Close Menu
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
What's Hot

बेकायदेशीर भंगार दुकानांवर पोलिसांचा छापा; विनापरवाना वाहने तोडणाऱ्या दोघांना अटक, लाखो रुपयांचा मुद्देमाल जप्त

12/09/2026

आज शनिवार १२ सप्टेंबर रोजीचे राशी भविष्य

12/09/2026

अन्न व औषध प्रशासनाची मोठी कारवाई; सुमारे चार कोटी रुपयांचे संशयास्पद बटर जप्त

11/09/2026
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
Home » खळबळ: अज्ञात महिलेची हत्या करून मृतदेह गोणीत बांधून कॅनॉलमध्ये फेकला
गुन्हेगारी

खळबळ: अज्ञात महिलेची हत्या करून मृतदेह गोणीत बांधून कॅनॉलमध्ये फेकला

या प्रकरणी पाथर्डी पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहिता २०२३ च्या कलम १०३(१) आणि २३८ अन्वये अज्ञात आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
Annant PpangarkarBy Annant Ppangarkar27/03/2026No Comments2 Mins Read
Facebook Twitter WhatsApp
Share
Facebook Twitter Email Telegram WhatsApp

पाथर्डी:

अहिल्यानगर जिल्ह्यातील पाथर्डी तालुक्यात एका अज्ञात महिलेची निर्घृण हत्या झाल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. मौजे कासार पिंपळगाव येथील मुळा पाटबंधारे विभागाच्या कॅनॉलमध्ये एका पांढऱ्या रंगाच्या गोणीत दोरीने बांधलेल्या अवस्थेत या महिलेचा मृतदेह शुक्रवारी सकाळी आढळून आला. या घटनेमुळे परिसरात मोठी खळबळ उडाली असून पोलीस सध्या आरोपीचा शोध घेत आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार, २७ मार्च २०२६ रोजी सकाळी १० वाजेच्या सुमारास कासार पिंपळगाव येथील ग्रामपंचायत सार्वजनिक विहिरीजवळील कॅनॉलमध्ये एक संशयास्पद गोणी तरंगताना नागरिकांना दिसली. याबाबतची माहिती मिळताच पाथर्डी पोलीस ठाण्याचे पोलीस कर्मचारी अमोल बंकट जवरे यांनी घटनास्थळी धाव घेतली.

गोणी उघडली असता त्यात एका अनोळखी महिलेचा मृतदेह आढळून आला. प्राथमिक अंदाजानुसार, अज्ञात आरोपीने या महिलेचा खून करून पुरावा नष्ट करण्याच्या उद्देशाने मृतदेह गोणीत भरून कॅनॉलच्या पाण्यात फेकून दिला आहे. मृतदेह काही प्रमाणात कुजलेल्या अवस्थेत असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.

मृत महिलेचे वर्णन पोलिसांनी जाहीर केले असून, तिचे वय अंदाजे ५५ ते ६० वर्षे, उंची १६० सेंटीमीटर आणि रंग गोरा आहे. तिचे केस काळे-पांढरे असून अंगात काळ्या रंगाचा ब्लाउज आणि जांभळ्या रंगाची नऊवारी साडी आहे. महिलेच्या हातात चॉकलेटी सोनेरी रंगाच्या काचेच्या बांगड्या आणि गळ्यात काळ्या व पिवळ्या धातूच्या मण्यांचे मंगळसूत्र आहे. विशेष म्हणजे, तिच्या उजव्या हातावर ‘पाच आसरा’ गोंदलेले आहे.

या प्रकरणी पाथर्डी पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहिता २०२३ च्या कलम १०३(१) आणि २३८ अन्वये अज्ञात आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. जिल्हा पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे, अपर पोलीस अधीक्षक वैभव कलुबर्मे आणि उपविभागीय पोलीस अधिकारी नीरज राजगुरू यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक विलास पुजारी या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत.

anantpangarkar
Annant Ppangarkar

Post Views: 609
गुन्हेगारी पाथर्डी महिलेचा मृतदेह
Share. Facebook Twitter Pinterest WhatsApp
Annant Ppangarkar
  • Website

Related Posts

बेकायदेशीर भंगार दुकानांवर पोलिसांचा छापा; विनापरवाना वाहने तोडणाऱ्या दोघांना अटक, लाखो रुपयांचा मुद्देमाल जप्त

12/09/2026

स्थानिक पोलिसांच्या कारभारावर प्रश्नचिन्ह!, संगमनेरमध्ये स्थानिक गुन्हे शाखेचा छापा; कत्तलीसाठी डांबलेली १४ गोवंशीय जनावरे मुक्त, १ लाखांचा मुद्देमाल जप्त

11/09/2026

अवैध मावा तयार करणाऱ्या कारखान्यावर एलसीबीचा छापा; १९ वर्षांच्या तरुणासह १ लाख ५ हजारांचा मुद्देमाल जप्त

10/09/2026
Leave A Reply Cancel Reply

Document
Our Picks
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
Advertisement 1 Advertisement 2 Advertisement 3 Advertisement 4
Don't Miss
गुन्हेगारी

बेकायदेशीर भंगार दुकानांवर पोलिसांचा छापा; विनापरवाना वाहने तोडणाऱ्या दोघांना अटक, लाखो रुपयांचा मुद्देमाल जप्त

By Annant Ppangarkar12/09/20260

Annant Ppangarkar महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन – श्रीरामपूर शहरातील संशयास्पद आणि बेकायदेशीर भंगार दुकानांवर पोलिसांनी…

आज शनिवार १२ सप्टेंबर रोजीचे राशी भविष्य

12/09/2026

अन्न व औषध प्रशासनाची मोठी कारवाई; सुमारे चार कोटी रुपयांचे संशयास्पद बटर जप्त

11/09/2026

गणेशोत्सवानिमित्त थोरात कारखान्यावर १४ ते २५ सप्टेंबर दरम्यान विविध सांस्कृतिक कार्यक्रमांची मेजवानी

11/09/2026
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow

तुमचे हक्काचे व्यासपीठ

Facebook YouTube
Our Picks
September 2026
M T W T F S S
 123456
78910111213
14151617181920
21222324252627
282930  
« Aug    
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • पत्रकारिता
  • फोटो / गॅलरी
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
  • शेती व सहकार
  • सामाजिक
  • CONTACT US
  • ABOUT US
  • PRIVACY POLICY
© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.