Close Menu
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
What's Hot

माझं गाव माझा अभिमान… राजापूर

14/10/2026

“गंभीर दुष्काळाने साखर कारखानदारी अडचणीत; सरकारने तातडीने मदत करावी” – बाळासाहेब थोरात यांची जोरदार मागणी

14/10/2026

‘ये पब्लिक है, सब जानती है!’ — निळवंडेच्या पाण्याचे श्रेय लाटणाऱ्याना संगमनेरची जनता निवडणुकीत देणार सडेतोड उत्तर; अमोल शेलकर यांचा घणाघात

14/10/2026
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
Home » एकविरा क्रीडा महोत्सवात महिलांची आरोग्य भरारी; मोफत शिबिरात १४३ जणांची कॅन्सर तपासणी
आरोग्य

एकविरा क्रीडा महोत्सवात महिलांची आरोग्य भरारी; मोफत शिबिरात १४३ जणांची कॅन्सर तपासणी

एकविरा क्रीडा महोत्सवाच्या माध्यमातून केवळ खेळालाच नव्हे, तर महिलांच्या आरोग्यालाही प्राधान्य दिले जात असून यंदा सुमारे ५००० महिलांनी महोत्सवात सहभाग घेतल्याचे त्यांनी नमूद केले.
Annant PpangarkarBy Annant Ppangarkar14/03/2026No Comments2 Mins Read
Facebook Twitter WhatsApp
Share
Facebook Twitter Email Telegram WhatsApp

संगमनेर, प्रतिनिधी – 
संगमनेरमध्ये एकविरा फाउंडेशनच्या वतीने करण्यात आलेल्या कॅन्सर तपासणी शिबिराचा १४३ जणांनी लाभ घेतला असल्याची माहिती देण्यात आली.
धावपळीची जीवनशैली, वाढता मानसिक तणाव आणि असंतुलित आहार यामुळे समाजात कॅन्सरचे प्रमाण चिंताजनक रित्या वाढत आहे. या पार्श्वभूमीवर महिलांमध्ये आरोग्यविषयक जनजागृती करण्यासाठी माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांच्या मार्गदर्शनाखाली आणि कॅन्सरतज्ञ डॉ. जयश्रीताई थोरात यांच्या पुढाकारातून एकविरा फाउंडेशनच्या वतीने सहकार महर्षी भाऊसाहेब थोरात क्रीडा संकुलात मोफत कॅन्सर तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.
सकाळी १० ते दुपारी २ या वेळेत स्वतंत्र विभाग करून अत्यंत शिस्तबद्ध पद्धतीने हे शिबिर पार पडले. एकविरा फाउंडेशन, एसएमबीटी सेवाभावी ट्रस्ट आणि इंडियन कॅन्सर सोसायटी यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित या शिबिरात १११ महिला आणि ३२ पुरुषांचा समावेश होता.
या विशेष मोहिमेत महिलांची एचपीव्ही-डीएनए, व्हीआयए, ब्रेस्ट चेकअप, ओरल क्लिनिकल चेकअप तसेच बीपी आणि शुगर यांसारख्या सुमारे १० हजार रुपये मूल्याच्या विविध तपासण्या पूर्णपणे मोफत करण्यात आल्या. संगमनेर शहर व तालुक्यातील ग्रामीण भागातून महिलांनी या शिबिराला मोठा प्रतिसाद दिला.
याप्रसंगी बोलताना डॉ. जयश्रीताई थोरात म्हणाल्या की, कॅन्सरची लक्षणे पहिल्या किंवा दुसऱ्या स्टेजला सहजासहजी लक्षात येत नाहीत. मात्र, वेळेत निदान आणि नियमित तपासणी केल्यास हा आजार पूर्णपणे बरा होऊ शकतो. त्यामुळे प्रत्येकाने कॅन्सरची पूर्व तपासणी करणे काळाची गरज आहे. कॅन्सरला घाबरून न जाता धैर्याने त्याचा सामना केल्यास त्यावर निश्चितच मात करता येते. एकविरा क्रीडा महोत्सवाच्या माध्यमातून केवळ खेळालाच नव्हे, तर महिलांच्या आरोग्यालाही प्राधान्य दिले जात असून यंदा सुमारे ५००० महिलांनी महोत्सवात सहभाग घेतल्याचे त्यांनी नमूद केले.
कार्यक्रमाला डॉ. अश्विनी देशमुख, किशोर साळुंखे, डॉ. भाग्यश्री भुतकर, डॉ. सायली भेलसेकर, डॉ. मानसी जोगळेकर, डॉ. मंदिप चड्डा, अविनाश आव्हाड, सोमनाथ गुंजाळ आणि इतर मान्यवर उपस्थित होते.
मीराताई शेटे म्हणाल्या, डॉ. जयश्रीताईंच्या संकल्पनेमुळे ग्रामीण भागातील महिला आपल्या आरोग्याबाबत अधिक सतर्क झाल्या आहेत. महिला सक्षम झाल्या तरच कुटुंब सक्षम होईल, असा विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला. 

anantpangarkar
Annant Ppangarkar

Post Views: 239
आरोग्य तपासणी एकविरा फाउंडेशन जयश्री थोरात
Share. Facebook Twitter Pinterest WhatsApp
Annant Ppangarkar
  • Website

Related Posts

MPSC आंदोलनाला डॉ. जयश्रीताई थोरात यांचा पाठिंबा; समाज आणि आयोगातील ब्लड कॅन्सर ठीक करायचाय!

10/10/2026

एक सशक्त आणि अष्टपैलू अभिनेता काळाच्या पडद्याआड गेला; संगमनेरमधून या नेत्यांनी वाहिली श्रद्धांजली

08/10/2026

प्रवराकाठी ‘एकविरा’चे ४५० शिलेदार; डॉ. जयश्रीताई थोरात यांच्या नेतृत्वात गणेश विसर्जन अन् निर्माल्य संकलन अभियान यशस्वी

25/09/2026
Leave A Reply Cancel Reply

Document
Our Picks
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
Advertisement 1 Advertisement 2 Advertisement 3 Advertisement 4
Don't Miss
सामाजिक

माझं गाव माझा अभिमान… राजापूर

By Annant Ppangarkar14/10/20260

माझा गाव माझा अभिमान… राजापूर भाऊसाहेब गणपत हासे, अध्यक्ष, महात्मा गांधी तंटामुक्ती समिती, राजापूर. (मो.…

“गंभीर दुष्काळाने साखर कारखानदारी अडचणीत; सरकारने तातडीने मदत करावी” – बाळासाहेब थोरात यांची जोरदार मागणी

14/10/2026

‘ये पब्लिक है, सब जानती है!’ — निळवंडेच्या पाण्याचे श्रेय लाटणाऱ्याना संगमनेरची जनता निवडणुकीत देणार सडेतोड उत्तर; अमोल शेलकर यांचा घणाघात

14/10/2026

सरकारी जमिनीवर अतिक्रमण! प्रशासनाचा डोळेझाक कारभार; अधिकाऱ्यांना सरकारी मालमत्ता सांभाळता येईना

14/10/2026
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow

तुमचे हक्काचे व्यासपीठ

Facebook YouTube
Our Picks
October 2026
M T W T F S S
 1234
567891011
12131415161718
19202122232425
262728293031  
« Sep    
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • पत्रकारिता
  • फोटो / गॅलरी
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
  • शेती व सहकार
  • सामाजिक
  • CONTACT US
  • ABOUT US
  • PRIVACY POLICY
© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.