Close Menu
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
What's Hot

‘ब्रिक्स’ आंतरराष्ट्रीय महोत्सवात संगमनेरी योगवैभव! अहमदाबादेत ध्रुव ग्लोबलच्या १० खेळाडूंनी घडवले योगपरंपरेचे दर्शन

15/10/2026

१९७२ पेक्षा भयावह दुष्काळ; राजकारण बाजूला ठेवून जनतेला दिलासा द्या, मागेल त्याला पिण्याच्या पाण्याचे टँकर द्या – सत्यजित तांबे यांचे अधिकाऱ्यांना निर्देश

15/10/2026

गुरुवार, १५ ऑक्टोंबर — आजचा दिवस कसा असेल जाणून घ्या!

15/10/2026
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
Home » जिल्ह्यात १७ ते १९ मार्च कालावधीत वादळी पावसाची शक्यता; नागरिकांनी सतर्कता बाळगण्याचे जिल्हा प्रशासनाचे आवाहन
प्रशासन

जिल्ह्यात १७ ते १९ मार्च कालावधीत वादळी पावसाची शक्यता; नागरिकांनी सतर्कता बाळगण्याचे जिल्हा प्रशासनाचे आवाहन

आपत्कालीन परिस्थितीत नागरिकांनी नजीकचे पोलीस ठाणे, तहसील कार्यालय किंवा जिल्हाधिकारी कार्यालयातील नियंत्रण कक्षाच्या १०७७ या टोल फ्री क्रमांकावर व ०२४१ - २३२३८४४ या दूरध्वनीवर तात्काळ संपर्क साधावा, असे आवाहनही गिते यांनी केले आहे.
Annant PpangarkarBy Annant Ppangarkar17/03/2026No Comments2 Mins Read
Facebook Twitter WhatsApp
Share
Facebook Twitter Email Telegram WhatsApp

अहिल्यानगर, विशेष प्रतिनिधी –
भारतीय हवामान खात्याच्या अंदाजानुसार अहिल्यानगर जिल्ह्यात १७ ते १९ मार्च २०२६ या कालावधीत वादळी वाऱ्यासह हलका ते मध्यम पाऊस व विजांच्या कडकडाटाची शक्यता वर्तविण्यात आली आहे. या पार्श्वभूमीवर जिल्ह्यासाठी १८ व १९ मार्च रोजी येलो अलर्ट जारी करण्यात आला असून, कोणत्याही प्रकारची जीवितहानी व वित्तहानी टाळण्यासाठी नागरिकांनी सुरक्षिततेची पुरेशी काळजी घ्यावी, असे आवाहन निवासी उपजिल्हाधिकारी तथा जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाचे मुख्य कार्यकारी अधिकारी दादासाहेब गिते यांनी केले आहे.
वीज चमकत असताना किंवा वादळी वारे वाहत असताना नागरिकांनी झाडांखाली, मोकळ्या मैदानात, विजेचे खांब व लोखंडी कुंपणाजवळ उभे राहू नये. वीज कोसळण्याची शक्यता असल्याने या काळात विजेच्या उपकरणांचा वापर टाळावा व ट्रॅक्टर्स, शेतीची अवजारे यांसारख्या सुवाहक वस्तूंपासून दूर राहावे. घराबाहेर मोकळ्या जागेत अडकल्यास गुडघ्यांवर बसून कान व डोके झाकून सुरक्षिततेची काळजी घ्यावी.
जाहिरात फलक कोसळून अपघात होण्याची शक्यता असल्याने त्याजवळ थांबणे टाळावे. धरणे, नद्या व कालव्यांच्या परिसरात पर्यटनासाठी जाणाऱ्या नागरिकांनी पाण्याच्या प्रवाहात उतरू नये व धोकादायक ठिकाणी फोटो काढणे टाळावे. शेतकऱ्यांनी वादळी वारा व पावसापासून शेतमालाचे नुकसान टाळण्यासाठी योग्य नियोजन करावे, तसेच काढणीस आलेला शेतमाल व जनावरे सुरक्षित ठिकाणी हलवावीत. आपत्कालीन परिस्थितीत नागरिकांनी नजीकचे पोलीस ठाणे, तहसील कार्यालय किंवा जिल्हाधिकारी कार्यालयातील नियंत्रण कक्षाच्या १०७७ या टोल फ्री क्रमांकावर व ०२४१ – २३२३८४४ या दूरध्वनीवर तात्काळ संपर्क साधावा, असे आवाहनही गिते यांनी केले आहे.

anantpangarkar
Annant Ppangarkar

Views: 464
वादळी पाऊस सतर्कतेचा इशारा
Share. Facebook Twitter Pinterest WhatsApp
Annant Ppangarkar
  • Website

Related Posts

सरकारी जमिनीवर अतिक्रमण! प्रशासनाचा डोळेझाक कारभार; अधिकाऱ्यांना सरकारी मालमत्ता सांभाळता येईना

14/10/2026

५० लाखांची कथित खंडणी अन् प्रशासकीय अनागोंदी: मुख्याधिकारी सक्तीच्या रजेवर, जिल्हाधिकाऱ्यांची कठोर कारवाई; नायब तहसीलदार मोहसीन शेख यांच्याकडे अतिरिक्त पदभार

24/09/2026

अन्न व औषध प्रशासनाची संगमनेरमध्ये कारवाई: २.६० लाखांचे संशयास्पद ‘काऊ घी’ जप्त, तर भेसळप्रकरणी दुग्ध केंद्राचा परवाना निलंबित

22/09/2026
Leave A Reply Cancel Reply

Document
Our Picks
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
Advertisement 1 Advertisement 2 Advertisement 3 Advertisement 4
Don't Miss
पुरस्कार

‘ब्रिक्स’ आंतरराष्ट्रीय महोत्सवात संगमनेरी योगवैभव! अहमदाबादेत ध्रुव ग्लोबलच्या १० खेळाडूंनी घडवले योगपरंपरेचे दर्शन

By Annant Ppangarkar15/10/20260

महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन- केंद्रीय युवा व्यवहार व क्रीडा मंत्रालय आणि गुजरात सरकारच्या संयुक्त विद्यमाने…

१९७२ पेक्षा भयावह दुष्काळ; राजकारण बाजूला ठेवून जनतेला दिलासा द्या, मागेल त्याला पिण्याच्या पाण्याचे टँकर द्या – सत्यजित तांबे यांचे अधिकाऱ्यांना निर्देश

15/10/2026

गुरुवार, १५ ऑक्टोंबर — आजचा दिवस कसा असेल जाणून घ्या!

15/10/2026

संगमनेरच्या बाजारपेठेला मोठा दिलासा, दुष्काळाच्या संकटातही थोरात कारखान्याचा मोठा निर्णय; कामगारांना मिळणार इतका बोनस अन् सानुग्रह अनुदान; ऊस उत्पादकांना प्रतिटन एवढी मदत! लोकनेते बाळासाहेब थोरात यांची घोषणा

14/10/2026
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow

तुमचे हक्काचे व्यासपीठ

Facebook YouTube
Our Picks
October 2026
M T W T F S S
 1234
567891011
12131415161718
19202122232425
262728293031  
« Sep    
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • पत्रकारिता
  • फोटो / गॅलरी
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
  • शेती व सहकार
  • सामाजिक
  • CONTACT US
  • ABOUT US
  • PRIVACY POLICY
© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.