Close Menu
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
What's Hot

संगमनेरच्या बाजारपेठेला मोठा दिलासा, दुष्काळाच्या संकटातही थोरात कारखान्याचा मोठा निर्णय; कामगारांना मिळणार इतका बोनस अन् सानुग्रह अनुदान; ऊस उत्पादकांना प्रतिटन एवढी मदत! लोकनेते बाळासाहेब थोरात यांची घोषणा

14/10/2026

रस्त्यावरील वादातून मारहाण, जीवे मारण्याची धमकी; संगमनेर न्यायालयाने सुनावली ही शिक्षा

14/10/2026

माझं गाव माझा अभिमान… राजापूर

14/10/2026
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
Home » संगमनेरमध्ये शाळकरी मुलीवर ॲसिड हल्ला: तळेगाव फाट्यावर जनक्षोभ आणि रास्ता रोको आंदोलन
आंदोलन

संगमनेरमध्ये शाळकरी मुलीवर ॲसिड हल्ला: तळेगाव फाट्यावर जनक्षोभ आणि रास्ता रोको आंदोलन

दरम्यान, संगमनेर तालुका पोलिसांनी या प्रकरणाचा तपास युद्धपातळीवर सुरू केला असून आरोपीचा शोध घेण्यासाठी विशेष पथके तैनात करण्यात आली आहेत.
Annant PpangarkarBy Annant Ppangarkar18/03/2026No Comments2 Mins Read
Facebook Twitter WhatsApp
Share
Facebook Twitter Email Telegram WhatsApp

संगमनेर, प्रतिनिधी-
तालुक्यातील वडगाव पान येथे एका अल्पवयीन शाळकरी मुलीवर भरदिवसा झालेल्या अमानुष ॲसिड हल्ल्यामुळे संपूर्ण तालुका हादरून गेला असून नागरिकांमध्ये तीव्र संतापाची लाट उसळली आहे. या घटनेच्या निषेधार्थ बुधवारी सकाळी वडगाव पान आणि तळेगाव फाटा परिसरातील ग्रामस्थ, महिला आणि तरुण मोठ्या संख्येने रस्त्यावर उतरले. संतप्त आंदोलकांनी महामार्ग अडवत जोरदार ‘रास्ता रोको’ केला आणि प्रशासनाच्या विरोधात घोषणाबाजी केली.
या आंदोलनात एकवीरा फाउंडेशनच्या अध्यक्षा डॉ. जयश्री थोरात, आमदार अमोल खताळ यांच्या पत्नी नीलम खताळ, माजी नगराध्यक्ष दुर्गाताई तांबे आणि नवनिर्वाचित नगराध्यक्षा डॉ. मैथिली तांबे यांसह अनेक मान्यवरांनी सहभाग नोंदवून पीडितेला न्याय देण्याची मागणी केली.
मंगळवारी दुपारी दोन वाजेच्या सुमारास ही संतापजनक घटना घडली जेव्हा इयत्ता सहावीत शिकणारी ही विद्यार्थिनी शाळा सुटल्यानंतर आपल्या सायकलवरून नेहमीप्रमाणे घरी जात होती. हाडकेमाळा परिसरात एका अज्ञात नराधमाने तिच्यावर अचानक ॲसिड फेकले. या भयानक हल्ल्यात मुलगी गंभीर जखमी झाली असून तिच्या चेहऱ्यासह शरीराचे विविध भाग भाजले आहेत. तिला तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले असून सध्या तिची प्रकृती स्थिर असल्याची माहिती आहे.
सुमारे दीड ते दोन तास सुरू असलेल्या या रास्ता रोको आंदोलनादरम्यान आंदोलकांनी वडगाव-तळेगाव फाट्यावरील पोलीस चौकी तात्काळ कार्यान्वित करण्याची, शाळा सुटण्याच्या वेळी पोलीस गस्त वाढवण्याची आणि संपूर्ण परिसरात सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्याची आग्रही मागणी केली.
स्थानिक लोकप्रतिनिधींनी देखील या घटनेची गंभीर दखल घेतली असून आमदार सत्यजित तांबे व आमदार अमोल खताळ यांनी हा प्रश्न विधिमंडळात मांडला आहे. त्यांनी पीडितेला आर्थिक मदत आणि आरोपीला कठोरात कठोर शिक्षा देण्याची मागणी केली आहे.
दरम्यान, संगमनेर तालुका पोलिसांनी या प्रकरणाचा तपास युद्धपातळीवर सुरू केला असून आरोपीचा शोध घेण्यासाठी विशेष पथके तैनात करण्यात आली आहेत. परिसरातील सीसीटीव्ही फुटेजची तपासणी केली जात आहे. केवळ आश्वासने नको तर अशा विकृत प्रवृत्तींना आळा घालण्यासाठी आरोपीला फाशीची शिक्षा व्हावी आणि महिलांच्या सुरक्षेसाठी ठोस उपाययोजना कराव्यात, अशी भावना यावेळी आंदोलक ग्रामस्थांनी व्यक्त केली. यावेळी मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता.

anantpangarkar
Annant Ppangarkar

Post Views: 633
अल्पवयीन मुलीवर हल्ला चिमुकलीवर हल्ला जयश्री थोरात दुर्गाताई तांबे नीलम खताळ मैथिली तांबे रास्ता रोको वडगाव पान
Share. Facebook Twitter Pinterest WhatsApp
Annant Ppangarkar
  • Website

Related Posts

मतचोरी अन् ‘SIR’च्या घोटाळ्याविरोधात संगमनेरमध्ये उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेसह समविचारी पक्षांचा घणाघात; माजी खासदार खैरे, जिल्हाप्रमुख कोते पाटलांच्या नेतृत्वात रस्ता रोको करत निवडणूक आयोगाचा तीव्र निषेध

14/10/2026

मतचोरी अन् ‘SIR’च्या घोटाळ्याविरोधात संगमनेरमध्ये उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेसह समविचारी पक्षांचा घणाघात; माजी खासदार खैरे, जिल्हाप्रमुख कोते पाटलांच्या नेतृत्वात रस्ता रोको करत निवडणूक आयोगाचा तीव्र निषेध

14/10/2026

MPSC आंदोलनाला डॉ. जयश्रीताई थोरात यांचा पाठिंबा; समाज आणि आयोगातील ब्लड कॅन्सर ठीक करायचाय!

10/10/2026
Leave A Reply Cancel Reply

Document
Our Picks
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
Advertisement 1 Advertisement 2 Advertisement 3 Advertisement 4
Don't Miss
शेती व सहकार

संगमनेरच्या बाजारपेठेला मोठा दिलासा, दुष्काळाच्या संकटातही थोरात कारखान्याचा मोठा निर्णय; कामगारांना मिळणार इतका बोनस अन् सानुग्रह अनुदान; ऊस उत्पादकांना प्रतिटन एवढी मदत! लोकनेते बाळासाहेब थोरात यांची घोषणा

By Annant Ppangarkar14/10/20260

महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन- यावर्षीचा दुष्काळ हा कोरोना संकटाप्रमाणे असून कठीण दुष्काळी संकटातून मार्ग काढत…

रस्त्यावरील वादातून मारहाण, जीवे मारण्याची धमकी; संगमनेर न्यायालयाने सुनावली ही शिक्षा

14/10/2026

माझं गाव माझा अभिमान… राजापूर

14/10/2026

“गंभीर दुष्काळाने साखर कारखानदारी अडचणीत; सरकारने तातडीने मदत करावी” – बाळासाहेब थोरात यांची जोरदार मागणी

14/10/2026
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow

तुमचे हक्काचे व्यासपीठ

Facebook YouTube
Our Picks
October 2026
M T W T F S S
 1234
567891011
12131415161718
19202122232425
262728293031  
« Sep    
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • पत्रकारिता
  • फोटो / गॅलरी
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
  • शेती व सहकार
  • सामाजिक
  • CONTACT US
  • ABOUT US
  • PRIVACY POLICY
© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.