Close Menu
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
What's Hot

अहिल्यानगरमध्ये वकिलाच्या हत्येप्रकरणी ७ आरोपींना मरेपर्यंत जन्मठेप; जिल्हा न्यायालयाचा मोठा निकाल

28/08/2026

नेपाळमधील महाप्रलयात संगमनेरचे ४५ पर्यटक सुखरूप; उंच ठिकाणावर असल्याने टळला मोठा अनर्थ, आज लुंबिनीतून निघून उद्या भारतात परतणार!

28/08/2026

संगमनेरकरांच्या अभिप्रेत असलेलेच छत्रपती शिवाजी महाराजांचे भव्य-दिव्य स्मारक उभारणार! “दीड वर्षे खाती हातात असूनही वाढीव जागेचा प्रश्न सोडवला नाही; आता स्मारकाच्या कामात खोडा घालून संगमनेरकरांची दिशाभूल करू नका”

28/08/2026
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
Home » संविधानातील मूल्ये घराघरांत पोहोचवणे हीच डॉ. आंबेडकरांना खरी मानवंदना; माजी आमदार डॉ. सुधीर तांबे
सामाजिक

संविधानातील मूल्ये घराघरांत पोहोचवणे हीच डॉ. आंबेडकरांना खरी मानवंदना; माजी आमदार डॉ. सुधीर तांबे

डॉ. सागर भालेराव यांनी भविष्यातील कार्याची दिशा स्पष्ट केली.
Annant PpangarkarBy Annant Ppangarkar20/03/2026No Comments2 Mins Read
Facebook Twitter WhatsApp
Share
Facebook Twitter Email Telegram WhatsApp

संगमनेर, प्रतिनिधी-
डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी समतावादी समाजाचे स्वप्न पाहिले, मात्र दुर्दैवाने त्यांचे हे क्रांतिकारी विचार जनसामान्यांपर्यंत पोहोचवण्यात आपण अद्यापही पूर्णतः यशस्वी झालेलो नाही, अशी खंत माजी आमदार डॉ. सुधीर तांबे यांनी व्यक्त केली आहे.
महाड येथील ऐतिहासिक चवदार तळे सत्याग्रहाच्या शताब्दी वर्षाचे औचित्य साधून संगमनेर येथील प्रवरा नदीकाठच्या गंगामाई घाटावर भव्य ‘अभिवादन सभा’ झाली, त्यावेळी ते बोलत होते. राष्ट्र सेवा दल आणि छात्र भारती यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित या कार्यक्रमात तालुक्यातील विविध पुरोगामी आणि सामाजिक संघटनांनी एकत्र येत डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या ऐतिहासिक लढ्याला मानवंदना दिली.
डॉ. तांबे म्हणाले, १९२७ मध्ये महाड येथे झालेला हा संघर्ष केवळ पाण्यासाठी नव्हता, तर तो मानवी प्रतिष्ठा, आत्मसन्मान आणि सामाजिक समानतेचा हुंकार होता. शतकानुशतकांची गुलामगिरी झुगारून देण्यासाठी डॉ. आंबेडकरांनी जे पाऊल उचलले, त्यातूनच खऱ्या अर्थाने भारतीय सामाजिक परिवर्तनाच्या चळवळीला नवी दिशा मिळाली. आजच्या काळात संविधानातील मूल्यांचा प्रचार आणि प्रसार करण्यासाठी सर्वांनी वैचारिक मतभेद बाजूला ठेवून एकजुटीने आणि एकमताने प्रयत्न करण्याची गरज असल्याचे त्यांनी यावेळी ठामपणे मांडले.
या प्रसंगी राष्ट्र सेवा दलाचे राष्ट्रीय सचिव डॉ. सागर भालेराव यांनी भविष्यातील कार्याची दिशा स्पष्ट केली. चवदार तळे सत्याग्रहाचे शताब्दी वर्ष आणि महात्मा ज्योतिराव फुले यांच्या जयंतीचे द्विशतक (२०० वर्षे) ही दोन्ही निमित्य साधून संपूर्ण देशभरात ‘विषमता निर्मूलन निर्धार वर्ष’ साजरे केले जाणार असल्याचे ते म्हणाले. जातीभेद आणि विषमता मुक्त भारत घडवण्यासाठी तरुणांनी मोठ्या संख्येने या चळवळीत सहभागी व्हावे, असे आवाहनही त्यांनी यावेळी केले.
या अभिवादन सभेला डॉ. सागर भालेराव आणि डॉ. सुधीर तांबे यांच्यासह के. जी. भालेराव, हिरालाल पगडाल, अजिजभाई ओहरा, अनिकेत घुले, ज्ञानेश्वर राक्षे, प्रविण गायकवाड, रघुनाथ भालेराव, सुनंदा मेढे, संगीता जामधडे, हीना सोनावणे, सूर्यकांत शिंदे, किशोर चव्हाण, ज्ञानेश्वर सानप, जुबेर इनामदार, राहुल जऱ्हाड, विशाल शिंदे यांच्यासह विविध संघटनांचे पदाधिकारी आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाच्या शेवटी उपस्थित सर्वांनी सामाजिक परिवर्तनासाठी आणि संविधानिक मूल्यांच्या रक्षणासाठी आयुष्यभर कटिबद्ध राहण्याचा सामूहिक निर्धार व्यक्त केला.

anantpangarkar
Annant Ppangarkar

Post Views: 374
चवदार तळे शताब्दी सुधीर तांबे
Share. Facebook Twitter Pinterest WhatsApp
Annant Ppangarkar
  • Website

Related Posts

यशोधन कार्यालयाच्या पाठपुराव्यामुळे तालुक्यातील ८,६०० बांधकाम व असंघटित कामगारांच्या खात्यावर १० कोटी १६ लाख रुपये जमा

24/08/2026

साथी भास्करराव दुर्वे नाना यांच्या स्मृतीला अभिवादन: संगमनेरमध्ये तालुकास्तरीय वक्तृत्व स्पर्धेचे आयोजन

21/08/2026

संगमनेर तालुक्यात मुलींच्या स्वसंरक्षणासाठी ‘मुक्कामार’ अभियान सुरू; अभिनेत्री इशिता शर्मा व डॉ. जयश्रीताई थोरात यांचा स्तुत्य पुढाकार

18/08/2026
Leave A Reply Cancel Reply

Document
Our Picks
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
Advertisement 1 Advertisement 2 Advertisement 3 Advertisement 4
Don't Miss
न्यायालय

अहिल्यानगरमध्ये वकिलाच्या हत्येप्रकरणी ७ आरोपींना मरेपर्यंत जन्मठेप; जिल्हा न्यायालयाचा मोठा निकाल

By Annant Ppangarkar28/08/20260

Annant Ppangarkar महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन  अहिल्यानगर: नेवासा तहसील कार्यालयाच्या आवारात भरदुपारी वकिलावर गोळ्या झाडून…

नेपाळमधील महाप्रलयात संगमनेरचे ४५ पर्यटक सुखरूप; उंच ठिकाणावर असल्याने टळला मोठा अनर्थ, आज लुंबिनीतून निघून उद्या भारतात परतणार!

28/08/2026

संगमनेरकरांच्या अभिप्रेत असलेलेच छत्रपती शिवाजी महाराजांचे भव्य-दिव्य स्मारक उभारणार! “दीड वर्षे खाती हातात असूनही वाढीव जागेचा प्रश्न सोडवला नाही; आता स्मारकाच्या कामात खोडा घालून संगमनेरकरांची दिशाभूल करू नका”

28/08/2026

गुन्हे शाखेची धडक कारवाई ५ ठिकाणी छापे, ८९ हजार रुपयांचा गुटखा व मावा जप्त

28/08/2026
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow

तुमचे हक्काचे व्यासपीठ

Facebook YouTube
Our Picks
August 2026
M T W T F S S
 12
3456789
10111213141516
17181920212223
24252627282930
31  
« Jul    
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • पत्रकारिता
  • फोटो / गॅलरी
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
  • शेती व सहकार
  • सामाजिक
  • CONTACT US
  • ABOUT US
  • PRIVACY POLICY
© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.