Close Menu
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
What's Hot

‘ब्रिक्स’ आंतरराष्ट्रीय महोत्सवात संगमनेरी योगवैभव! अहमदाबादेत ध्रुव ग्लोबलच्या १० खेळाडूंनी घडवले योगपरंपरेचे दर्शन

15/10/2026

१९७२ पेक्षा भयावह दुष्काळ; राजकारण बाजूला ठेवून जनतेला दिलासा द्या, मागेल त्याला पिण्याच्या पाण्याचे टँकर द्या – सत्यजित तांबे यांचे अधिकाऱ्यांना निर्देश

15/10/2026

गुरुवार, १५ ऑक्टोंबर — आजचा दिवस कसा असेल जाणून घ्या!

15/10/2026
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
Home » संगमनेर नगरपालिकेच्या ‘रक्षक दलाची’ कामगिरी; छेडछाड आणि चोरीच्या प्रकरणांत तत्पर कारवाई
महाराष्ट्र संवाद विशेष

संगमनेर नगरपालिकेच्या ‘रक्षक दलाची’ कामगिरी; छेडछाड आणि चोरीच्या प्रकरणांत तत्पर कारवाई

शहरात कोणतीही संशयास्पद किंवा आक्षेपार्ह घटना आढळल्यास, तसेच महिलांच्या सुरक्षिततेचा प्रश्न निर्माण झाल्यास नागरिकांनी तात्काळ रक्षक दलाशी संपर्क साधावा. सुरक्षा रक्षक दल संपर्क क्रमांक : ९०६७२७३२७३
Annant PpangarkarBy Annant Ppangarkar15/03/2026No Comments2 Mins Read
Facebook Twitter WhatsApp
Share
Facebook Twitter Email Telegram WhatsApp

संगमनेर, प्रतिनिधी- 

संगमनेर नगरपरिषदेच्या वतीने नुकतेच स्थापन करण्यात आलेल्या ‘रक्षक दलाने’ अवघ्या काही दिवसांतच आपली उपयोगिता सिद्ध केली आहे. दोन वेगवेगळ्या घटनांमध्ये या दलाने तातडीने हस्तक्षेप करत एका विद्यार्थिनीची छेडछाड रोखली, तर दुसऱ्या घटनेत मंगळसूत्र चोरांना जेरबंद करून पोलिसांच्या हवाली केले.
नगराध्यक्षा डॉ. मैथिली तांबे यांच्या मार्गदर्शनाखाली कार्यरत असलेल्या या दलाच्या कामगिरीमुळे शहरात सुरक्षिततेचे वातावरण निर्माण झाले असून सर्वत्र कौतुक होत आहे.
महाराष्ट्र शासनाच्या धोरणानुसार शहरात कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी आणि महिलांच्या सुरक्षिततेसाठी संगमनेर नगरपरिषदेने हे विशेष सुरक्षा रक्षक दल कार्यान्वित केले आहे. शुक्रवारी (१३ मार्च) हे दल अकोले बायपास परिसरात अतिक्रमण विरोधी मोहिमेत व्यस्त असताना, एसटी बसस्थानक परिसरात काही तरुणांमध्ये वाद सुरू असल्याची माहिती त्यांना मिळाली.
रक्षक दलाने वेळ न घालवता घटनास्थळी धाव घेतली असता, तिथे दोन तरुण पळून जाण्यात यशस्वी झाले. मात्र, अधिक चौकशी केली असता हे तरुण एका विद्यार्थिनीला फोनद्वारे ब्लॅकमेल करून तिची छेड काढत असल्याचे निष्पन्न झाले. पळून गेलेल्या संशयितांचा मोबाईल रक्षक दलाने जप्त करून पोलिसांकडे सुपूर्द केला आहे, आता पुढील तपास सुरू आहे.
दुसऱ्या एका घटनेत, शनिवारी देवाचा मळा परिसरात एका महिलेचे मंगळसूत्र चोरीला गेल्याची माहिती मिळताच रक्षक दलाचे जवान तातडीने सक्रिय झाले. त्यांनी परिसरात शोध घेऊन चोरी करणाऱ्या दोन्ही संशयितांना ताब्यात घेतले आणि तत्काळ पोलिसांच्या स्वाधीन केले. विशेष म्हणजे ८ मार्च रोजी स्थापन झालेल्या या दलाने अवघ्या तीन दिवसांत अशा धाडसी कारवाया केल्या आहेत. शाळा, महाविद्यालये आणि वर्दळीच्या ठिकाणी या दलाची सतत गस्त सुरू असल्याने गुन्हेगारी प्रवृत्तींना चाप बसत आहे. नागरिकांनीही कोणत्याही संशयास्पद घटनेची माहिती देऊन या दलाला सहकार्य करावे, असे आवाहन नगरपालिकेकडून करण्यात आले आहे.

📌 नागरिकांसाठी महत्त्वाची सूचना…
शहरात कोणतीही संशयास्पद किंवा आक्षेपार्ह घटना आढळल्यास, तसेच महिलांच्या सुरक्षिततेचा प्रश्न निर्माण झाल्यास नागरिकांनी तात्काळ रक्षक दलाशी संपर्क साधावा. सुरक्षा रक्षक दल संपर्क क्रमांक : ९०६७२७३२७३

anantpangarkar
Annant Ppangarkar

Views: 1,069
मैथिली तांबे रक्षक दल
Share. Facebook Twitter Pinterest WhatsApp
Annant Ppangarkar
  • Website

Related Posts

“राजा किती क्रूर आणि खोटारडा आहे…” आई-बाळाची आर्त हाक अन् पोलिसांचा पाशवी हात; संजय राऊतांनी शेअर केलेल्या ‘त्या’ एका छायाचित्राने हादरवला महाराष्ट्र!

12/10/2026

MPSC आंदोलनाला डॉ. जयश्रीताई थोरात यांचा पाठिंबा; समाज आणि आयोगातील ब्लड कॅन्सर ठीक करायचाय!

10/10/2026

महात्मा गांधी हे भारतीय तत्त्वज्ञानाचे प्रतिबिंब: संदीप वाकचौरे

07/10/2026
Leave A Reply Cancel Reply

Document
Our Picks
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
Advertisement 1 Advertisement 2 Advertisement 3 Advertisement 4
Don't Miss
पुरस्कार

‘ब्रिक्स’ आंतरराष्ट्रीय महोत्सवात संगमनेरी योगवैभव! अहमदाबादेत ध्रुव ग्लोबलच्या १० खेळाडूंनी घडवले योगपरंपरेचे दर्शन

By Annant Ppangarkar15/10/20260

महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन- केंद्रीय युवा व्यवहार व क्रीडा मंत्रालय आणि गुजरात सरकारच्या संयुक्त विद्यमाने…

१९७२ पेक्षा भयावह दुष्काळ; राजकारण बाजूला ठेवून जनतेला दिलासा द्या, मागेल त्याला पिण्याच्या पाण्याचे टँकर द्या – सत्यजित तांबे यांचे अधिकाऱ्यांना निर्देश

15/10/2026

गुरुवार, १५ ऑक्टोंबर — आजचा दिवस कसा असेल जाणून घ्या!

15/10/2026

संगमनेरच्या बाजारपेठेला मोठा दिलासा, दुष्काळाच्या संकटातही थोरात कारखान्याचा मोठा निर्णय; कामगारांना मिळणार इतका बोनस अन् सानुग्रह अनुदान; ऊस उत्पादकांना प्रतिटन एवढी मदत! लोकनेते बाळासाहेब थोरात यांची घोषणा

14/10/2026
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow

तुमचे हक्काचे व्यासपीठ

Facebook YouTube
Our Picks
October 2026
M T W T F S S
 1234
567891011
12131415161718
19202122232425
262728293031  
« Sep    
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • पत्रकारिता
  • फोटो / गॅलरी
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
  • शेती व सहकार
  • सामाजिक
  • CONTACT US
  • ABOUT US
  • PRIVACY POLICY
© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.