Close Menu
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
What's Hot

बिबट्याच्या भीतीने शेततळ्यात पडून ११ वर्षीय बालकाचा दुर्दैवी मृत्यू; जवळे कडलगमध्ये तीव्र संताप, माजी मंत्री बाळासाहेब थोरातांनी दुःख व्यक्त करत आर्थिक मदतीची केली मागणी

29/08/2026

संगमनेर पालिकेचा अनोखा उपक्रम! १ ते २५ सप्टेंबरदरम्यान होणार प्रभागनिहाय बैठका; नगराध्यक्ष डॉ. मैथिली तांबे यांच्या पुढाकाराने नागरिकांच्या प्रश्नांना थेट व्यासपीठ

29/08/2026

स्थानिक गुन्हे शाखेकडून सराईत गुन्हेगाराला बेड्या

29/08/2026
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
Home » ‘त्या’ धोकादायक रस्त्याचा श्वास मोकळा; ग्रामपंचायतीच्या पुढाकाराने झाडांची छाटणी अन् पथदिवे सुरू
सामाजिक

‘त्या’ धोकादायक रस्त्याचा श्वास मोकळा; ग्रामपंचायतीच्या पुढाकाराने झाडांची छाटणी अन् पथदिवे सुरू

Annant PpangarkarBy Annant Ppangarkar11/03/2026No Comments2 Mins Read
Facebook Twitter WhatsApp
Share
Facebook Twitter Email Telegram WhatsApp

आश्वी | वार्ताहर
संगमनेर तालुक्यातील आश्वी खुर्द–हनुमानवाडी–दाढ खुर्द या सुमारे ३ किलोमीटर लांबीच्या रस्त्यावरील अडथळे दूर करण्यात आश्वी खुर्द ग्रामपंचायतीला यश आले असून, गेल्या अनेक दिवसांपासून गुदमरलेला हा रस्ता आता मोकळा झाला आहे. ग्रामपंचायत पदाधिकाऱ्यांनी विशेष प्रयत्न करून रस्त्यावरील झाडांची छाटणी केली, खड्डे बुजवले आणि बंद असलेले पथदिवे पुन्हा सुरू केल्यामुळे विद्यार्थी आणि ग्रामस्थांना मोठा दिलासा मिळाला आहे.
गेल्या दोन वर्षांपासून या रस्त्याच्या दोन्ही बाजूंनी झाडे मोठ्या प्रमाणावर वाढल्याने हा मार्ग वाहतुकीसाठी अत्यंत धोकादायक बनला होता. झाडांच्या फांद्यांमध्ये पथदिव्यांच्या तारा अडकल्याने संपूर्ण रस्ता अंधारात असायचा. त्यातच परिसरात बिबट्याचा वावर वाढल्याने शेतकरी आणि शालेय विद्यार्थ्यांना जीव मुठीत धरून प्रवास करावा लागत होता. या समस्येची दखल घेत सरपंच अलकाताई गायकवाड, उपसरपंच बाबा भवर आणि ग्रामपंचायत सदस्यांनी वनविभागाची रीतसर परवानगी घेऊन तातडीने झाडांच्या फांद्या हटवल्या. तसेच रस्त्यावरील खड्डे बुजवून विद्युत व्यवस्था पूर्ववत केली.
या मार्गावरून वाल्हेकर, दातीर, भालेराव, भोसले, गायकवाड यांसह अनेक कुटुंबांची मोठी वर्दळ असते. ग्रामस्थांनी यापूर्वी मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्याकडेही ही व्यथा मांडली होती. त्याची दखल घेत आणि ग्रामपंचायतीच्या कामाचे कौतुक करत विखे यांनी या रस्त्याच्या रुंदीकरणासाठी लवकरच निधी उपलब्ध करून देण्याचे आश्वासन दिले आहे. दरम्यान, या कामामुळे परिसरातील भीतीचे वातावरण दूर झाले असून ग्रामस्थांनी ग्रामपंचायत प्रशासनाचे आभार मानले आहेत.

तांत्रिक अडचणींमुळे या रस्त्याचे काम प्रलंबित होते, मात्र ग्रामस्थांच्या सहकार्याने आता हा प्रश्न मार्गी लागला आहे. राज्याचे जलसंधारण मंत्री राधाकृष्ण विखे पाटील आणि भाजप प्रदेश उपाध्यक्ष डॉ. सुजय विखे पाटील यांच्या विशेष प्रयत्नातून सार्वजनिक बांधकाम विभागांतर्गत या रस्त्यासाठी ३ कोटी रुपयांचा निधी मंजूर झाला आहे. लवकरच या कामाचे भूमिपूजन होऊन प्रत्यक्ष रस्ते विकासाला सुरुवात होणार आहे. – अलकाताई गायकवाड, सरपंच.

anantpangarkar
Annant Ppangarkar

Post Views: 236
Share. Facebook Twitter Pinterest WhatsApp
Annant Ppangarkar
  • Website

Related Posts

यशोधन कार्यालयाच्या पाठपुराव्यामुळे तालुक्यातील ८,६०० बांधकाम व असंघटित कामगारांच्या खात्यावर १० कोटी १६ लाख रुपये जमा

24/08/2026

साथी भास्करराव दुर्वे नाना यांच्या स्मृतीला अभिवादन: संगमनेरमध्ये तालुकास्तरीय वक्तृत्व स्पर्धेचे आयोजन

21/08/2026

संगमनेर तालुक्यात मुलींच्या स्वसंरक्षणासाठी ‘मुक्कामार’ अभियान सुरू; अभिनेत्री इशिता शर्मा व डॉ. जयश्रीताई थोरात यांचा स्तुत्य पुढाकार

18/08/2026
Leave A Reply Cancel Reply

Document
Our Picks
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
Advertisement 1 Advertisement 2 Advertisement 3 Advertisement 4
Don't Miss
दुर्दैवी

बिबट्याच्या भीतीने शेततळ्यात पडून ११ वर्षीय बालकाचा दुर्दैवी मृत्यू; जवळे कडलगमध्ये तीव्र संताप, माजी मंत्री बाळासाहेब थोरातांनी दुःख व्यक्त करत आर्थिक मदतीची केली मागणी

By Annant Ppangarkar29/08/20260

Annat Ppangarkar महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन संगमनेर: संगमनेर तालुक्यातील जवळे कडलग येथे बिबट्याच्या भीतीने पळताना…

संगमनेर पालिकेचा अनोखा उपक्रम! १ ते २५ सप्टेंबरदरम्यान होणार प्रभागनिहाय बैठका; नगराध्यक्ष डॉ. मैथिली तांबे यांच्या पुढाकाराने नागरिकांच्या प्रश्नांना थेट व्यासपीठ

29/08/2026

स्थानिक गुन्हे शाखेकडून सराईत गुन्हेगाराला बेड्या

29/08/2026

एलसीबीची छापेमारी, २.९९ लाखांचा मुद्देमाल जप्त करत १४ आरोपींवर गुन्हा दाखल

29/08/2026
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow

तुमचे हक्काचे व्यासपीठ

Facebook YouTube
Our Picks
August 2026
M T W T F S S
 12
3456789
10111213141516
17181920212223
24252627282930
31  
« Jul    
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • पत्रकारिता
  • फोटो / गॅलरी
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
  • शेती व सहकार
  • सामाजिक
  • CONTACT US
  • ABOUT US
  • PRIVACY POLICY
© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.