Close Menu
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
What's Hot

माझं गाव माझा अभिमान… राजापूर

14/10/2026

“गंभीर दुष्काळाने साखर कारखानदारी अडचणीत; सरकारने तातडीने मदत करावी” – बाळासाहेब थोरात यांची जोरदार मागणी

14/10/2026

‘ये पब्लिक है, सब जानती है!’ — निळवंडेच्या पाण्याचे श्रेय लाटणाऱ्याना संगमनेरची जनता निवडणुकीत देणार सडेतोड उत्तर; अमोल शेलकर यांचा घणाघात

14/10/2026
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
Home » संगमनेरमध्ये पेट्रोल पंपांवर वाहनधारकांच्या लांबच लांब रांगा; इराण-इस्राईल युद्धाच्या पार्श्वभूमीवर इंधन टंचाईची भीती, प्रशासनाकडून अद्याप स्पष्टता नाही!
महाराष्ट्र संवाद विशेष

संगमनेरमध्ये पेट्रोल पंपांवर वाहनधारकांच्या लांबच लांब रांगा; इराण-इस्राईल युद्धाच्या पार्श्वभूमीवर इंधन टंचाईची भीती, प्रशासनाकडून अद्याप स्पष्टता नाही!

या संदर्भात अद्याप प्रशासनाकडून कोणताही खुलासा करण्यात आलेला नाही अथवा माहिती देण्यात आली नाही.
Annant PpangarkarBy Annant Ppangarkar23/03/2026No Comments2 Mins Read
Facebook Twitter WhatsApp
Share
Facebook Twitter Email Telegram WhatsApp

संगमनेर, प्रतिनिधी- 

इराण आणि इस्राईल यांच्यात सुरू असलेल्या युद्धसदृश परिस्थितीचे पडसाद आता स्थानिक पातळीवर उमटताना दिसत आहेत. संगमनेर शहरासह परिसरातील विविध पेट्रोल पंपांवर आज सकाळपासूनच वाहनधारकांची प्रचंड गर्दी उसळल्याचे चित्र पाहायला मिळाले. दरम्यान अचानक पेट्रोल पंपावर उसळलेल्या वाहनधारकांच्या गर्दीमुळे खरोखर पेट्रोलचे त्यांचाही निर्माण झाली का याबाबत साशंकता निर्माण झाली आहे. या संदर्भात अद्याप प्रशासनाकडून कोणताही खुलासा करण्यात आलेला नाही अथवा माहिती देण्यात आली नाही.

आंतरराष्ट्रीय स्तरावरील तणावामुळे येत्या काळात कच्च्या तेलाच्या किमती वाढण्याची किंवा इंधनाचा पुरवठा विस्कळीत होण्याची शक्यता वर्तवण्यात येत असल्याने, खबरदारीचा उपाय म्हणून नागरिकांनी पेट्रोल पंपांवर धाव घेतली आहे. त्यामुळे संगमनेर शहरातील सर्वच पेट्रोल पंपांवर वाहनधारकांच्या भल्या मोठ्या रांगा लागल्याचे दिसून आले. त्यातच भरीस भर म्हणून अचानक उसळलेली गर्दी बघून पेट्रोल पंप चालकांनी ऑनलाइन पेमेंट घेणे नाकारले. यामुळे देखील अनेकांचे वादाचे प्रसंग उद्भवले होते.

आज सकाळपासूनच शहरातील प्रमुख रस्त्यांवर असलेल्या पेट्रोल पंपांवर दुचाकी आणि चारचाकी वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या. अनेक ठिकाणी ही गर्दी इतकी मोठी होती की वाहनांच्या रांगा थेट मुख्य रस्त्यापर्यंत पोहोचल्या, यामुळे शहरातील वाहतूक व्यवस्थेवर मोठा ताण आला आणि काही काळ वाहतूक कोंडीची समस्याही निर्माण झाली होती. अचानक निर्माण झालेल्या या परिस्थितीमुळे सर्वसामान्यांमध्ये पेट्रोल टंचाईबाबत भीतीचे आणि संभ्रमाचे वातावरण पाहायला मिळाले.

विशेषतः सोशल मीडियावर इराण-इस्राईल युद्धाचे जागतिक अर्थव्यवस्थेवर होणारे परिणाम आणि इंधन दरवाढीच्या चर्चांना उधाण आल्याने नागरिकांमध्ये घबराट पसरली आहे. भविष्यकाळात इंधन मिळणे कठीण होईल किंवा त्याचे दर गगनाला भिडतील, या भीतीने नागरिक आपल्या वाहनांच्या टाक्या पूर्ण भरून घेताना दिसत आहेत. पेट्रोल पंप चालकांनी परिस्थिती हाताळण्याचा प्रयत्न केला, मात्र वाहनांचा ओघ सतत वाढत राहिल्याने काही काळ गोंधळाची स्थिती निर्माण झाली होती. सध्या प्रशासनाकडून किंवा तेल कंपन्यांकडून इंधन तुटवड्याबाबत कोणतीही अधिकृत माहिती समोर आलेली नसली तरी, युद्धाच्या सावटाखालील अनिश्चिततेमुळे संगमनेरकर चिंतेत असल्याचे दिसून येत आहे.

anantpangarkar
Annant Ppangarkar

Post Views: 1,481
पेट्रोल टंचाई पेट्रोल पंप वाहनधारकांच्या रांगा
Share. Facebook Twitter Pinterest WhatsApp
Annant Ppangarkar
  • Website

Related Posts

“राजा किती क्रूर आणि खोटारडा आहे…” आई-बाळाची आर्त हाक अन् पोलिसांचा पाशवी हात; संजय राऊतांनी शेअर केलेल्या ‘त्या’ एका छायाचित्राने हादरवला महाराष्ट्र!

12/10/2026

MPSC आंदोलनाला डॉ. जयश्रीताई थोरात यांचा पाठिंबा; समाज आणि आयोगातील ब्लड कॅन्सर ठीक करायचाय!

10/10/2026

महात्मा गांधी हे भारतीय तत्त्वज्ञानाचे प्रतिबिंब: संदीप वाकचौरे

07/10/2026
Leave A Reply Cancel Reply

Document
Our Picks
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
Advertisement 1 Advertisement 2 Advertisement 3 Advertisement 4
Don't Miss
सामाजिक

माझं गाव माझा अभिमान… राजापूर

By Annant Ppangarkar14/10/20260

माझा गाव माझा अभिमान… राजापूर भाऊसाहेब गणपत हासे, अध्यक्ष, महात्मा गांधी तंटामुक्ती समिती, राजापूर. (मो.…

“गंभीर दुष्काळाने साखर कारखानदारी अडचणीत; सरकारने तातडीने मदत करावी” – बाळासाहेब थोरात यांची जोरदार मागणी

14/10/2026

‘ये पब्लिक है, सब जानती है!’ — निळवंडेच्या पाण्याचे श्रेय लाटणाऱ्याना संगमनेरची जनता निवडणुकीत देणार सडेतोड उत्तर; अमोल शेलकर यांचा घणाघात

14/10/2026

सरकारी जमिनीवर अतिक्रमण! प्रशासनाचा डोळेझाक कारभार; अधिकाऱ्यांना सरकारी मालमत्ता सांभाळता येईना

14/10/2026
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow

तुमचे हक्काचे व्यासपीठ

Facebook YouTube
Our Picks
October 2026
M T W T F S S
 1234
567891011
12131415161718
19202122232425
262728293031  
« Sep    
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • पत्रकारिता
  • फोटो / गॅलरी
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
  • शेती व सहकार
  • सामाजिक
  • CONTACT US
  • ABOUT US
  • PRIVACY POLICY
© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.