Close Menu
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
What's Hot

थोरात सहकारी साखर कारखान्याच्या गळीत हंगामाचा उद्या शुभारंभ; जाणून घ्या कितवा आहे हा हंगाम!

13/10/2026

पंचनाम्यात वेळ घालवू नका, सरसकट मदत करा! दिल्लीवरून थेट शेतकऱ्यांच्या बांधावर पोहोचून बाळासाहेब थोरात आक्रमक!

13/10/2026

डीजेचा आवाज आणि लेझर लाईट्स खरोखरच जीवघेणे ठरू शकतात? तज्ज्ञ डॉक्टर काय म्हणतात, पाहा… शिंदेवाडीतील विद्यार्थ्यांच्या शिबिरात नेमकं काय घडलं…

13/10/2026
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
Home » सण झाला कडू: गुढीपाडव्यालाच संगमनेरात गारपिटीचा तडाखा; १२५ हेक्टरवरील पिके उद्ध्वस्त
नैसर्गिक आपत्ती

सण झाला कडू: गुढीपाडव्यालाच संगमनेरात गारपिटीचा तडाखा; १२५ हेक्टरवरील पिके उद्ध्वस्त

दोन्ही गावांतील एकूण १८० शेतकऱ्यांच्या १२५ हेक्टर क्षेत्रावरील कांदा, टोमॅटो, टरबूज, पपई आणि इतर भाजीपाला पिकांचे नुकसान झाले आहे.
Annant PpangarkarBy Annant Ppangarkar22/03/2026No Comments2 Mins Read
Facebook Twitter WhatsApp
Share
Facebook Twitter Email Telegram WhatsApp

संगमनेर | प्रतिनिधी
संगमनेर तालुक्यात गुरुवारी गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर आलेल्या अवकाळी पावसाने आणि पठार भागातील काही गावांमध्ये झालेल्या जोरदार गारपिटीने शेतकऱ्यांचे मोठे आर्थिक नुकसान केले आहे. या नैसर्गिक आपत्तीत जांबुत खुर्द आणि जांबुत बुद्रुक या दोन गावांना सर्वाधिक फटका बसला असून, सुमारे १२५ हेक्टर क्षेत्रावरील पिकांचे नुकसान झाले असल्याची माहिती तालुका कृषी अधिकारी रेजा बोडके यांनी दिली आहे.
गेल्या तीन-चार दिवसांपासून संगमनेर तालुक्याच्या वातावरणात सातत्याने बदल होत होते. हवामान खात्याने वर्तविलेल्या अंदाजानुसार गुरुवारी सायंकाळच्या सुमारास शहर आणि तालुक्याच्या विविध भागांत पावसाने हजेरी लावली. कोकणगाव, साकूर, घारगाव, जांबुत यांसह अनेक गावांत पाऊस झाला, मात्र पठार भागातील काही ठराविक पट्ट्यात पावसासोबतच मोठी गारपीट झाली. अचानक आलेल्या या संकटामुळे शेतकरी आणि नागरिकांची मोठी धावपळ उडाली.
या गारपिटीचा सर्वाधिक तडाखा जांबुत बुद्रुक आणि जांबुत खुर्द या दोन गावांना बसला आहे. कृषी विभागाने तातडीने केलेल्या पंचनाम्यानुसार, जांबुत बुद्रुक येथील ७० शेतकऱ्यांचे सुमारे ५० हेक्टरवरील पिकांचे नुकसान झाले आहे. तर जांबुत खुर्द येथील ११० शेतकऱ्यांचे ७५ हेक्टरवरील पीक बाधित झाले आहे. अशा प्रकारे दोन्ही गावांतील एकूण १८० शेतकऱ्यांच्या १२५ हेक्टर क्षेत्रावरील कांदा, टोमॅटो, टरबूज, पपई आणि इतर भाजीपाला पिकांचे नुकसान झाले आहे. ज्या शेतकऱ्यांनी गव्हाची काढणी पूर्ण केली होती, त्यांचे नुकसान टळले असले तरी नगदी पिके घेणारे शेतकरी मात्र हवालदिल झाले आहेत.
शासकीय नियमानुसार, ज्या शेतकऱ्यांचे ३३ टक्क्यांपेक्षा जास्त नुकसान झाले आहे, त्यांनाच नुकसान भरपाई दिली जाणार आहे. कृषी विभागाने आपला सविस्तर नुकसानीचा अहवाल महसूल प्रशासनाला सादर केला असून, आता बाधितांना कधी आणि किती मदत मिळणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. तालुक्यात इतरत्र पाऊस झाला असला तरी गारपिटीचा प्रभाव केवळ या दोनच गावांत मर्यादित असल्याचे कृषी अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले आहे.

📌 संगमनेर तालुक्यात अनेक ठिकाणी पाऊस झाला असला तरी जांबुत खुर्द व जांबुत बुद्रुक या दोनच गावांमध्ये गारपिटीमुळे पिकांचे नुकसान झाले आहे. एकूण १८० शेतकऱ्यांच्या १२५ हेक्टरवरील कांदा, टोमॅटो, टरबूज, पपई व भाजीपाला पिकांचे नुकसान झाल्याचा अहवाल आम्ही महसूल प्रशासनाला सादर केला आहे. — रेजा बोडके (तालुका कृषी अधिकारी, संगमनेर)

anantpangarkar
Annant Ppangarkar

Post Views: 481
कृषी विभाग रेजा बोडके शेती पीक नुकसान
Share. Facebook Twitter Pinterest WhatsApp
Annant Ppangarkar
  • Website

Related Posts

पंचनाम्यात वेळ घालवू नका, सरसकट मदत करा! दिल्लीवरून थेट शेतकऱ्यांच्या बांधावर पोहोचून बाळासाहेब थोरात आक्रमक!

13/10/2026

दुष्काळाची पाहणी करण्यासाठी उद्या केंद्रीय पथक अहिल्यानगर जिल्ह्यात; शेती व पाणी परिस्थितीचा घेणार आढावा

08/10/2026

सुधारित प्रधानमंत्री पीक विमा योजना: ३१ जुलैपर्यंत सहभागी होण्याचे कृषी विभागाचे आवाहन

13/07/2026
Leave A Reply Cancel Reply

Document
Our Picks
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
Advertisement 1 Advertisement 2 Advertisement 3 Advertisement 4
Don't Miss
शेती व सहकार

थोरात सहकारी साखर कारखान्याच्या गळीत हंगामाचा उद्या शुभारंभ; जाणून घ्या कितवा आहे हा हंगाम!

By Annant Ppangarkar13/10/20260

महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन- सहकारमहर्षी भाऊसाहेब थोरात सहकारी साखर कारखान्याच्या गळीत हंगामाचा शुभारंभ उद्या बुधवारी…

पंचनाम्यात वेळ घालवू नका, सरसकट मदत करा! दिल्लीवरून थेट शेतकऱ्यांच्या बांधावर पोहोचून बाळासाहेब थोरात आक्रमक!

13/10/2026

डीजेचा आवाज आणि लेझर लाईट्स खरोखरच जीवघेणे ठरू शकतात? तज्ज्ञ डॉक्टर काय म्हणतात, पाहा… शिंदेवाडीतील विद्यार्थ्यांच्या शिबिरात नेमकं काय घडलं…

13/10/2026

शिक्षण क्षेत्राची मान उंचावणारी बातमी! संगमनेरच्या या लेखकाच्या चार पुस्तकांचा शासनमान्य ग्रंथ निवडसुचित समावेश; वाचा सविस्तर

13/10/2026
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow

तुमचे हक्काचे व्यासपीठ

Facebook YouTube
Our Picks
October 2026
M T W T F S S
 1234
567891011
12131415161718
19202122232425
262728293031  
« Sep    
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • पत्रकारिता
  • फोटो / गॅलरी
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
  • शेती व सहकार
  • सामाजिक
  • CONTACT US
  • ABOUT US
  • PRIVACY POLICY
© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.