Close Menu
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
What's Hot

संगमनेरमध्ये बुधवारी रंगणार ७५० कलावंतांचे भव्य महावादन; ‘आय लव्ह संगमनेर’ चळवळीचा उपक्रम

15/09/2026

पोलीस प्रशासनाचा मोठा निर्णय, गणेशोत्सवादरम्यान ‘यांना’ संगमनेर व अकोले तालुक्यात प्रवेश बंदीचे आदेश जारी___वाचा यादी

15/09/2026

सण-उत्सवांच्या पार्श्वभूमीवर संगमनेर उपविभागात पोलीस प्रशासनाची मोठी कारवाई; गुन्हेगारी पार्श्वभूमीचे सात जण जिल्ह्यातून हद्दपार

15/09/2026
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
Home » भोंदू बाबा अशोक खरात प्रकरण: ‘SIT’ची धडक कारवाई; कोपरगावमधून दोघांना अटक
गुन्हेगारी

भोंदू बाबा अशोक खरात प्रकरण: ‘SIT’ची धडक कारवाई; कोपरगावमधून दोघांना अटक

अश्लील व्हिडिओ किंवा पीडितेची ओळख पटेल असे साहित्य कोणाकडे असल्यास ते तात्काळ डिलीट करावे.
Annant PpangarkarBy Annant Ppangarkar27/03/2026No Comments2 Mins Read
Facebook Twitter WhatsApp
Share
Facebook Twitter Email Telegram WhatsApp

नाशिक/कोपरगाव:

नाशिक येथील स्वयंघोषित भोंदू बाबा अशोक खरात याच्याविरुद्ध सरकारवाडा पोलीस ठाण्यात दाखल असलेल्या गंभीर गुन्ह्यांचा तपास सध्या ‘विशेष तपास पथक’ (SIT) करत आहे. या तपासादरम्यान एक अत्यंत गंभीर बाब समोर आली आहे. या प्रकरणातील पीडित महिलांचे अश्लील व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणावर प्रसारित केले जात असून, यामुळे पीडितांच्या गोपनीयतेचा भंग होत असल्याचे पोलिसांच्या निदर्शनास आले. महिलांच्या सन्मानाला ठेच पोहचवणारी ही विकृती रोखण्यासाठी पोलिसांनी तातडीने तांत्रिक शोधमोहीम हाती घेतली आणि गुन्हेगारांच्या मुसक्या आवळण्यास सुरुवात केली आहे.

या तपासाचे धागेदोरे अहिल्यानगर जिल्ह्यातील कोपरगावपर्यंत पोहोचले आहेत. कोपरगाव येथील ‘BMW’ नावाच्या व्हॉट्सॲप ग्रुपवर राहुल गंगाधर शिंदे याने पीडित महिलांचे अश्लील व्हिडिओ प्रसारित केल्याचे तांत्रिक तपासात स्पष्ट झाले. पोलिसांनी या प्रकरणाचा अधिक सखोल तपास केला असता, हे व्हिडिओ त्याला योगेश पंढरीनाथ आढाव याने पाठवल्याचे समोर आले. तसेच, योगेशला हे व्हिडिओ माजलगाव (जि. बीड) येथील संदिप गर्जे याने पुरवल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे. या तिघांविरुद्ध कोपरगाव शहर पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहिता (BNS) आणि माहिती तंत्रज्ञान कायद्याच्या विविध कलमान्वये गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

पोलिसांनी या कारवाईत राहुल शिंदे आणि योगेश आढाव या दोघांना अटक केली असून, फरार असलेल्या संदिप गर्जे याचा शोध युद्धपातळीवर सुरू आहे. या घटनेचे गांभीर्य ओळखून विशेष तपास पथकाने जाहीर आवाहन केले आहे की, अशा प्रकारचे अश्लील व्हिडिओ किंवा पीडितेची ओळख पटेल असे कोणतेही साहित्य कोणाकडे असल्यास ते तात्काळ डिलीट करावे. जर सोशल मीडिया, व्हॉट्सॲप ग्रुप किंवा विविध प्रकारच्या माध्यमातून हे साहित्य प्रसारित केल्यास, संबंधित व्यक्तीसह ग्रुप ॲडमिनवरही कठोर कायदेशीर कारवाई करून त्यांना अटक करण्यात येईल, असा इशारा पोलिसांनी दिला आहे.

anantpangarkar
Annant Ppangarkar

Post Views: 804
गुन्हेगारी भोंदू बाबा अशोक खरात
Share. Facebook Twitter Pinterest WhatsApp
Annant Ppangarkar
  • Website

Related Posts

पोलीस प्रशासनाचा मोठा निर्णय, गणेशोत्सवादरम्यान ‘यांना’ संगमनेर व अकोले तालुक्यात प्रवेश बंदीचे आदेश जारी___वाचा यादी

15/09/2026

सण-उत्सवांच्या पार्श्वभूमीवर संगमनेर उपविभागात पोलीस प्रशासनाची मोठी कारवाई; गुन्हेगारी पार्श्वभूमीचे सात जण जिल्ह्यातून हद्दपार

15/09/2026

मोठी कारवाई: तीन कुंटणखान्यांवर छापे, ८ महिलांची सुटका; तिघांवर गुन्हे दाखल

14/09/2026
Leave A Reply Cancel Reply

Document
Our Picks
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
Advertisement 1 Advertisement 2 Advertisement 3 Advertisement 4
Don't Miss
महाराष्ट्र संवाद विशेष

संगमनेरमध्ये बुधवारी रंगणार ७५० कलावंतांचे भव्य महावादन; ‘आय लव्ह संगमनेर’ चळवळीचा उपक्रम

By Annant Ppangarkar15/09/20260

Annant Ppangarkar महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन – महाराष्ट्र राज्य हे सांस्कृतिकदृष्ट्या अत्यंत वैभवशाली असून पारंपारिक…

पोलीस प्रशासनाचा मोठा निर्णय, गणेशोत्सवादरम्यान ‘यांना’ संगमनेर व अकोले तालुक्यात प्रवेश बंदीचे आदेश जारी___वाचा यादी

15/09/2026

सण-उत्सवांच्या पार्श्वभूमीवर संगमनेर उपविभागात पोलीस प्रशासनाची मोठी कारवाई; गुन्हेगारी पार्श्वभूमीचे सात जण जिल्ह्यातून हद्दपार

15/09/2026

दिल्ली नाक्यावर कंटेनरखाली चिरडून महिलेचा मृत्यू, संगमनेर शहरातील जड वाहतुकीचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर; नागरिकांचा संताप

15/09/2026
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow

तुमचे हक्काचे व्यासपीठ

Facebook YouTube
Our Picks
September 2026
M T W T F S S
 123456
78910111213
14151617181920
21222324252627
282930  
« Aug    
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • पत्रकारिता
  • फोटो / गॅलरी
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
  • शेती व सहकार
  • सामाजिक
  • CONTACT US
  • ABOUT US
  • PRIVACY POLICY
© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.