Close Menu
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
What's Hot

संगमनेर महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. अरुण गायकवाड यांना ‘डॉ. जे. पी. नाईक आदर्श राज्य शिक्षक पुरस्कार’ प्रदान

06/09/2026

महात्मा फुले जन्मद्विशताब्दी निमित्त संगमनेरात उद्या प्रा. डॉ. शरद बाविस्कर यांचे ‘अस्वस्थ भारताचे अंतरंग’ विषयावर व्याख्यान

06/09/2026

आज रविवार, ०६ सप्टेंबर २०२६ — तुमचा आजचा दिवस कसा असेल, जाणून घ्या

06/09/2026
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
Home » संगमनेर नगरपरिषदेच्या दुर्लक्षामुळे रंगारगल्लीतील ‘एसटीपी’चे काम रखडले; भाविक आणि नागरिकांना चिखल-खड्ड्यांतून करावी लागतेय कसरत
सामाजिक

संगमनेर नगरपरिषदेच्या दुर्लक्षामुळे रंगारगल्लीतील ‘एसटीपी’चे काम रखडले; भाविक आणि नागरिकांना चिखल-खड्ड्यांतून करावी लागतेय कसरत

युवासेना विधानसभा प्रमुख अमोल राजेंद्र डुकरे यांनी या प्रश्नी पुढाकार घेत संगमनेर नगरपरिषदेच्या मुख्याधिकाऱ्यांना लेखी निवेदन दिले आहे
Annant PpangarkarBy Annant Ppangarkar20/03/2026No Comments2 Mins Read
Facebook Twitter WhatsApp
Share
Facebook Twitter Email Telegram WhatsApp

संगमनेर, प्रतिनिधी-
संगमनेर शहराच्या मध्यवस्तीत असलेल्या रंगारगल्ली परिसरातील शनिमंदिरासमोर सांडपाणी प्रक्रिया प्रकल्पाचे (एसटीपी) काम गेल्या १५ दिवसांपासून अर्धवट अवस्थेत टाकून देण्यात आले आहे. ठेकेदाराने हे काम अर्धवट सोडून अन्य कामांकडे लक्ष वळवल्याने या भागातील रस्ता खोदून ठेवण्यात आला असून, त्यामुळे स्थानिक नागरिक, शालेय विद्यार्थी आणि भाविकांना मोठा मनस्ताप सहन करावा लागत आहे. नगरपरिषद प्रशासनाच्या या उदासीन धोरणामुळे परिसरातील जनजीवन विस्कळीत झाले असून नागरिकांमध्ये संताप व्यक्त होत आहे.
रंगारगल्ली परिसरातून शनिमंदिर, स्वामी समर्थ मंदिर, साईबाबा मंदिर, संतोषी माता मंदिर आणि गंगामाई मंदिराकडे जाणाऱ्या भाविकांची मोठी वर्दळ असते. प्रवरा नदी तीरावर जाण्यासाठी देखील हा मुख्य मार्ग आहे. मात्र, या ठिकाणी एसटीपीच्या कामासाठी रस्त्याच्या मधोमध मोठे खड्डे खोदून ठेवले आहेत. खोदाईनंतर परिसरात मोठ्या प्रमाणात खडी आणि चिखल साचला असून पावसामुळे किंवा सांडपाण्यामुळे या चिखलातून चालणे कठीण झाले आहे. कामाच्या ठिकाणी केवळ बॅरिकेट्स लावून रस्ता अडवण्यात आला आहे, मात्र प्रत्यक्ष काम बंद असल्याने वाहतुकीची मोठी कोंडी होत आहे.
या रस्त्याचा वापर दररोज शेकडो शालेय विद्यार्थी आणि वयोवृद्ध नागरिक करतात. खड्डे आणि चिखलामुळे या ठिकाणी अनेक छोटे-मोठे अपघात घडले असून पादचाऱ्यांना इजा होण्याचे प्रमाण वाढले आहे. रात्रीच्या वेळी या खड्ड्यांमुळे गंभीर अपघात होण्याची भीती वर्तवण्यात येत आहे. प्रशासनाने याकडे सोयीस्कर दुर्लक्ष केल्याचा आरोप स्थानिक रहिवाशांनी केला आहे. “स्वच्छ संगमनेर, सुंदर संगमनेर” असा नारा देणारी नगरपरिषद आपल्याच हद्दीतील या महत्त्वाच्या कामाकडे दुर्लक्ष का करत आहे, असा प्रश्न आता उपस्थित केला जात आहे.
युवासेना विधानसभा प्रमुख अमोल राजेंद्र डुकरे यांनी या प्रश्नी पुढाकार घेत संगमनेर नगरपरिषदेच्या मुख्याधिकाऱ्यांना लेखी निवेदन दिले आहे. या निवेदनात त्यांनी नमूद केले आहे की, ठेकेदाराच्या निष्काळजीपणामुळे सामान्य नागरिकांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे. प्रशासनाने तात्काळ दखल घेऊन हे अर्धवट राहिलेले काम युद्धपातळीवर पूर्ण करावे आणि रस्ता पूर्ववत करून नागरिकांची गैरसोय दूर करावी. जर हे काम लवकरात लवकर पूर्ण झाले नाही, तर भविष्यात मोठ्या अपघाताची शक्यता नाकारता येणार नाही, असा इशाराही त्यांनी दिला आहे.

anantpangarkar
Annant Ppangarkar

Post Views: 1,016
एसटीपी प्लांट शनी मंदिर संगमनेर नगरपरिषद समस्या
Share. Facebook Twitter Pinterest WhatsApp
Annant Ppangarkar
  • Website

Related Posts

संगमनेर शहरात वाढणार सीसीटीव्हीची नजर; विविध विकासकामांचे सोमवारी बाळासाहेब थोरात यांच्या हस्ते होणार लोकार्पण

05/09/2026

सत्याचा आवाज, लेखणीचा पहारेकरी – ज्येष्ठ पत्रकार अनंत पांगारकर यांचा आंबेडकरी चळवळीच्यावतीने हृद्य सत्कार

02/09/2026

वीज मंडळाच्या कारभाराविरोधात शिवसैनिकांचा आंदोलनाचा इशारा; वीजपुरवठा सुरळीत करण्याची रवींद्र कानकाटे यांची मागणी

02/09/2026
Leave A Reply Cancel Reply

Document
Our Picks
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
Advertisement 1 Advertisement 2 Advertisement 3 Advertisement 4
Don't Miss
पुरस्कार

संगमनेर महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. अरुण गायकवाड यांना ‘डॉ. जे. पी. नाईक आदर्श राज्य शिक्षक पुरस्कार’ प्रदान

By Annant Ppangarkar06/09/20260

Annant Ppangarkar महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात पार पडलेल्या दिमाखदार सोहळ्यात महाराष्ट्र…

महात्मा फुले जन्मद्विशताब्दी निमित्त संगमनेरात उद्या प्रा. डॉ. शरद बाविस्कर यांचे ‘अस्वस्थ भारताचे अंतरंग’ विषयावर व्याख्यान

06/09/2026

आज रविवार, ०६ सप्टेंबर २०२६ — तुमचा आजचा दिवस कसा असेल, जाणून घ्या

06/09/2026

रविवार विशेष लेख — बोगस जीडीपीचा फज्जा…!

06/09/2026
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow

तुमचे हक्काचे व्यासपीठ

Facebook YouTube
Our Picks
September 2026
M T W T F S S
 123456
78910111213
14151617181920
21222324252627
282930  
« Aug    
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • पत्रकारिता
  • फोटो / गॅलरी
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
  • शेती व सहकार
  • सामाजिक
  • CONTACT US
  • ABOUT US
  • PRIVACY POLICY
© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.