Close Menu
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
What's Hot

माझं गाव माझा अभिमान… राजापूर

14/10/2026

“गंभीर दुष्काळाने साखर कारखानदारी अडचणीत; सरकारने तातडीने मदत करावी” – बाळासाहेब थोरात यांची जोरदार मागणी

14/10/2026

‘ये पब्लिक है, सब जानती है!’ — निळवंडेच्या पाण्याचे श्रेय लाटणाऱ्याना संगमनेरची जनता निवडणुकीत देणार सडेतोड उत्तर; अमोल शेलकर यांचा घणाघात

14/10/2026
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
Home » स्वातंत्र्यसेनानी भाऊसाहेब थोरात हे समाजविकासाचे कृतिशील संत – मल्हार अरणकल्ले
महाराष्ट्र संवाद विशेष

स्वातंत्र्यसेनानी भाऊसाहेब थोरात हे समाजविकासाचे कृतिशील संत – मल्हार अरणकल्ले

अमृत उद्योग समूहाच्या वतीने भाऊसाहेब थोरात यांना १६ व्या पुण्यस्मरण दिनानिमित्त अभिवादन
Annant PpangarkarBy Annant Ppangarkar14/03/2026No Comments2 Mins Read
Facebook Twitter WhatsApp
Share
Facebook Twitter Email Telegram WhatsApp

संगमनेर, प्रतिनिधी –
स्वातंत्र्यसंग्रामात वयाच्या अवघ्या १९ व्या वर्षी उडी घेणारे आणि आयुष्यभर शब्दांचा पक्केपणा व मनाचा सच्चेपणा जपणारे स्वातंत्र्यसेनानी भाऊसाहेब थोरात हे समाज विकासासाठी झटणारे एक ‘कृतीशील संत’ होते, असे गौरवपूर्ण उद्गार ज्येष्ठ साहित्यिक मल्हार अरणकल्ले यांनी काढले.
अमृत उद्योग समूहाच्या वतीने सहकारमहर्षी भाऊसाहेब थोरात यांच्या १६ व्या पुण्यस्मरण दिनानिमित्त कारखाना कार्यस्थळावरील प्रेरणास्थळ येथे आयोजित अभिवादन सभेत ते मुख्य मार्गदर्शक म्हणून बोलत होते. याप्रसंगी माजी आमदार डॉ. सुधीर तांबे, आमदार सत्यजित तांबे, थोरात कारखान्याचे व्हाईस चेअरमन पांडुरंग घुले, माजी नगराध्यक्ष दुर्गाताई तांबे, डॉ. जयश्रीताई थोरात, अमेय प्रकाशाचे उल्हास लाटकर यांच्यासह अमृत उद्योग समूहातील विविध संस्थांचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
मल्हार अरणकल्ले म्हणाले की, डॉ. अण्णासाहेब शिंदे यांच्या संस्कारातून घडलेल्या भाऊसाहेबांनी स्वातंत्र्यप्राप्तीनंतर सहकार, शेती, शिक्षण आणि दूध व्यवसायाच्या माध्यमातून संगमनेर तालुक्याला समृद्ध केले. स्वार्थापेक्षा जनहिताला प्राधान्य देत त्यांनी स्वतःच्या सरकारविरोधातही मोर्चे काढले. विशेषतः वयाच्या ८४ व्या वर्षी त्यांनी सुरू केलेले ‘दंडकारण्य अभियान’ ही पर्यावरण संवर्धनाची एक मोठी लोकचळवळ ठरली आहे.
सध्याच्या काळात एकमेकांचे पाय ओढण्याची वृत्ती वाढत असताना, सर्वांना सोबत घेऊन जाण्याचा भाऊसाहेबांचा सहकार विचार तरुणांसाठी प्रेरणादायी आहे. लोकनेते बाळासाहेब थोरात यांनी हाच नैतिकतेचा आणि लोककल्याणाचा वारसा समर्थपणे पुढे चालवला असून, आज महाराष्ट्राला अशा खंबीर नेतृत्वाची गरज असल्याचेही अरणकल्ले यांनी नमूद केले.
माजी आमदार डॉ. सुधीर तांबे यांनी सांगितले की, भाऊसाहेबांच्या दूरदृष्टीमुळेच हा तालुका दुष्काळी भागातून विकसित तालुका म्हणून नावारूपास आला. त्यांच्या कार्याचा पाया नैतिकता हा होता. ‘राजहंस’ सारखा विश्वासाचा ब्रँड आणि ‘एसएमबीटी’ सारखे सेवाभावी रुग्णालय ही त्यांच्याच मोठ्या स्वप्नांची फलश्रुती आहे, याचा लाभ आज हजारो सामान्य नागरिकांना मिळत आहे.
कार्यक्रमाच्या पूर्वसंध्येला नूतन ऑडिटोरियम हॉलमध्ये प्रा. विनोद राऊत व त्यांच्या सहकाऱ्यांनी सादर केलेल्या ‘भजन संध्या’ कार्यक्रमाने संपूर्ण वातावरण भक्तीमय झाले होते. संत चोखामेळा, संत तुकाराम आणि संत ज्ञानेश्वरांच्या अभंगांनी उपस्थितांना मंत्रमुग्ध केले. या कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन पांडुरंग घुले यांनी केले.

anantpangarkar
Annant Ppangarkar

Post Views: 445
भाऊसाहेब थोरात पुण्यस्मरण मल्हार अरणकल्ले
Share. Facebook Twitter Pinterest WhatsApp
Annant Ppangarkar
  • Website

Related Posts

“राजा किती क्रूर आणि खोटारडा आहे…” आई-बाळाची आर्त हाक अन् पोलिसांचा पाशवी हात; संजय राऊतांनी शेअर केलेल्या ‘त्या’ एका छायाचित्राने हादरवला महाराष्ट्र!

12/10/2026

MPSC आंदोलनाला डॉ. जयश्रीताई थोरात यांचा पाठिंबा; समाज आणि आयोगातील ब्लड कॅन्सर ठीक करायचाय!

10/10/2026

महात्मा गांधी हे भारतीय तत्त्वज्ञानाचे प्रतिबिंब: संदीप वाकचौरे

07/10/2026
Leave A Reply Cancel Reply

Document
Our Picks
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
Advertisement 1 Advertisement 2 Advertisement 3 Advertisement 4
Don't Miss
सामाजिक

माझं गाव माझा अभिमान… राजापूर

By Annant Ppangarkar14/10/20260

माझा गाव माझा अभिमान… राजापूर भाऊसाहेब गणपत हासे, अध्यक्ष, महात्मा गांधी तंटामुक्ती समिती, राजापूर. (मो.…

“गंभीर दुष्काळाने साखर कारखानदारी अडचणीत; सरकारने तातडीने मदत करावी” – बाळासाहेब थोरात यांची जोरदार मागणी

14/10/2026

‘ये पब्लिक है, सब जानती है!’ — निळवंडेच्या पाण्याचे श्रेय लाटणाऱ्याना संगमनेरची जनता निवडणुकीत देणार सडेतोड उत्तर; अमोल शेलकर यांचा घणाघात

14/10/2026

सरकारी जमिनीवर अतिक्रमण! प्रशासनाचा डोळेझाक कारभार; अधिकाऱ्यांना सरकारी मालमत्ता सांभाळता येईना

14/10/2026
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow

तुमचे हक्काचे व्यासपीठ

Facebook YouTube
Our Picks
October 2026
M T W T F S S
 1234
567891011
12131415161718
19202122232425
262728293031  
« Sep    
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • पत्रकारिता
  • फोटो / गॅलरी
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
  • शेती व सहकार
  • सामाजिक
  • CONTACT US
  • ABOUT US
  • PRIVACY POLICY
© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.