Close Menu
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
What's Hot

संगमनेरमध्ये युवक काँग्रेस पदाधिकाऱ्यांसाठी विशेष आपत्कालीन वैद्यकीय प्रशिक्षण शिबिर; आपत्कालीन प्रसंगात रुग्णांचे प्राण वाचवण्यासाठी युवकांनी पुढाकार घ्यावा: डॉ. जयश्रीताई थोरात

16/09/2026

संगमनेर तालुक्यात ३३ हजार ७९२ हेक्टरवरील खरीप पिकांची दैना; आमदार अमोल खताळ यांची मुख्यमंत्र्यांकडे तातडीने आर्थिक मदतीची मागणी

16/09/2026

ओम ज्वेलर्स चोरी प्रकरणाचा स्थानिक गुन्हे शाखेकडून पर्दाफाश; तिघांना अटक, मिरजगाव येथील गुन्ह्याचीही उकल

16/09/2026
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
Home » अल्पवयीन मुलीवर अ‍ॅसिड हल्ला; आरोपीचे रेखाचित्र समोर
गुन्हेगारी

अल्पवयीन मुलीवर अ‍ॅसिड हल्ला; आरोपीचे रेखाचित्र समोर

नागरिकांनी माहिती देण्यासाठी पोलीस निरीक्षक प्रवीण साळुंखे (९६८९९०३५८८), संगमनेर तालुका पोलीस स्टेशन (०२४२५-२२५४३३), सहाय्यक पोलीस निरीक्षक पी.एन. काळे (९८२२३००२३३) किंवा पोलीस उपनिरीक्षक महेश व्ही. शिंदे (९५२७९३०९९७) यांच्याशी संपर्क साधावा
Annant PpangarkarBy Annant Ppangarkar19/03/2026No Comments2 Mins Read
Facebook Twitter WhatsApp
Share
Facebook Twitter Email Telegram WhatsApp

संगमनेर, प्रतिनिधी- 

संगमनेर तालुक्यातील वडगावपान परिसरात एका अल्पवयीन मुलीच्या चेहऱ्यावर अ‍ॅसिड सदृश्य द्रव पदार्थ एकूण हल्ला झाल्याची धक्कादायक घटना घडली. या प्रकरणाने संपूर्ण परिसरात खळबळ उडाली आहे. या अमानवीय कृत्यानंतर पोलिसांनी तपासाची चक्रे वेगाने फिरवली असून प्रत्यक्षदर्शींच्या माहितीवरून संशयित आरोपीचे रेखाचित्र तयार करण्यात आले आहे.

ही घटना मंगळवारी (१७ मार्च) घडली. पीडित मुलगी शाळेतून सायकलवरून घरी जात असताना हाडकीच्या ओढ्याकडून जाणाऱ्या महादेव मळ्याकडील कच्च्या रस्त्यावर एका अज्ञात इसमाने तिला अडवले. साधारण ३२ ते ३५ वयोगटातील या व्यक्तीने रस्ता विचारण्याच्या बहाण्याने मुलीला थांबवले आणि अचानक आपल्याकडील बाटलीतील अ‍ॅसिडसदृश द्रव पदार्थ तिच्या तोंडावर उजव्या बाजूने फेकला. 

या हल्ल्यात मुलगी गंभीर जखमी झाली असून आरोपी घटनास्थळावरून फरार झाला आहे.

याप्रकरणी संगमनेर तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा रजी. नं १२६/२०२६ नुसार भारतीय न्याय संहिता कलम १२४ (१) आणि १२६ (२) अन्वये अज्ञात इसमाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन तांत्रिक विश्लेषण गुन्हे शोध पथक अहिल्यानगर, फॉरेन्सिक युनिट संगमनेर आणि संगमनेर शहर व तालुका पोलिसांची विविध पथके आरोपीचा शोध घेत आहेत.

सध्या पीडित मुलीवर लोणी येथील प्रवरा मेडिकल ट्रस्टच्या पी.एम.टी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. जनरल फिजिशियन, तज्ज्ञ प्लास्टिक सर्जन आणि नेत्रतज्ज्ञांच्या मार्गदर्शनाखाली तिच्यावर उपचार केले जात असून तिची प्रकृती सध्या स्थिर असल्याचे सांगण्यात आले आहे.

पोलिसांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे संशयित आरोपीचे रेखाचित्र जाहीर केले असून नागरिकांना आवाहन केले आहे की, रेखाचित्रातील व्यक्तीबाबत कोणासही काही खात्रीशीर माहिती मिळाल्यास किंवा ओळख पटल्यास त्यांनी तातडीने पोलीस प्रशासनाशी संपर्क साधावा. माहिती देणाऱ्याचे नाव गुप्त ठेवले जाईल असेही पोलिसांनी स्पष्ट केले आहे.

नागरिकांनी माहिती देण्यासाठी पोलीस निरीक्षक प्रवीण साळुंखे (९६८९९०३५८८), संगमनेर तालुका पोलीस स्टेशन (०२४२५-२२५४३३), सहाय्यक पोलीस निरीक्षक पी.एन. काळे (९८२२३००२३३) किंवा पोलीस उपनिरीक्षक महेश व्ही. शिंदे (९५२७९३०९९७) यांच्याशी संपर्क साधावा.

anantpangarkar
Annant Ppangarkar

Post Views: 2,152
अल्पवयीन मुलीवर ॲसिड हल्ला आरोपी रेखाचित्र संगमनेर तालुका पोलीस
Share. Facebook Twitter Pinterest WhatsApp
Annant Ppangarkar
  • Website

Related Posts

ओम ज्वेलर्स चोरी प्रकरणाचा स्थानिक गुन्हे शाखेकडून पर्दाफाश; तिघांना अटक, मिरजगाव येथील गुन्ह्याचीही उकल

16/09/2026

पोलीस प्रशासनाचा मोठा निर्णय, गणेशोत्सवादरम्यान ‘यांना’ संगमनेर व अकोले तालुक्यात प्रवेश बंदीचे आदेश जारी___वाचा यादी

15/09/2026

सण-उत्सवांच्या पार्श्वभूमीवर संगमनेर उपविभागात पोलीस प्रशासनाची मोठी कारवाई; गुन्हेगारी पार्श्वभूमीचे सात जण जिल्ह्यातून हद्दपार

15/09/2026
Leave A Reply Cancel Reply

Document
Our Picks
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
Advertisement 1 Advertisement 2 Advertisement 3 Advertisement 4
Don't Miss
शिबिर

संगमनेरमध्ये युवक काँग्रेस पदाधिकाऱ्यांसाठी विशेष आपत्कालीन वैद्यकीय प्रशिक्षण शिबिर; आपत्कालीन प्रसंगात रुग्णांचे प्राण वाचवण्यासाठी युवकांनी पुढाकार घ्यावा: डॉ. जयश्रीताई थोरात

By Annant Ppangarkar16/09/20260

Annant Ppangarkar महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन – धावपळीच्या आधुनिक जीवनशैलीत अचानक निर्माण होणाऱ्या वैद्यकीय आणीबाणीच्या…

संगमनेर तालुक्यात ३३ हजार ७९२ हेक्टरवरील खरीप पिकांची दैना; आमदार अमोल खताळ यांची मुख्यमंत्र्यांकडे तातडीने आर्थिक मदतीची मागणी

16/09/2026

ओम ज्वेलर्स चोरी प्रकरणाचा स्थानिक गुन्हे शाखेकडून पर्दाफाश; तिघांना अटक, मिरजगाव येथील गुन्ह्याचीही उकल

16/09/2026

दूषित पाणीपुरवठ्यामुळे राजापूरकरांचे आरोग्य धोक्यात; ग्रामपंचायतीच्या कारभारावर नागरिकांचा तीव्र संताप

16/09/2026
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow

तुमचे हक्काचे व्यासपीठ

Facebook YouTube
Our Picks
September 2026
M T W T F S S
 123456
78910111213
14151617181920
21222324252627
282930  
« Aug    
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • पत्रकारिता
  • फोटो / गॅलरी
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
  • शेती व सहकार
  • सामाजिक
  • CONTACT US
  • ABOUT US
  • PRIVACY POLICY
© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.