Close Menu
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
What's Hot

संगमनेरमधील वादग्रस्त ड्रग प्रकरण अखेर स्थानिक गुन्हे शाखेकडे; मात्र निर्दोषाला गोवणाऱ्या खाकी वर्दीतील ‘त्या’ अधिकाऱ्यावर कारवाई कधी?

18/09/2026

निष्क्रिय लोकांनी विकासावर बोलू नये; मुरूम-वाळूच्या पुढे न जाणाऱ्या लोकप्रतिनिधींवर बाळासाहेब थोरातांचा घणाघात

18/09/2026

गाजलेल्या गीतांचा नजराणा संगमनेरकरांना ‘दिल से’ आवडला! ‘संगमनेर फेस्टिव्हल’चा दुसरा दिवस; रहेमान म्युझिकने गाजवला

18/09/2026
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
Home » अखेर ‘त्या’ पतसंस्थेचे संस्थापक अध्यक्ष, संचालक पत्नी आणि व्यवस्थापक अटकेत; न्यायालयाने फेटाळला होता अटकपूर्व जामीन
गुन्हेगारी

अखेर ‘त्या’ पतसंस्थेचे संस्थापक अध्यक्ष, संचालक पत्नी आणि व्यवस्थापक अटकेत; न्यायालयाने फेटाळला होता अटकपूर्व जामीन

आरोपींना अटक करण्यात आल्याने आता या प्रकरणातील पोलीस तपासाला वेग येण्याची चिन्हे आहेत.
Annant PpangarkarBy Annant Ppangarkar29/03/2026Updated:29/03/2026No Comments2 Mins Read
Facebook Twitter WhatsApp
Share
Facebook Twitter Email Telegram WhatsApp

संगमनेर, प्रतिनिधी-
संगमनेरच्या अतिरिक्त सत्र न्यायालयाने अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळल्यानंतर पोलिसांनी अखेर पतसंस्थेच्या संस्थापक अध्यक्षसह यांची पत्नी आणि व्यवस्थापक महिलेला अटक केली आहे. पोलीस चौकशीमध्ये याप्रकरणी काय माहिती समोर येते याकडे लक्ष लागले आहे.
अटक करण्यात आलेल्यामध्ये संगमनेर तालुक्यातील झोळे येथील कै. विमल गुंजाळ ग्रामीण बिगरशेती सहकारी पतसंस्थेचे संस्थापक मधुकर वाळे, संचालक असलेल्या त्यांच्या पत्नी कुसुम वाळे आणि व्यवस्थापक सविता हासे यांचा समावेश आहे.
कर्ज मंजूर करण्याच्या बहाण्याने एका अनुसूचित जातीच्या व्यक्तीची फसवणूक करून, तारण खताऐवजी परस्पर खरेदीखत लिहून घेतल्याच्या गंभीर आरोपाखाली पतसंस्थेच्या संचालक आणि कर्मचाऱ्यांविरुद्ध संगमनेर तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस उपाधीक्षक डॉ. कुणाल सोनवणे या प्रकरणी पुढील तपास करत असून आरोपींनी अटकपूर्व जामीनासाठी संगमनेरच्या सत्र न्यायालयात अर्ज दाखल केला होता. अतिरिक्त सत्र न्यायाधीश विवेक बी. गव्हाणे यांनी पतसंस्थेच्या प्रकरणी अकरा संचालकांचा अटकपूर्व जामीन अर्ज मंजूर करत संस्थापक आणि त्यांच्या संचालक असलेल्या पत्नी व व्यवस्थापकाचा जामीन अर्ज फेटाळून लावल्यानंतर शनिवारी या तिघांना पोलिसांनी अटक केली असल्याची माहिती मिळते.
न्यायालयाने अटकपूर्व जामीन अर्ज नामंजूर केल्याने या आरोपींना कोणत्याही क्षणी अटक होण्याची शक्यता निर्माण झाली होती. अटक करण्यात आलेल्या आरोपींना सोमवारपर्यंत न्यायालयाने पोलीस कोठडी सुनावली.
या प्रकरणाची सविस्तर पार्श्वभूमी अशी की, तक्रारदार व्यक्तीने या पतसंस्थेकडे कर्जासाठी मागणी केली असता, त्यांना कर्ज मंजूर करण्यात आले. मात्र, हे कर्ज देत असताना फिर्यादीचा विश्वास संपादन करून त्यांना कर्जासाठी तारण खत करायचे असल्याचे सांगण्यात आले. प्रत्यक्षात आरोपींनी फिर्यादीची दिशाभूल करून त्यांच्या शेतजमिनीचे परस्पर खरेदीखत करून घेतले. एवढेच नव्हे तर, फिर्यादीच्या अनेक कोऱ्या कागदपत्रांवर स्वाक्षऱ्या घेऊन त्यांना मंजूर झालेल्या कर्जाची पूर्ण रक्कम देखील देण्यात आली नाही, असा गंभीर आरोप फिर्यादीने केला आहे.
आरोपींनी या स्वाक्षरी केलेल्या कोऱ्या कागदपत्रांचा गैरवापर करून उपनिबंधक कार्यालयाकडून महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम कलम १०१ अन्वये वसुलीचे आदेश मिळवले. या आदेशांच्या आधारे कर्ज जामीनदाराच्या मालमत्तेवर जप्तीची कारवाई देखील करण्यात आली. ही सर्व प्रक्रिया बनावट कागदपत्रांच्या आधारे राबवण्यात आल्याचे फिर्यादीचे म्हणणे आहे.
फिर्यादी हे अनुसूचित जातीचे असल्याने त्यांनी या अन्यायाविरुद्ध तक्रार दाखल केली होती, न्यायालयाच्या आदेशावरून संगमनेर तालुका पोलिसांनी भारतीय न्याय संहिता आणि अनुसूचित जाती-जमाती अत्याचार प्रतिबंधक कायद्याच्या विविध कलमान्वये गुन्हा दाखल केला आहे. आरोपींना अटक करण्यात आल्याने आता या प्रकरणातील पोलीस तपासाला वेग येण्याची चिन्हे आहेत.

anantpangarkar
Annant Ppangarkar

Post Views: 2,078
कै. विमल गुंजाळ ग्रामीण बिगरशेती सहकारी पतसंस्था गुन्हेगारी फसवणूक
Share. Facebook Twitter Pinterest WhatsApp
Annant Ppangarkar
  • Website

Related Posts

संगमनेरमधील वादग्रस्त ड्रग प्रकरण अखेर स्थानिक गुन्हे शाखेकडे; मात्र निर्दोषाला गोवणाऱ्या खाकी वर्दीतील ‘त्या’ अधिकाऱ्यावर कारवाई कधी?

18/09/2026

अवैध वाळू तस्करांवर एलसीबीचा दणका; ३० लाख ४० हजारांचा मुद्देमाल जप्त, ३ आरोपींना बेड्या

18/09/2026

ओम ज्वेलर्स चोरी प्रकरणाचा स्थानिक गुन्हे शाखेकडून पर्दाफाश; तिघांना अटक, मिरजगाव येथील गुन्ह्याचीही उकल

16/09/2026
Leave A Reply Cancel Reply

Document
Our Picks
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
Advertisement 1 Advertisement 2 Advertisement 3 Advertisement 4
Don't Miss
गुन्हेगारी

संगमनेरमधील वादग्रस्त ड्रग प्रकरण अखेर स्थानिक गुन्हे शाखेकडे; मात्र निर्दोषाला गोवणाऱ्या खाकी वर्दीतील ‘त्या’ अधिकाऱ्यावर कारवाई कधी?

By Annant Ppangarkar18/09/20260

महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन – संगमनेर शहरातील बहुचर्चित आणि वादग्रस्त ठरलेल्या एमडी ड्रग प्रकरणाला आता…

निष्क्रिय लोकांनी विकासावर बोलू नये; मुरूम-वाळूच्या पुढे न जाणाऱ्या लोकप्रतिनिधींवर बाळासाहेब थोरातांचा घणाघात

18/09/2026

गाजलेल्या गीतांचा नजराणा संगमनेरकरांना ‘दिल से’ आवडला! ‘संगमनेर फेस्टिव्हल’चा दुसरा दिवस; रहेमान म्युझिकने गाजवला

18/09/2026

कोकणातील गणेशोत्सवासाठी एसटी बसफेऱ्या वळवल्याने संगमनेरच्या ग्रामीण भागात प्रवाशांचे हाल; प्रशासनाविरोधात आंदोलनाचा इशारा

18/09/2026
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow

तुमचे हक्काचे व्यासपीठ

Facebook YouTube
Our Picks
September 2026
M T W T F S S
 123456
78910111213
14151617181920
21222324252627
282930  
« Aug    
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • पत्रकारिता
  • फोटो / गॅलरी
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
  • शेती व सहकार
  • सामाजिक
  • CONTACT US
  • ABOUT US
  • PRIVACY POLICY
© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.