संगमनेर, प्रतिनिधी-
घारगाव पोलीस ठाण्याच्या हद्दीत गुन्ह्यांसाठी वापरलेली आणि चोरीच्या तपासात जप्त केलेली अनेक वाहने सध्या पोलीस ठाण्याच्या ताब्यात आहेत. सन २०१० मध्ये पोलीस ठाण्याची निर्मिती झाल्यापासून ही वाहने जप्त करण्यात आली आहेत. या वाहनांच्या मूळ मालकांनी तातडीने संपर्क साधण्याचे आवाहन सहायक पोलीस निरीक्षक हेमंत थोरात यांनी केले आहे.
या संदर्भात प्रसिद्धीला दिलेल्या पत्रकानुसार, जप्त करण्यात आलेल्या वाहनांमध्ये विविध कंपन्यांच्या दुचाकी आणि ट्रॅक्टरचा समावेश आहे. यामध्ये प्रामुख्याने खालील वाहने आहेत:
दुचाकी वाहने: MH 17 Q 8396, MH 17 AH 8488, MH 17 N 4920, MH 19 AF 2025, MH 17 DX 7285, MH 17 X 2175, MH 12 WY 0164, MH 16 DR 3607, MH 12 RD 3773, MH 17 CW 0183, MH 14 CV 8923, MH 12 EE 8555 आणि काही विना क्रमांकाच्या हिरो व होंडा गाड्यांचा समावेश आहे.
ट्रॅक्टर: इंजिन नंबर ZKLB00476 असलेला महिंद्रा ट्रॅक्टर आणि एक विना क्रमांकाचा हॉलंड ट्रॅक्टर देखील पोलिसांच्या ताब्यात आहे.
ज्या नागरिकांची ही वाहने आहेत, त्यांनी घारगाव पोलीस स्टेशनला भेट देऊन आपल्या मालकी हक्काचे मूळ कागदपत्रे सादर करावीत. कागदपत्रांची पूर्तता केल्यानंतर ही वाहने योग्य त्या अटी व शर्तींवर मूळ मालकांच्या ताब्यात दिली जातील.
संबंधित वाहन मालकांनी ही बातमी प्रसिद्ध झाल्यापासून पुढील ०५ दिवसांच्या आत आपली वाहने घेऊन जाणे आवश्यक आहे. जर दिलेल्या मुदतीत कोणीही मालक हजर झाला नाही, तर ही सर्व वाहने सरकारी नियमानुसार लिलावात काढली जाणार असल्याचे सांगण्यात आले आहे.





