Close Menu
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
What's Hot

संगमनेरमध्ये बुधवारी रंगणार ७५० कलावंतांचे भव्य महावादन; ‘आय लव्ह संगमनेर’ चळवळीचा उपक्रम

15/09/2026

पोलीस प्रशासनाचा मोठा निर्णय, गणेशोत्सवादरम्यान ‘यांना’ संगमनेर व अकोले तालुक्यात प्रवेश बंदीचे आदेश जारी___वाचा यादी

15/09/2026

सण-उत्सवांच्या पार्श्वभूमीवर संगमनेर उपविभागात पोलीस प्रशासनाची मोठी कारवाई; गुन्हेगारी पार्श्वभूमीचे सात जण जिल्ह्यातून हद्दपार

15/09/2026
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
Home » संगमनेर हादरले! सहावीतील विद्यार्थिनीवर भररस्त्यात ऍसिड हल्ला; आरोपी फरार, तालुक्यात संतापाची लाट
गुन्हेगारी

संगमनेर हादरले! सहावीतील विद्यार्थिनीवर भररस्त्यात ऍसिड हल्ला; आरोपी फरार, तालुक्यात संतापाची लाट

पोलिसांनी चोवीस तासांच्या आत आरोपीला अटक करावी, अन्यथा वडगाव पान येथे रास्ता रोकोसह तीव्र जनआंदोलन छेडले जाईल, असा इशारा युवक काँग्रेसचे जिल्हा सरचिटणीस निलेश थोरात पाटील यांनी दिला आहे.
Annant PpangarkarBy Annant Ppangarkar17/03/2026No Comments2 Mins Read
Facebook Twitter WhatsApp
Share
Facebook Twitter Email Telegram WhatsApp

संगमनेर, प्रतिनिधी-
संगमनेर तालुक्यातील वडगाव पान परिसरात माणुसकीला काळिमा फासणारी एक अत्यंत भीषण घटना मंगळवारी सकाळी घडली. शाळेतून घरी परतणाऱ्या एका १३ वर्षीय अल्पवयीन विद्यार्थिनीवर दुचाकीवरून आलेल्या अज्ञात नराधमाने ॲसिड हल्ला केला. या जीवघेण्या हल्ल्यात ही चिमुरडी गंभीर जखमी झाली असून, या घटनेमुळे संपूर्ण अहिल्यानगर जिल्ह्यात खळबळ उडाली आहे. महिला आणि मुलींच्या सुरक्षेचा प्रश्न या निमित्ताने पुन्हा एकदा ऐरणीवर आला असून आरोपीला तात्काळ पकडण्याची मागणी ग्रामस्थांकडून होत आहे.
पोलीस सर्व तांत्रिक बाबींचा तपास करत असून आरोपीच्या शोधासाठी पथके रवाना करण्यात आली आहेत. गेल्या काही दिवसांपासून घडणाऱ्या घटनांमुळे संगमनेरची कायदा सुव्यवस्था धोक्यात आली आहे. तालुक्यातील घटनांकडे वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी लक्ष घालण्याची आवश्यकता निर्माण झाली आहे. तालुक्यामध्ये वाढत्या गुन्हेगारीमुळे पोलीस यंत्रणा नेमकी काय करते असा प्रश्न उपस्थित झाला आहे. सुसंस्कृत आणि शांत शहराला अशा घटनांमुळे मोठ्या प्रमाणात गालबोट लागले असून शहराची वाटचाल गुन्हेगारीकडे होत आहे.
दुर्दैवी घटनेतील पीडित मुलगी मूळची  संगमनेर तालुक्यातील रहिवासी असून, वडिलांच्या निधनानंतर ती आपल्या आईसह वडगाव पान येथे मामाकडे राहून शिक्षण घेत होती. ती गावातील एका विद्यालयात इयत्ता सहावीत शिकत आहे. मंगळवारी सकाळी साडेअकराच्या सुमारास शाळा सुटल्यानंतर ती सायकलवरून घरी निघाली होती. लोणी-संगमनेर रस्त्यावरील महादेव मळा परिसरातील सुनसान रस्त्यावर दबा धरून बसलेल्या अज्ञात तरुणाने तिच्यावर ॲसिड फेकले. निर्जन स्थळ आणि सीसीटीव्हीचा अभाव असल्याचा फायदा घेत आरोपीने हे अमानुष कृत्य केले आणि क्षणात तिथून पळ काढला.
हल्ल्यानंतर गंभीर जखमी झालेल्या या मुलीला तातडीने लोणी येथील प्रवरा रुग्णालयात हलवण्यात आले असून, सध्या तिच्यावर अतिदक्षता विभागात उपचार सुरू आहेत. घटनेची माहिती मिळताच उपविभागीय पोलीस अधिकारी डॉ. कुणाल सोनवणे आणि तालुका पोलीस निरीक्षक प्रवीण साळुंखे यांनी फौजफाट्यासह घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांनी स्थानिक नागरिकांच्या मदतीने परिसरात शोधमोहीम राबवली, मात्र रात्रीपर्यंत आरोपीचा कोणताही सुगावा लागलेला नव्हता. दरम्यान यासंदर्भात संगमनेर तालुका पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक प्रवीण साळुंखे यांच्याशी संपर्क केला असता प्रतिसाद मिळू शकला नाही.

या घटनेमुळे वडगाव पान आणि परिसरात तीव्र संतापाची लाट उसळली आहे. अशा भ्याड कृत्यामुळे समाजात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. पोलिसांनी चोवीस तासांच्या आत आरोपीला अटक करावी, अन्यथा वडगाव पान येथे रास्ता रोकोसह तीव्र जनआंदोलन छेडले जाईल, असा इशारा युवक काँग्रेसचे जिल्हा सरचिटणीस निलेश थोरात पाटील यांनी दिला आहे. 

anantpangarkar
Annant Ppangarkar

Post Views: 1,817
ॲसिड हल्ला अल्पवयीन शालेय विद्यार्थीनी वडगाव पान
Share. Facebook Twitter Pinterest WhatsApp
Annant Ppangarkar
  • Website

Related Posts

पोलीस प्रशासनाचा मोठा निर्णय, गणेशोत्सवादरम्यान ‘यांना’ संगमनेर व अकोले तालुक्यात प्रवेश बंदीचे आदेश जारी___वाचा यादी

15/09/2026

सण-उत्सवांच्या पार्श्वभूमीवर संगमनेर उपविभागात पोलीस प्रशासनाची मोठी कारवाई; गुन्हेगारी पार्श्वभूमीचे सात जण जिल्ह्यातून हद्दपार

15/09/2026

मोठी कारवाई: तीन कुंटणखान्यांवर छापे, ८ महिलांची सुटका; तिघांवर गुन्हे दाखल

14/09/2026
Leave A Reply Cancel Reply

Document
Our Picks
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
Advertisement 1 Advertisement 2 Advertisement 3 Advertisement 4
Don't Miss
महाराष्ट्र संवाद विशेष

संगमनेरमध्ये बुधवारी रंगणार ७५० कलावंतांचे भव्य महावादन; ‘आय लव्ह संगमनेर’ चळवळीचा उपक्रम

By Annant Ppangarkar15/09/20260

Annant Ppangarkar महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन – महाराष्ट्र राज्य हे सांस्कृतिकदृष्ट्या अत्यंत वैभवशाली असून पारंपारिक…

पोलीस प्रशासनाचा मोठा निर्णय, गणेशोत्सवादरम्यान ‘यांना’ संगमनेर व अकोले तालुक्यात प्रवेश बंदीचे आदेश जारी___वाचा यादी

15/09/2026

सण-उत्सवांच्या पार्श्वभूमीवर संगमनेर उपविभागात पोलीस प्रशासनाची मोठी कारवाई; गुन्हेगारी पार्श्वभूमीचे सात जण जिल्ह्यातून हद्दपार

15/09/2026

दिल्ली नाक्यावर कंटेनरखाली चिरडून महिलेचा मृत्यू, संगमनेर शहरातील जड वाहतुकीचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर; नागरिकांचा संताप

15/09/2026
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow

तुमचे हक्काचे व्यासपीठ

Facebook YouTube
Our Picks
September 2026
M T W T F S S
 123456
78910111213
14151617181920
21222324252627
282930  
« Aug    
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • पत्रकारिता
  • फोटो / गॅलरी
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
  • शेती व सहकार
  • सामाजिक
  • CONTACT US
  • ABOUT US
  • PRIVACY POLICY
© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.