Close Menu
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
What's Hot

माझं गाव माझा अभिमान… राजापूर

14/10/2026

“गंभीर दुष्काळाने साखर कारखानदारी अडचणीत; सरकारने तातडीने मदत करावी” – बाळासाहेब थोरात यांची जोरदार मागणी

14/10/2026

‘ये पब्लिक है, सब जानती है!’ — निळवंडेच्या पाण्याचे श्रेय लाटणाऱ्याना संगमनेरची जनता निवडणुकीत देणार सडेतोड उत्तर; अमोल शेलकर यांचा घणाघात

14/10/2026
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
Home » भोंदू अशोक खरात व त्याच्या राजकीय आश्रयदात्यांना कठोर शिक्षा करा; माकपची आक्रमक मागणी
महाराष्ट्र संवाद विशेष

भोंदू अशोक खरात व त्याच्या राजकीय आश्रयदात्यांना कठोर शिक्षा करा; माकपची आक्रमक मागणी

राज्यात सध्या अंधश्रद्धा, अज्ञान आणि धार्मिक अंधभक्तीचा गैरफायदा घेऊन जनतेची लूट करण्याचे प्रकार वाढले आहेत. हे केवळ सामाजिक संकट नसून सत्ताधारी व्यवस्थेच्या अपयशाचे लक्षण आहे.
Annant PpangarkarBy Annant Ppangarkar22/03/2026No Comments2 Mins Read
Facebook Twitter WhatsApp
Share
Facebook Twitter Email Telegram WhatsApp

संगमनेर, प्रतिनिधी-
नाशिक येथे हजारो भाविकांची आर्थिक, शारीरिक आणि मानसिक लूट करणाऱ्या भोंदू अशोक खरात याच्या कृत्याचा मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाने (माकप) तीव्र शब्दांत निषेध केला आहे. या संपूर्ण प्रकरणाची व्याप्ती आणि त्यातील राजकीय लागेबांधे पाहता, खरात याच्यासह त्याला पाठबळ देणाऱ्या बड्या राजकीय नेत्यांची व प्रशासकीय घटकांची सखोल चौकशी करून त्यांना कठोरातील कठोर शिक्षा करावी, अशी मागणी पक्षाचे राज्य सचिव डॉ. अजित नवले यांनी एका प्रसिद्धी पत्रकाद्वारे केली आहे.
पीडित नागरिकांना तातडीने न्याय व आर्थिक भरपाई देण्यासाठी विशेष यंत्रणा उभारावी आणि अंधश्रद्धा निर्मूलन कायद्याची राज्यात कडक अंमलबजावणी करावी, अशी मागणीही पक्षाने लावून धरली आहे.
या प्रकरणावर भाष्य करताना माकपने म्हटले आहे की, कोणताही भोंदू बाबा एकट्याने इतक्या मोठ्या प्रमाणावर फसवणूक करू शकत नाही. या कृत्यामागे राज्यातील सत्ताधारी, प्रभावशाली राजकीय नेते आणि प्रशासनातील काही घटकांचा वरदहस्त असण्याची दाट शक्यता आहे. त्यामुळे या प्रकरणाचे सत्य जनतेसमोर येण्यासाठी याची उच्चस्तरीय आणि कालबद्ध चौकशी विशेष तपास पथकाद्वारे (SIT) किंवा न्यायालयीन देखरेखीखाली करण्यात यावी. तसेच, अशोक खरात याच्याशी संबंधित असलेली सर्व बेनामी मालमत्ता सरकारने तातडीने ताब्यात घ्यावी, अशी आग्रही मागणी पक्षाने केली आहे.
या गुन्ह्यात अनेक महिलांचे शोषण झाले असल्यामुळे सरकारने आणि पोलिसांनी तपास प्रक्रियेत कोणतीही ढिलाई दाखवू नये, असे आवाहन माकपने केले आहे. तपासादरम्यान कोणताही राजकीय नेता किंवा अधिकारी दोषी आढळल्यास त्यांची नावे जाहीर करून त्यांच्यावर कठोर कारवाई होणे अपेक्षित आहे. जर आरोपींना वाचवण्याचा प्रयत्न झाला, तर मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्ष रस्त्यावर उतरून तीव्र जनआंदोलन उभारेल, असा इशाराही यावेळी देण्यात आला आहे.
राज्यात सध्या अंधश्रद्धा, अज्ञान आणि धार्मिक अंधभक्तीचा गैरफायदा घेऊन जनतेची लूट करण्याचे प्रकार वाढले आहेत. हे केवळ सामाजिक संकट नसून सत्ताधारी व्यवस्थेच्या अपयशाचे लक्षण आहे. वैज्ञानिक दृष्टिकोन आणि संविधानिक मूल्यांची पायमल्ली करणाऱ्या या प्रवृत्तींविरुद्ध सर्व पुरोगामी, धर्मनिरपेक्ष आणि लोकशाहीवादी शक्तींनी एकत्र येण्याचे आवाहन डॉ. अजित नवले यांनी केले आहे.

anantpangarkar
Annant Ppangarkar

Post Views: 515
अजित नवले अशोक खरात माकप
Share. Facebook Twitter Pinterest WhatsApp
Annant Ppangarkar
  • Website

Related Posts

“राजा किती क्रूर आणि खोटारडा आहे…” आई-बाळाची आर्त हाक अन् पोलिसांचा पाशवी हात; संजय राऊतांनी शेअर केलेल्या ‘त्या’ एका छायाचित्राने हादरवला महाराष्ट्र!

12/10/2026

MPSC आंदोलनाला डॉ. जयश्रीताई थोरात यांचा पाठिंबा; समाज आणि आयोगातील ब्लड कॅन्सर ठीक करायचाय!

10/10/2026

महात्मा गांधी हे भारतीय तत्त्वज्ञानाचे प्रतिबिंब: संदीप वाकचौरे

07/10/2026
Leave A Reply Cancel Reply

Document
Our Picks
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
Advertisement 1 Advertisement 2 Advertisement 3 Advertisement 4
Don't Miss
सामाजिक

माझं गाव माझा अभिमान… राजापूर

By Annant Ppangarkar14/10/20260

माझा गाव माझा अभिमान… राजापूर भाऊसाहेब गणपत हासे, अध्यक्ष, महात्मा गांधी तंटामुक्ती समिती, राजापूर. (मो.…

“गंभीर दुष्काळाने साखर कारखानदारी अडचणीत; सरकारने तातडीने मदत करावी” – बाळासाहेब थोरात यांची जोरदार मागणी

14/10/2026

‘ये पब्लिक है, सब जानती है!’ — निळवंडेच्या पाण्याचे श्रेय लाटणाऱ्याना संगमनेरची जनता निवडणुकीत देणार सडेतोड उत्तर; अमोल शेलकर यांचा घणाघात

14/10/2026

सरकारी जमिनीवर अतिक्रमण! प्रशासनाचा डोळेझाक कारभार; अधिकाऱ्यांना सरकारी मालमत्ता सांभाळता येईना

14/10/2026
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow

तुमचे हक्काचे व्यासपीठ

Facebook YouTube
Our Picks
October 2026
M T W T F S S
 1234
567891011
12131415161718
19202122232425
262728293031  
« Sep    
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • पत्रकारिता
  • फोटो / गॅलरी
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
  • शेती व सहकार
  • सामाजिक
  • CONTACT US
  • ABOUT US
  • PRIVACY POLICY
© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.