Close Menu
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
What's Hot

लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांचे संगमनेर शहरात अद्यावत स्मारक उभारणार : माजी आमदार डॉ. सुधीर तांबे

August 1, 2026

‘कडलग इन्व्हेस्टमेंट’च्या आर्थिक साक्षरता कार्यशाळेला गुंतवणूकदारांचा प्रतिसाद

August 1, 2026

शनिवार, १ ऑगस्ट २०२६ — आजचा तुमचा दिवस कसा असेल

August 1, 2026
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
Home » माझ्यासोबत दोन दिवस फिरायला चल, मग तुझे मानधन मिळवून देतो; मानधन मिळवून देण्याच्या बहाण्याने संगमनेर पंचायत समितीमध्ये महिला कर्मचाऱ्याचा विनयभंग, संतापजनक प्रकारामुळे खळबळ
गुन्हेगारी

माझ्यासोबत दोन दिवस फिरायला चल, मग तुझे मानधन मिळवून देतो; मानधन मिळवून देण्याच्या बहाण्याने संगमनेर पंचायत समितीमध्ये महिला कर्मचाऱ्याचा विनयभंग, संतापजनक प्रकारामुळे खळबळ

एकीकडे राज्यभरात खळबळ उडवून देणारी घटना भोंदू बाबा अशोक खरातच्या निमित्ताने समोर आले असताना आता दुसरीकडे पंचायत समितीच्या कार्यालयातच अधिकाऱ्याने महिलेकडे केलेल्या या मागणीमुळे खळबळ उडाली आहे
अनंत पांगारकरBy अनंत पांगारकरMarch 24, 2026No Comments2 Mins Read
Facebook Twitter WhatsApp
Share
Facebook Twitter Email Telegram WhatsApp

संगमनेर, प्रतिनिधी- 
संगमनेर पंचायत समितीच्या कार्यालयात एका महिला कर्मचाऱ्याचा विनयभंग झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. मानधन मिळवून देण्याच्या बहाण्याने एका अभियान व्यवस्थापकानेच महिला कर्मचाऱ्याचा गैरफायदा घेऊन तिचा विनयभंग केल्याचा आरोप करण्यात आला आहे. या घटनेमुळे परिसरात तीव्र संताप व्यक्त होत आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, संबंधित महिला कर्मचारी ही एका महिला बचत गटात समुदाय संसाधन व्यक्ती (CRP) म्हणून कार्यरत आहे. गेल्या सहा महिन्यांपासून त्यांचे मानधन रखडलेले होते, त्यासाठी त्या सातत्याने पंचायत समिती कार्यालयात पाठपुरावा करत होत्या. याच संदर्भात २३ मार्च रोजी दुपारी त्या पंचायत समिती कार्यालयात गेल्या होत्या. तिथे भेटल्यावर त्यांनी अभियान व्यवस्थापक नंदलाल पोपटराव कोकाटे यांना आपल्या रखडलेल्या मानधनाबाबत विचारणा केली.
यावेळी, कार्यालयात महिला कर्मचारी एकटी असल्याचे पाहून अभियान व्यवस्थापकाने संधी साधली आणि अश्लील वर्तन केले. त्याने महिलेला अनुचित स्पर्श करत शारीरिक जवळीक साधण्याचा प्रयत्न केला. इतकेच नाही, तर ‘माझ्यासोबत दोन दिवस फिरायला चल, मग तुझे मानधन मिळवून देतो’ असे म्हणत तिला लज्जास्पद मागणी केली. या प्रकारामुळे घाबरलेल्या आणि अपमानित झालेल्या पीडित महिलेने तातडीने कार्यालयातून काढता पाय घेतला.
घटनेनंतर पीडितेने आपल्या पतीला आणि सामाजिक कार्यकर्त्यांना या सर्व प्रकाराची माहिती दिली. त्यांना धीर मिळाल्यानंतर पीडित महिलेने संगमनेर शहर पोलीस ठाण्यात धाव घेऊन तक्रार दाखल केली आहे. पोलिसांनी याप्रकरणी दखल घेतली असून, पुढील कायदेशीर कार्यवाही सुरू आहे. या घटनेमुळे पंचायत समितीसारख्या शासकीय कार्यालयात महिला कर्मचाऱ्यांच्या सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.

anantpangarkar
अनंत पांगारकर

Post Views: 5,194
विनयभंग संगमनेर पंचायत समिती
Share. Facebook Twitter Pinterest WhatsApp
अनंत पांगारकर
  • Website

Related Posts

संगमनेर तालुक्यात लपून-छपून उरकला बालविवाह; ५ जणांवर घारगाव पोलिसांत गुन्हा

July 30, 2026

कचरा वेचण्याच्या बहाण्याने ‘रेकी’; बंद घरे गाठून घरफोडी करणाऱ्या दोन महिला जेरबंद

July 25, 2026

संघटित गुन्हेगारीविरोधात मोठे पाऊल; गोवंश तस्करीप्रकरणी ‘बीएनएस’ कलम १११ अन्वये दोघांवर पहिली मोठी कारवाई संगमनेरात

July 24, 2026
Leave A Reply Cancel Reply

Document
Our Picks
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
Advertisement 1 Advertisement 2 Advertisement 3 Advertisement 4
Don't Miss
सामाजिक

लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांचे संगमनेर शहरात अद्यावत स्मारक उभारणार : माजी आमदार डॉ. सुधीर तांबे

By अनंत पांगारकरAugust 1, 20260

महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन  संगमनेर: दलित, शोषितांचा आपल्या साहित्यातून आवाज बुलंद करणारे आणि हक्कांसाठी लढा…

‘कडलग इन्व्हेस्टमेंट’च्या आर्थिक साक्षरता कार्यशाळेला गुंतवणूकदारांचा प्रतिसाद

August 1, 2026

शनिवार, १ ऑगस्ट २०२६ — आजचा तुमचा दिवस कसा असेल

August 1, 2026

नाशिक-पुणे रेल्वेसाठी ९ ऑगस्टला महामार्गावर चक्काजाम; आमदार सत्यजीत तांबे यांच्याकडून जनआंदोलनाची हाक

July 31, 2026
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow

तुमचे हक्काचे व्यासपीठ

Facebook YouTube
Our Picks
August 2026
M T W T F S S
 12
3456789
10111213141516
17181920212223
24252627282930
31  
« Jul    
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • पत्रकारिता
  • फोटो / गॅलरी
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
  • शेती व सहकार
  • सामाजिक
  • CONTACT US
  • ABOUT US
  • PRIVACY POLICY
© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.