Close Menu
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
What's Hot

माझं गाव माझा अभिमान… राजापूर

14/10/2026

“गंभीर दुष्काळाने साखर कारखानदारी अडचणीत; सरकारने तातडीने मदत करावी” – बाळासाहेब थोरात यांची जोरदार मागणी

14/10/2026

‘ये पब्लिक है, सब जानती है!’ — निळवंडेच्या पाण्याचे श्रेय लाटणाऱ्याना संगमनेरची जनता निवडणुकीत देणार सडेतोड उत्तर; अमोल शेलकर यांचा घणाघात

14/10/2026
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
Home » वडगाव पान ॲसिड हल्ला प्रकरण: आरोपीला फाशी द्या आणि खटला फास्ट ट्रॅक कोर्टात चालवा; शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) आक्रमक
आंदोलन

वडगाव पान ॲसिड हल्ला प्रकरण: आरोपीला फाशी द्या आणि खटला फास्ट ट्रॅक कोर्टात चालवा; शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) आक्रमक

विद्यार्थिनीवर झालेला हा हल्ला मानवजातीला काळीमा फासणारा आहे. अशा नीच प्रवृत्तीच्या गुन्हेगाराला जागेवरच ठेचले पाहिजे आणि पीडितेला लवकरात लवकर न्याय मिळवून दिला पाहिजे.
Annant PpangarkarBy Annant Ppangarkar18/03/2026No Comments2 Mins Read
Facebook Twitter WhatsApp
Share
Facebook Twitter Email Telegram WhatsApp

संगमनेर, प्रतिनिधी-
संगमनेर तालुक्यातील वडगाव पान येथे एका अल्पवयीन शाळकरी विद्यार्थिनीवर झालेल्या अमानवीय ॲसिड हल्ल्याच्या निषेधार्थ शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्ष आक्रमक झाला आहे. जिल्हाप्रमुख सचिन कोते पाटील यांच्या नेतृत्वाखाली आज (बुधवारी) संगमनेरचे पोलीस उपविभागीय अधिकारी डॉ. कुणाल सोनवणे यांना निवेदन देण्यात आले. यावेळी शिवसैनिकांनी जोरदार घोषणाबाजी करत परिसर दणाणून सोडला. या भ्याड हल्ल्यातील आरोपीला त्वरित अटक करून त्याच्यावर फास्ट ट्रॅक कोर्टात खटला चालवावा आणि त्याला कठोरात कठोर शिक्षा देण्यात यावी, अशी प्रमुख मागणी यावेळी करण्यात आली.
निवेदनाद्वारे शिवसेनेने प्रशासनाकडे विविध मागण्या मांडल्या आहेत. यामध्ये पीडित विद्यार्थिनीला तातडीने उत्तम वैद्यकीय उपचार आणि शासनाकडून भरीव आर्थिक नुकसान भरपाई मिळणे आवश्यक असल्याचे म्हटले आहे. तसेच, समाजात अशा घटनांची पुनरावृत्ती टाळण्यासाठी शाळा, महाविद्यालये आणि गावागावांत जागृती मोहीम राबवावी, ॲसिड विक्रीवर कडक नियंत्रण आणावे आणि पीडित कुटुंबाला मानसिक आधार देण्यासाठी प्रयत्न करावेत, असे नमूद केले आहे. कोणत्याही परिस्थितीत आरोपीला जामीन मिळू नये आणि त्याला वाचवण्याचा किंवा लपवण्याचा प्रयत्न झाल्यास तो हाणून पाडला जाईल, असा इशाराही यावेळी देण्यात आला. महिला व विद्यार्थ्यांच्या सुरक्षेसाठी तालुका स्तरावर समन्वय समिती स्थापन करण्याची मागणीही जिल्हाप्रमुख सचिन कोते पाटील यांनी केली.
निवेदन दिल्यानंतर सचिन कोते पाटील यांनी पदाधिकारी व महिला आघाडीसह वडगाव पान येथे जाऊन पीडित मुलीच्या कुटुंबाची भेट घेतली व त्यांचे सांत्वन केले. शिवसेना या कठीण काळात कुटुंबाच्या पाठीशी खंबीरपणे उभी असून सर्वतोपरी मदत व सहकार्य करेल, अशी ग्वाही त्यांनी दिली.
या प्रसंगी उपजिल्हाप्रमुख अमर कतारी यांनी आपले मत व्यक्त करताना सांगितले की, या विद्यार्थिनीवर झालेला हा हल्ला मानवजातीला काळीमा फासणारा आहे. अशा नीच प्रवृत्तीच्या गुन्हेगाराला जागेवरच ठेचले पाहिजे आणि पीडितेला लवकरात लवकर न्याय मिळवून दिला पाहिजे.
तालुकाप्रमुख भाऊसाहेब हासे, शहर प्रमुख अमित चव्हाण, महिला आघाडी उपजिल्हा संघटिका आशाताई केदारी आणि शितलताई हासे यांनीही सरकारकडे आर्थिक मदतीची मागणी केली. पीडित मुलीला न्याय न मिळाल्यास शिवसेना, युवासेना आणि महिला आघाडी रस्त्यावर उतरून तीव्र आंदोलन करेल, असा इशारा संगमनेर महिला आघाडीच्या वतीने देण्यात आला. तसेच, आरोपी जिल्ह्यात कुठेही आढळल्यास त्याला महिला आघाडीच्या वतीने धडा शिकवला जाईल, असेही ठणकावून सांगण्यात आले.
या आंदोलनाप्रसंगी श्रीरामपूर तालुकाप्रमुख लखन भगत, कोपरगाव तालुकाप्रमुख भरत मोरे, राहता तालुकाप्रमुख सोमनाथ गोरे, संगमनेर तालुकाप्रमुख भाऊसाहेब हासे, भीमाशंकर पावसे, महिला आघाडी उपजिल्हा संघटिका आशाताई केदारी, वैशाली वढतल्ले, संगीता गायकवाड, शहर प्रमुख अमित चव्हाण, युवा सेना तालुकाप्रमुख अक्षय गुंजाळ, गोविंद नागरे, अमोल डुकरे, दीपक साळुंके, पप्पू कानकाटे, विजू सातपुते, राजू सातपुते, अशोक बढे, अभी साबळे, मुस्ताक शेख, निखिल पवार, केशव वर्पे, बाळासाहेब घोडके, प्रवीण चव्हाण, त्रिलोक कतारी, रिक्षा सेनेचे बडे, माघाडे, पवार, दिवे यांच्यासह मोठ्या संख्येने शिवसैनिक आणि महिला पदाधिकारी उपस्थित होते.

anantpangarkar
Annant Ppangarkar

Post Views: 875
अमर कतारी उपविभागीय अधिकारी डी वाय एस पी निवेदन शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे यादी सचिन कोते
Share. Facebook Twitter Pinterest WhatsApp
Annant Ppangarkar
  • Website

Related Posts

मतचोरी अन् ‘SIR’च्या घोटाळ्याविरोधात संगमनेरमध्ये उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेसह समविचारी पक्षांचा घणाघात; माजी खासदार खैरे, जिल्हाप्रमुख कोते पाटलांच्या नेतृत्वात रस्ता रोको करत निवडणूक आयोगाचा तीव्र निषेध

14/10/2026

मतचोरी अन् ‘SIR’च्या घोटाळ्याविरोधात संगमनेरमध्ये उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेसह समविचारी पक्षांचा घणाघात; माजी खासदार खैरे, जिल्हाप्रमुख कोते पाटलांच्या नेतृत्वात रस्ता रोको करत निवडणूक आयोगाचा तीव्र निषेध

14/10/2026

आमदार अमोल खताळ यांनी वेधले ऊर्जा राज्यमंत्र्यांचे लक्ष; मेंढवन उपकेंद्राचे काम तातडीने सुरू करण्याची मागणी

10/10/2026
Leave A Reply Cancel Reply

Document
Our Picks
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
Advertisement 1 Advertisement 2 Advertisement 3 Advertisement 4
Don't Miss
सामाजिक

माझं गाव माझा अभिमान… राजापूर

By Annant Ppangarkar14/10/20260

माझा गाव माझा अभिमान… राजापूर भाऊसाहेब गणपत हासे, अध्यक्ष, महात्मा गांधी तंटामुक्ती समिती, राजापूर. (मो.…

“गंभीर दुष्काळाने साखर कारखानदारी अडचणीत; सरकारने तातडीने मदत करावी” – बाळासाहेब थोरात यांची जोरदार मागणी

14/10/2026

‘ये पब्लिक है, सब जानती है!’ — निळवंडेच्या पाण्याचे श्रेय लाटणाऱ्याना संगमनेरची जनता निवडणुकीत देणार सडेतोड उत्तर; अमोल शेलकर यांचा घणाघात

14/10/2026

सरकारी जमिनीवर अतिक्रमण! प्रशासनाचा डोळेझाक कारभार; अधिकाऱ्यांना सरकारी मालमत्ता सांभाळता येईना

14/10/2026
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow

तुमचे हक्काचे व्यासपीठ

Facebook YouTube
Our Picks
October 2026
M T W T F S S
 1234
567891011
12131415161718
19202122232425
262728293031  
« Sep    
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • पत्रकारिता
  • फोटो / गॅलरी
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
  • शेती व सहकार
  • सामाजिक
  • CONTACT US
  • ABOUT US
  • PRIVACY POLICY
© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.