Close Menu
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
What's Hot

पंचनाम्यात वेळ घालवू नका, सरसकट मदत करा! दिल्लीवरून थेट शेतकऱ्यांच्या बांधावर पोहोचून बाळासाहेब थोरात आक्रमक!

13/10/2026

डीजेचा आवाज आणि लेझर लाईट्स खरोखरच जीवघेणे ठरू शकतात? तज्ज्ञ डॉक्टर काय म्हणतात, पाहा… शिंदेवाडीतील विद्यार्थ्यांच्या शिबिरात नेमकं काय घडलं…

13/10/2026

शिक्षण क्षेत्राची मान उंचावणारी बातमी! संगमनेरच्या या लेखकाच्या चार पुस्तकांचा शासनमान्य ग्रंथ निवडसुचित समावेश; वाचा सविस्तर

13/10/2026
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
Home » केंद्र सरकारच्या धोरणांविरोधात संगमनेरात काँग्रेसचा एल्गार; गॅस दरवाढ आणि टंचाईवरून भव्य निदर्शने
आंदोलन

केंद्र सरकारच्या धोरणांविरोधात संगमनेरात काँग्रेसचा एल्गार; गॅस दरवाढ आणि टंचाईवरून भव्य निदर्शने

सध्याच्या गॅस टंचाईमुळे केवळ घरगुती ग्राहकच नाही तर महाविद्यालयांच्या वसतिगृहातील विद्यार्थ्यांच्या जेवणाचा प्रश्नही गंभीर बनला आहे. गॅस उपलब्ध नसल्याने अनेक ठिकाणी खानावळी बंद पडण्याच्या मार्गावर आहेत. केंद्र सरकारच्या चुकीच्या धोरणांमुळे जनतेमध्ये मोठा आक्रोश निर्माण झाला
Annant PpangarkarBy Annant Ppangarkar12/03/2026No Comments2 Mins Read
Facebook Twitter WhatsApp
Share
Facebook Twitter Email Telegram WhatsApp

संगमनेर, प्रतिनिधी –
देशात सध्या निर्माण झालेली भीषण गॅस टंचाई आणि गगनाला भिडलेल्या महागाईच्या निषेधार्थ संगमनेर तालुका व शहर काँग्रेसच्या वतीने आज (गुरुवारी) भव्य निदर्शने करण्यात आली. काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आमदार बाळासाहेब थोरात यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजित या आंदोलनात केंद्र सरकारच्या जनविरोधी धोरणांचा तीव्र शब्दांत निषेध करण्यात आला. यावेळी युवक काँग्रेसच्या अध्यक्ष, युवा नेत्या डॉ. जयश्रीताई थोरात यांनी केंद्र सरकारवर कडक टीका करत तातडीने दरवाढ कमी करण्याची मागणी केली.
संगमनेर येथील प्रांताधिकारी कार्यालयासमोर हे आंदोलन करण्यात आले. यावेळी काँग्रेसचे पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी केंद्र सरकारच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी केली. या आंदोलनात डॉ. जयश्रीताई थोरात, तालुकाध्यक्ष अजय फटांगरे, प्रमिला अभंग, पद्माताई थोरात, राजू खरात, शिवाजी जगताप, बाबासाहेब गायकर, विलास वर्पे, भास्कर शरमाळे, योगिता सातपुते, तात्याराम कुटे, शिवाजी खुळे, प्रवीण गायकवाड, नानासाहेब शिंदे, विजय पवार, जिल्हाध्यक्ष शेखर सोसे, राज्य सरचिटणीस हरी ओम पवार यांच्यासह शेकडो कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.
आंदोलनादरम्यान बोलताना डॉ. जयश्रीताई थोरात यांनी केंद्र सरकारच्या कारभाराचा पंचनामा केला. त्या म्हणाल्या की, आज गॅस सिलेंडरचे भाव गगनाला भिडले असून सर्वसामान्य गृहिणींचे बजेट कोलमडले आहे. काँग्रेसच्या काळात केवळ ३५० रुपयांना मिळणारा गॅस आज १००० रुपयांच्या पार गेला आहे. केंद्र सरकार केवळ घोषणाबाजी करण्यात मग्न असून प्रत्यक्षात सामान्य जनता मात्र गॅससाठी रांगा लावून उभी आहे. अमेरिका आणि आखाती देशांमधील युद्धाचे कारण पुढे केले जात असले तरी, सर्वसामान्यांना त्याचा फटका का बसावा? हेच का तुमचे ‘अच्छे दिन’? असा जळजळीत सवाल त्यांनी यावेळी उपस्थित केला.
तालुकाध्यक्ष अजय फटांगरे यांनी केंद्र सरकारवर हल्लाबोल करताना म्हटले की, हे सरकार पूर्णपणे ‘थापेबाज’ आहे. रशियासोबत करार करण्यासाठीही जर अमेरिकेची परवानगी लागत असेल, तर तुमची ५६ इंची छाती कुठे गेली? केंद्र सरकार अमेरिकेपुढे झुकले असून सर्वसामान्यांच्या प्रश्नांकडे त्यांचे पूर्णतः दुर्लक्ष झाले आहे. जर ही दरवाढ तातडीने मागे घेतली नाही, तर संपूर्ण महाराष्ट्रात आणि देशात काँग्रेसच्या वतीने तीव्र आंदोलन छेडले जाईल, असा इशारा त्यांनी दिला.
सध्याच्या गॅस टंचाईमुळे केवळ घरगुती ग्राहकच नाही तर महाविद्यालयांच्या वसतिगृहातील विद्यार्थ्यांच्या जेवणाचा प्रश्नही गंभीर बनला आहे. गॅस उपलब्ध नसल्याने अनेक ठिकाणी खानावळी बंद पडण्याच्या मार्गावर आहेत. केंद्र सरकारच्या चुकीच्या धोरणांमुळे जनतेमध्ये मोठा आक्रोश निर्माण झाला असून, सरकार केवळ भांडवलदारांच्या हिताचे निर्णय घेत असल्याची टीका आंदोलकांनी केली.
आंदोलनाच्या शेवटी काँग्रेसच्या शिष्टमंडळाने प्रांताधिकारी अरुण उंडे यांना मागण्यांचे निवेदन दिले. यावेळी प्रांताधिकाऱ्यांनी आंदोलकांच्या भावना समजून घेतल्या आणि गॅसचा पुरवठा सुरळीत करण्यासाठी व दरवाढीबाबतचा अहवाल तातडीने वरिष्ठ स्तरावर आणि सरकारकडे पाठपुरावा करण्यासाठी पाठवण्याचे आश्वासन दिले.

anantpangarkar
Annant Ppangarkar

Post Views: 600
आंदोलन काँग्रेस गॅस दरवाढ जयश्री थोरात
Share. Facebook Twitter Pinterest WhatsApp
Annant Ppangarkar
  • Website

Related Posts

MPSC आंदोलनाला डॉ. जयश्रीताई थोरात यांचा पाठिंबा; समाज आणि आयोगातील ब्लड कॅन्सर ठीक करायचाय!

10/10/2026

दुष्काळग्रस्तांकडून सक्तीची वीज बिल वसुली थांबवा; अन्यथा आंदोलन — शिवसेना ठाकरे शहर प्रमुख अमित चव्हाण

08/10/2026

एक सशक्त आणि अष्टपैलू अभिनेता काळाच्या पडद्याआड गेला; संगमनेरमधून या नेत्यांनी वाहिली श्रद्धांजली

08/10/2026
Leave A Reply Cancel Reply

Document
Our Picks
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
Advertisement 1 Advertisement 2 Advertisement 3 Advertisement 4
Don't Miss
नैसर्गिक आपत्ती

पंचनाम्यात वेळ घालवू नका, सरसकट मदत करा! दिल्लीवरून थेट शेतकऱ्यांच्या बांधावर पोहोचून बाळासाहेब थोरात आक्रमक!

By Annant Ppangarkar13/10/20260

महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन- महाराष्ट्राच्या ग्रामीण भागात सध्या दुष्काळाची अत्यंत भयानक परिस्थिती निर्माण झाली असून…

डीजेचा आवाज आणि लेझर लाईट्स खरोखरच जीवघेणे ठरू शकतात? तज्ज्ञ डॉक्टर काय म्हणतात, पाहा… शिंदेवाडीतील विद्यार्थ्यांच्या शिबिरात नेमकं काय घडलं…

13/10/2026

शिक्षण क्षेत्राची मान उंचावणारी बातमी! संगमनेरच्या या लेखकाच्या चार पुस्तकांचा शासनमान्य ग्रंथ निवडसुचित समावेश; वाचा सविस्तर

13/10/2026

नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना आर्थिक मदत कधी मिळणार? आमदार अमोल खताळांनी दिली ही माहिती

13/10/2026
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow

तुमचे हक्काचे व्यासपीठ

Facebook YouTube
Our Picks
October 2026
M T W T F S S
 1234
567891011
12131415161718
19202122232425
262728293031  
« Sep    
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • पत्रकारिता
  • फोटो / गॅलरी
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
  • शेती व सहकार
  • सामाजिक
  • CONTACT US
  • ABOUT US
  • PRIVACY POLICY
© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.