्त्वाच्या विकास प्रकल्पासाठी एवढे मोठे जनआंदोलन उभे राहिले असून, हे आंदोलन केवळ चक्काजामपुरते मर्यादित नसून अंतिम विजयापर्यंत सुरूच राहील, असा निर्धार व्यक्त करण्यात आला आहे. केवळ अभ्यास समिती नेमून आंदोलनाची धार कमी करण्याचा सत्ताधाऱ्यांचा प्रयत्न असून, अभ्यास समिती ही जनतेला दाखवलेली एक प्रकारची गाजर ठरू शकते.

अपक्ष आमदार सत्यजित तांबे यांची एकट्याची ताकद पुरेशी पडणार नसल्याने हे जनआंदोलन आता जनतेनेच हातात घेऊन पुढे नेण्याची गरज आहे. जोपर्यंत नाशिक-पुणे रेल्वेमार्ग प्रत्यक्ष मार्गी लागत नाही, तोपर्यंत हे आंदोलन ढिले पडू दिले जाणार नाही आणि ९ ऑगस्टचा चक्काजाम होणारच असा ठाम विश्वास कृती समितीने व्यक्त केला आहे.

या ऐतिहासिक जनआंदोलनात नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे कळकळीचे आवाहन नाशिक-पुणे रेल्वे कृती समिती संगमनेरचे समन्वयक सतीश खताळ, रवींद्र हासे, प्रवीण हासे, रामेश्वर पानसरे, प्रितम साबळे, अजय हासे, शिवाजी जगताप, विजय उदावंत, अमोल शेलकर, शिवाजी गुंजाळ, निलेश गुंजाळ, प्रकाश कडलग, समीर लामखडे, राहुल गायकर, मोहसीन शेख, अनिल गुंजाळ, संदीप काकड, डॉ. सचिन वाळे, ॲड. अनिल गोडसे, राम अरगडे, अरुण चव्हाण, ओंकार बिडवे, सत्यजित थोरात, प्रदीप हासे आणि प्रवीण काकड यांनी केले आहे.

anantpangarkar
Annant Ppangarkar

Post Views: 1,042
Share. Facebook Twitter Pinterest WhatsApp
Annant Ppangarkar
  • Website

Related Posts

संगमनेर ग्रामीण भागात सायंकाळी वीज खंडित; गणेशोत्सवात नागरिक अंधारात, सरकारने घोषणांचा उत्सव थांबवून आधी ग्रामीण भागाला वीज द्यावी, काँग्रेसचे कार्याध्यक्ष शेलकर यांची मागणी

17/09/2026

संगमनेर तालुक्यात ३३ हजार ७९२ हेक्टरवरील खरीप पिकांची दैना; आमदार अमोल खताळ यांची मुख्यमंत्र्यांकडे तातडीने आर्थिक मदतीची मागणी

16/09/2026

आंदोलनाची हवा काढण्यासाठीच मुख्यमंत्र्यांची भेट? : अमोल शेलकर यांचा घणाघात, पालकमंत्री व लोकप्रतिनिधींवर संगमनेरच्या हक्काची रेल्वे हिरावल्याचा थेट आरोप; कागदपत्रे सार्वजनिक करण्याचे आव्हान

09/09/2026
Leave A Reply Cancel Reply

Document
Our Picks
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
Advertisement 1 Advertisement 2 Advertisement 3 Advertisement 4
Don't Miss
गुन्हेगारी

बोटा परिसरात स्कॉर्पिओतून होणारी बेकायदेशीर दारू वाहतूक घारगाव पोलिसांकडून उघडकीस; ५ लाख ३२ हजारांचा मुद्देमाल जप्त

By Annant Ppangarkar21/09/20260

महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन – वरिष्ठांच्या आदेशानुसार घारगाव पोलिसांनी बोटा परिसरात अवैध धंद्यांवर मोठी कारवाई…

विजेचा खेळखंडोबा अन् पाणी पळवण्याचा डाव; संगमनेरमध्ये उद्या महाआक्रोश मोर्चा!

21/09/2026

सोशल मीडियावर खोटे पसरवणाऱ्यांचा बंदोबस्त करा: माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांचा इशारा; संगमनेरची आर्थिक समृद्धी टिकवण्यासाठी संघर्षाचे आवाहन

21/09/2026

सोमवार २१ सप्टेंबर — जाणून घ्या आजच्या दिवसाचे राशिभविष्य

21/09/2026
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow

तुमचे हक्काचे व्यासपीठ

Facebook YouTube
Our Picks
September 2026
M T W T F S S
 123456
78910111213
14151617181920
21222324252627
282930  
« Aug    
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • पत्रकारिता
  • फोटो / गॅलरी
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
  • शेती व सहकार
  • सामाजिक
  • CONTACT US
  • ABOUT US
  • PRIVACY POLICY
© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.