Close Menu
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
What's Hot

पंचनाम्यात वेळ घालवू नका, सरसकट मदत करा! दिल्लीवरून थेट शेतकऱ्यांच्या बांधावर पोहोचून बाळासाहेब थोरात आक्रमक!

13/10/2026

डीजेचा आवाज आणि लेझर लाईट्स खरोखरच जीवघेणे ठरू शकतात? तज्ज्ञ डॉक्टर काय म्हणतात, पाहा… शिंदेवाडीतील विद्यार्थ्यांच्या शिबिरात नेमकं काय घडलं…

13/10/2026

शिक्षण क्षेत्राची मान उंचावणारी बातमी! संगमनेरच्या या लेखकाच्या चार पुस्तकांचा शासनमान्य ग्रंथ निवडसुचित समावेश; वाचा सविस्तर

13/10/2026
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
Home » संगमनेर नगरपालिकेची अतिक्रमण मोहीम ‘एकतर्फी’; शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचा आंदोलनाचा इशारा
सामाजिक

संगमनेर नगरपालिकेची अतिक्रमण मोहीम ‘एकतर्फी’; शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचा आंदोलनाचा इशारा

मागण्यांकडे दुर्लक्ष केल्यास, येणाऱ्या काळात स्थानिक नागरिक आणि अन्यायग्रस्त दुकानदारांच्या कुटुंबीयांसह शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या वतीने नगरपालिकेच्या प्रांगणात तीव्र आंदोलन छेडले जाईल
Annant PpangarkarBy Annant Ppangarkar27/03/2026No Comments2 Mins Read
Facebook Twitter WhatsApp
Share
Facebook Twitter Email Telegram WhatsApp

संगमनेर, प्रतिनिधी-
संगमनेर नगरपालिकेच्या वतीने शहरात विशेषतः नवीन नगर रोड परिसरात राबविण्यात आलेली अतिक्रमण हटाव मोहीम अत्यंत अन्यायकारक, एकतर्फी आणि भेदभाव करणारी असल्याचा गंभीर आरोप शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे उपजिल्हाप्रमुख अमर कतारी (राजपूत) यांनी केला आहे.
या संदर्भात त्यांनी नगराध्यक्ष मैथिलीताई तांबे आणि मुख्याधिकारी दयानंद गोरे यांना लेखी निवेदन देऊन स्थानिक कष्टकरी आणि छोट्या व्यावसायिकांवर होणाऱ्या अन्यायाचा पाढा वाचला आहे.
अमर कतारी यांनी निवेदनात नमूद केले आहे की, नगरपालिकेने केवळ नवीन नगर रोड परिसरातील अतिक्रमणे हटवून गरिबांच्या पोटावर पाय दिला आहे, मात्र शहरातील इतर भागांतील अतिक्रमणे अद्यापही ‘जैसे थे’ आहेत. ज्या मोठ्या इमारतींकडे पार्किंगची सुविधा नाही, अशा ठिकाणी धनदांडगे ग्राहक भर रस्त्यात गाड्या लावतात, मात्र केवळ ते गर्भश्रीमंत असल्याने नगरपालिका प्रशासन त्यांच्यावर कोणतीही कारवाई न करता मेहेरबान असल्याचे दिसून येते. याउलट नगर रोड परिसरातील स्थानिक दुकानदार, शेतकरी, भाजीपाला विक्रेते आणि चहा टपरीधारक अशा सामान्य नागरिकांवर कारवाई केल्याने त्यांच्यावर उपासमारीची वेळ आली असून अनेकांचे संसार उघड्यावर पडले आहेत.
प्रशासनाच्या दुटप्पी भूमिकेवर टीका करताना कतारी म्हणाले की, एकीकडे स्थानिक मराठी माणसाचा धंदा बंद केला जात असताना, दुसरीकडे बाहेरील राज्यांतून आलेल्या पाणीपुरी, आईस्क्रीम, मोमोज आणि चायनीज विक्रेत्यांवर कोणतीही ठोस कारवाई होताना दिसत नाही. दुपारी ४ नंतर हे परप्रांतीय विक्रेते रस्त्यांवर उघडपणे व्यवसाय करतात, ज्यामुळे वाहतुकीची कोंडी व शिस्तीचा गंभीर प्रश्न निर्माण होतो. काही ठिकाणी तर चायनीज व ऑम्लेट-पावच्या गाड्यांवर मद्यपान करण्यासाठी प्रशासनाने जणू मुकसंमतीच दिली आहे की काय, असा संतप्त सवाल नागरिक उपस्थित करत आहेत.
या पार्श्वभूमीवर, नगरपालिकेने या अन्यायकारक कारवाईला तात्काळ स्थगिती देऊन ज्यांचे नुकसान झाले आहे त्यांना पर्यायी जागा उपलब्ध करून द्यावी, अशी मागणी शिवसेनेने केली आहे. तसेच संपूर्ण संगमनेर शहरात कोणतीही पक्षपाती भूमिका न घेता समान व न्याय्य पद्धतीने कारवाई करण्यात यावी आणि सर्व अतिक्रमणधारक व लघु व्यावसायिकांना नियोजित व कायमस्वरूपी व्यवसायासाठी हक्काची जागा उपलब्ध करून देऊन त्यांचे पुनर्वसन करावे, असेही निवेदनात स्पष्ट करण्यात आले आहे.
प्रशासनाने या मागण्यांकडे दुर्लक्ष केल्यास, येणाऱ्या काळात स्थानिक नागरिक आणि अन्यायग्रस्त दुकानदारांच्या कुटुंबीयांसह शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या वतीने नगरपालिकेच्या प्रांगणात तीव्र आंदोलन छेडले जाईल, असा गर्भित इशारा अमर कतारी यांनी दिला आहे.

anantpangarkar
Annant Ppangarkar

Post Views: 1,022
अमर कतारी नवीन नगर रोड अतिक्रमण शिवसेना उद्धव ठाकरे गट संगमनेर नगर परिषद
Share. Facebook Twitter Pinterest WhatsApp
Annant Ppangarkar
  • Website

Related Posts

संगमनेरकरांची सुरक्षा होणार अधिक भक्कम; नगरपरिषदेसाठी २ नवीन अग्निशामक वाहनांना प्रशासकीय मान्यता, आमदार अमोल खताळ यांच्या प्रयत्नांना यश! साक्षी सूर्यवंशी यांची माहिती

30/09/2026

संगमनेर ड्रग्ज प्रकरणातील सत्य जनतेसमोर आणा; सोशल मीडियावरील ‘मीडिया ट्रायल’ त्वरित थांबवा! — काँग्रेस कार्याध्यक्ष अमोल शेलकर यांचे पोलीस प्रशासनाला आवाहन; वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी संयुक्त पत्रकार परिषद घेऊन पारदर्शक चौकशीचे पुरावे मांडण्याची मागणी

24/09/2026

संगमनेर शहरात वाहतूक कोंडीचा बोजवारा: बेशिस्त रिक्षाचालक, फुटपाथवरील अतिक्रमणे अन् अवैध पार्किंगमुळे नागरिक त्रस्त; पोलीस प्रशासन ढिम्म

24/09/2026
Leave A Reply Cancel Reply

Document
Our Picks
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
Advertisement 1 Advertisement 2 Advertisement 3 Advertisement 4
Don't Miss
नैसर्गिक आपत्ती

पंचनाम्यात वेळ घालवू नका, सरसकट मदत करा! दिल्लीवरून थेट शेतकऱ्यांच्या बांधावर पोहोचून बाळासाहेब थोरात आक्रमक!

By Annant Ppangarkar13/10/20260

महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन- महाराष्ट्राच्या ग्रामीण भागात सध्या दुष्काळाची अत्यंत भयानक परिस्थिती निर्माण झाली असून…

डीजेचा आवाज आणि लेझर लाईट्स खरोखरच जीवघेणे ठरू शकतात? तज्ज्ञ डॉक्टर काय म्हणतात, पाहा… शिंदेवाडीतील विद्यार्थ्यांच्या शिबिरात नेमकं काय घडलं…

13/10/2026

शिक्षण क्षेत्राची मान उंचावणारी बातमी! संगमनेरच्या या लेखकाच्या चार पुस्तकांचा शासनमान्य ग्रंथ निवडसुचित समावेश; वाचा सविस्तर

13/10/2026

नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना आर्थिक मदत कधी मिळणार? आमदार अमोल खताळांनी दिली ही माहिती

13/10/2026
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow

तुमचे हक्काचे व्यासपीठ

Facebook YouTube
Our Picks
October 2026
M T W T F S S
 1234
567891011
12131415161718
19202122232425
262728293031  
« Sep    
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • पत्रकारिता
  • फोटो / गॅलरी
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
  • शेती व सहकार
  • सामाजिक
  • CONTACT US
  • ABOUT US
  • PRIVACY POLICY
© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.