Close Menu
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
What's Hot

माजी मंत्री बाळासाहेब थोरात व आमदार सत्यजित तांबे यांच्या निवासस्थानी गणरायाचे आगमन; पर्यावरणपूरक व त्रासमुक्त गणेशोत्सवाचे आवाहन

14/09/2026

मोठी कारवाई: तीन कुंटणखान्यांवर छापे, ८ महिलांची सुटका; तिघांवर गुन्हे दाखल

14/09/2026

संगमनेरमध्ये १७ ते २० सप्टेंबरदरम्यान अमृत उद्योग समूहातील सहकारी संस्थांच्या वार्षिक सर्वसाधारण सभा; माजी मंत्री बाळासाहेब थोरात, माजी आमदार डॉ. सुधीर तांबे यांची मुख्य उपस्थिती

14/09/2026
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
Home » पोलिसांची मोठी कारवाई: अकोल्यात दरोडा टाकणाऱ्या टोळीचा पर्दाफाश, नाशिकमधील दिंडोरीच्या गुन्ह्याचीही कबुली
गुन्हेगारी

पोलिसांची मोठी कारवाई: अकोल्यात दरोडा टाकणाऱ्या टोळीचा पर्दाफाश, नाशिकमधील दिंडोरीच्या गुन्ह्याचीही कबुली

या टोळीकडून आणखी गुन्हे समोर येण्याची शक्यता श्रीरामपूर विभागाचे अपर पोलीस अधीक्षक सोमनाथ वाघचौरे यांनी वर्तवली आहे.
Annant PpangarkarBy Annant Ppangarkar25/03/2026Updated:25/03/2026No Comments2 Mins Read
Facebook Twitter WhatsApp
Share
Facebook Twitter Email Telegram WhatsApp

श्रीरामपूर, विशेष प्रतिनिधी
श्रीरामपूर आणि अकोले पोलिसांच्या पथकाने संयुक्त कारवाई करत धामणगाव पाट येथील दरोडा प्रकरणातील टोळीला जेरबंद करण्यात मोठे यश मिळवले आहे. पोलिसांनी पकडलेल्या या टोळीने नाशिक मधील दिंडोरी पोलीस ठाण्याच्या हद्दीत ढकांबे येथे केलेल्या गुन्ह्याची कबुली दिली आहे.
सुरेगाव, ता. श्रीगोंदा येथील बाबुशा पिंग्या काळे, शुभम पिंग्या काळे आणि रवि लाला भोसले हे या गुन्ह्यातील आरोपी असल्याचे निष्पन्न झाले असून या टोळीकडून आणखी गुन्हे समोर येण्याची शक्यता श्रीरामपूर विभागाचे अपर पोलीस अधीक्षक सोमनाथ वाघचौरे यांनी वर्तवली आहे.
१९ मार्च २०२६ रोजी रात्रीच्या सुमारास धामणगाव पाट येथील सुरेखा माधव भोर यांच्या घरी अज्ञात पाच इसमांनी प्रवेश करून घरातील सदस्यांना मारहाण केली होती. या वेळी आरोपींनी सुरेखा भोर यांच्या गळ्यातील सोन्याचे मंगळसूत्र, सोन्याचे मणी, दोन सोन्याच्या वाट्या, कानातील सोन्याचे टॉप्स, सासूच्या गळ्यातील सोन्याची पोत आणि सोन्याचे डोरले तसेच एक विवो कंपनीचा मोबाईल असा एकूण १ लाख १० हजार रुपयांचा ऐवज चोरून नेला होता. या प्रकरणी अकोले पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला होता.
अप्पर पोलीस अधीक्षक सोमनाथ वाघचौरे यांनी या प्रकरणाचे गांभीर्य ओळखून आरोपींचा शोध घेण्यासाठी अकोले पोलीस स्टेशन आणि श्रीरामपूर कार्यालयातील विशेष पथकाला आदेश दिले होते. या पथकाने व्यावसायिक कौशल्य आणि तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे गुन्हेगारांचा मागोवा घेतला. या तपासात त्यांना वरील आरोपींनी गुन्हा केल्याचे लक्षात आले. पोलिसांनी तातडीने सापळा रचून या तिन्ही आरोपींना ताब्यात घेतले असता त्यांनी गुन्ह्याची कबुली दिली.
पोलिसांनी या आरोपींची कसून चौकशी केली असता, त्यांनी २३ मार्च २०२६ रोजी पहाटे अडीच वाजण्याच्या सुमारास नाशिक जिल्ह्यातील दिंडोरी पोलीस स्टेशनच्या हद्दीत देखील दरोडा घातल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. या दरोड्यात त्यांनी कुटुंबीयांना मारहाण करून जखमी केले होते. याबाबत दिंडोरी पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल असून पोलीस निरीक्षक भगवान मथुरे या प्रकरणी तपास करत होते. अकोले पोलिसांनी नाशिक पोलिसांशी संपर्क साधून त्या गुन्ह्याची अधिकृत माहिती मिळवली आहे. सध्या हे आरोपी पोलीस कोठडीत असून, त्यांच्याकडून अकोले परिसरातील आणखी काही गुन्हे उघडकीस येतात का, याबाबत पोलीस निरीक्षक मोहन बोरसे अधिक तपास करत आहेत.
ही कामगिरी पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे आणि अप्पर पोलीस अधीक्षक सोमनाथ वाघचौरे यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली. यामध्ये अकोले पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक मोहन बोरसे, श्रीरामपूर कार्यालयातील पोलीस उपनिरीक्षक चारुदत्त खोंडे, पोलीस हेड कॉन्स्टेबल दादासाहेब लोढे, संतोष दरेकर, सचिन धनाद, संदीप दरंदले, पोलीस नाईक रामेश्वर वेताळ, पोलीस कॉन्स्टेबल अशोक गाढे, राजेंद्र बिरदवडे, सहदेव चव्हाण तसेच अकोले पोलीस स्टेशनचे पोलीस उपनिरीक्षक विनोद खांडबहाले, पोलीस हेड कॉन्स्टेबल रविंद्र वाघचौरे, पोलीस कॉन्स्टेबल अविनाश गोडगे, सुहास गोरे आणि मनोहर मोरे यांच्या पथकाचा समावेश होता.

दिंडोरी येथील जखमींचे छायाचित्रे…

anantpangarkar
Annant Ppangarkar

Post Views: 992
अकोले पोलीस दरोडा उकल सोमनाथ वाघचौरे
Share. Facebook Twitter Pinterest WhatsApp
Annant Ppangarkar
  • Website

Related Posts

मोठी कारवाई: तीन कुंटणखान्यांवर छापे, ८ महिलांची सुटका; तिघांवर गुन्हे दाखल

14/09/2026

समृद्धी महामार्गावर चाकूचा धाक दाखवून दरोडा टाकणाऱ्या सराईत टोळीचा पर्दाफाश; स्थानिक गुन्हे शाखेकडून चार आरोपींना अटक, एक लाख दोन हजारांचा मुद्देमाल जप्त

12/09/2026

चार अवैध कत्तलखान्यांवर एलसीबीचे छापे, १०५० किलो गोमांसासह ९ जनावरांची सुटका

12/09/2026
Leave A Reply Cancel Reply

Document
Our Picks
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
Advertisement 1 Advertisement 2 Advertisement 3 Advertisement 4
Don't Miss
धार्मिक

माजी मंत्री बाळासाहेब थोरात व आमदार सत्यजित तांबे यांच्या निवासस्थानी गणरायाचे आगमन; पर्यावरणपूरक व त्रासमुक्त गणेशोत्सवाचे आवाहन

By Annant Ppangarkar14/09/20260

Annant Ppangarkar महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन – राज्याचे माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांच्या ‘सुदर्शन’ निवासस्थानी…

मोठी कारवाई: तीन कुंटणखान्यांवर छापे, ८ महिलांची सुटका; तिघांवर गुन्हे दाखल

14/09/2026

संगमनेरमध्ये १७ ते २० सप्टेंबरदरम्यान अमृत उद्योग समूहातील सहकारी संस्थांच्या वार्षिक सर्वसाधारण सभा; माजी मंत्री बाळासाहेब थोरात, माजी आमदार डॉ. सुधीर तांबे यांची मुख्य उपस्थिती

14/09/2026

सोमवार १४ सप्टेंबर; जाणून घ्या आजचे राशिभविष्य

14/09/2026
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow

तुमचे हक्काचे व्यासपीठ

Facebook YouTube
Our Picks
September 2026
M T W T F S S
 123456
78910111213
14151617181920
21222324252627
282930  
« Aug    
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • पत्रकारिता
  • फोटो / गॅलरी
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
  • शेती व सहकार
  • सामाजिक
  • CONTACT US
  • ABOUT US
  • PRIVACY POLICY
© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.