Close Menu
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
What's Hot

माजी मंत्री बाळासाहेब थोरात व आमदार सत्यजित तांबे यांच्या निवासस्थानी गणरायाचे आगमन; पर्यावरणपूरक व त्रासमुक्त गणेशोत्सवाचे आवाहन

14/09/2026

मोठी कारवाई: तीन कुंटणखान्यांवर छापे, ८ महिलांची सुटका; तिघांवर गुन्हे दाखल

14/09/2026

संगमनेरमध्ये १७ ते २० सप्टेंबरदरम्यान अमृत उद्योग समूहातील सहकारी संस्थांच्या वार्षिक सर्वसाधारण सभा; माजी मंत्री बाळासाहेब थोरात, माजी आमदार डॉ. सुधीर तांबे यांची मुख्य उपस्थिती

14/09/2026
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
Home » एटीएम फोडणाऱ्या परराज्यातील आरोपीला अटक; पोलिसांनी आवळल्या मुसक्या
गुन्हेगारी

एटीएम फोडणाऱ्या परराज्यातील आरोपीला अटक; पोलिसांनी आवळल्या मुसक्या

मिळालेल्या माहितीच्या आधारे पोलिसांनी आरोपी संदीप भजन सिंग वय-२२, मूळ रा. महालेवाला, पोस्ट-फतेगड पंजतूर, जि. फिरोजपूर (पंजाब) याला शिरूर येथून ताब्यात घेतले.
Annant PpangarkarBy Annant Ppangarkar28/03/2026No Comments2 Mins Read
Facebook Twitter WhatsApp
Share
Facebook Twitter Email Telegram WhatsApp

अहिल्यानगर –
पारनेर तालुक्यातील निघोज येथील एसबीआय बँकेचे एटीएम मशीन लोखंडी हत्याराच्या सहाय्याने फोडून चोरी करण्याचा प्रयत्न करणाऱ्या पंजाबमधील एका सराईत आरोपीला जेरबंद करण्यात पारनेर पोलिसांना यश आले आहे.
या प्रकरणी संकेत चंद्रशेखर वैद्य (वय ४०, रा. नाशिक) यांनी पारनेर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली होती. २२ मार्च २०२६ रोजी पहाटेच्या सुमारास एका अज्ञात इसमाने चेहऱ्यावर रुमाल बांधून ओळख लपवत आत प्रवेश करून लोखंडी हत्याराचे सहाय्याने एटीएम मशीन फोडून एटीएम मधील पैसे चोरी करण्याचा प्रयत्न केला होता.
या घटनेची माहिती मिळताच उपविभागीय पोलीस अधिकारी शिरीष वमने यांनी तातडीने घटनास्थळी भेट देऊन तपासाच्या सूचना दिल्या होत्या. पोलीस निरीक्षक संतोष खेडकर यांच्या मार्गदर्शनाखाली विशेष तपास पथक तयार करून गुन्ह्याचा उलगडा करण्यास सुरुवात करण्यात आली.
तांत्रिक तपास आणि गोपनीय बातमीदारांकडून मिळालेल्या माहितीच्या आधारे पोलिसांनी आरोपी संदीप भजन सिंग वय-२२, मूळ रा. महालेवाला, पोस्ट-फतेगड पंजतूर, जि. फिरोजपूर (पंजाब) याला शिरूर येथून ताब्यात घेतले. आरोपी सध्या निघोज येथे वास्तव्यास होता. या अटकेमुळे जिल्ह्यातील व राज्यातील एटीएम चोरीचे मोठे गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता पोलिसांनी वर्तवली आहे. आरोपीला न्यायालयात हजर केले असता त्याला दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.
ही यशस्वी कारवाई पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे, अपर पोलीस अधीक्षक वैभव कलुबर्मे आणि उपविभागीय पोलीस अधिकारी शिरीष वमने यांच्या मार्गदर्शनाखाली पारनेर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक संतोष खेडकर, सहाय्यक पोलीस निरीक्षक नितीन खंडागळे, पोलीस उपनिरीक्षक शिवाजी कडुस, पोलीस हेड कॉन्स्टेबल अमोल धामणे, कल्याण लगड, पोलीस कॉन्स्टेबल गणेश डोंगरे, सारंग वाघ, विजय जाधव, सागर साबळे आणि प्रकाश बोबडे यांच्या पथकाने केली आहे. या गुन्ह्याचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक शिवाजी कडुस हे करत आहेत.

anantpangarkar
Annant Ppangarkar

Post Views: 576
ATM एटीएम
Share. Facebook Twitter Pinterest WhatsApp
Annant Ppangarkar
  • Website

Related Posts

मोठी कारवाई: तीन कुंटणखान्यांवर छापे, ८ महिलांची सुटका; तिघांवर गुन्हे दाखल

14/09/2026

समृद्धी महामार्गावर चाकूचा धाक दाखवून दरोडा टाकणाऱ्या सराईत टोळीचा पर्दाफाश; स्थानिक गुन्हे शाखेकडून चार आरोपींना अटक, एक लाख दोन हजारांचा मुद्देमाल जप्त

12/09/2026

चार अवैध कत्तलखान्यांवर एलसीबीचे छापे, १०५० किलो गोमांसासह ९ जनावरांची सुटका

12/09/2026
Leave A Reply Cancel Reply

Document
Our Picks
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
Advertisement 1 Advertisement 2 Advertisement 3 Advertisement 4
Don't Miss
धार्मिक

माजी मंत्री बाळासाहेब थोरात व आमदार सत्यजित तांबे यांच्या निवासस्थानी गणरायाचे आगमन; पर्यावरणपूरक व त्रासमुक्त गणेशोत्सवाचे आवाहन

By Annant Ppangarkar14/09/20260

Annant Ppangarkar महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन – राज्याचे माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांच्या ‘सुदर्शन’ निवासस्थानी…

मोठी कारवाई: तीन कुंटणखान्यांवर छापे, ८ महिलांची सुटका; तिघांवर गुन्हे दाखल

14/09/2026

संगमनेरमध्ये १७ ते २० सप्टेंबरदरम्यान अमृत उद्योग समूहातील सहकारी संस्थांच्या वार्षिक सर्वसाधारण सभा; माजी मंत्री बाळासाहेब थोरात, माजी आमदार डॉ. सुधीर तांबे यांची मुख्य उपस्थिती

14/09/2026

सोमवार १४ सप्टेंबर; जाणून घ्या आजचे राशिभविष्य

14/09/2026
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow

तुमचे हक्काचे व्यासपीठ

Facebook YouTube
Our Picks
September 2026
M T W T F S S
 123456
78910111213
14151617181920
21222324252627
282930  
« Aug    
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • पत्रकारिता
  • फोटो / गॅलरी
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
  • शेती व सहकार
  • सामाजिक
  • CONTACT US
  • ABOUT US
  • PRIVACY POLICY
© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.