Close Menu
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
What's Hot

१९७२ पेक्षा भयावह दुष्काळ; राजकारण बाजूला ठेवून जनतेला दिलासा द्या, मागेल त्याला पिण्याच्या पाण्याचे टँकर द्या – सत्यजित तांबे यांचे अधिकाऱ्यांना निर्देश

15/10/2026

गुरुवार, १५ ऑक्टोंबर — आजचा दिवस कसा असेल जाणून घ्या!

15/10/2026

संगमनेरच्या बाजारपेठेला मोठा दिलासा, दुष्काळाच्या संकटातही थोरात कारखान्याचा मोठा निर्णय; कामगारांना मिळणार इतका बोनस अन् सानुग्रह अनुदान; ऊस उत्पादकांना प्रतिटन एवढी मदत! लोकनेते बाळासाहेब थोरात यांची घोषणा

14/10/2026
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
Home » आमदार सत्यजित तांबे यांची अर्थसंकल्पीय अधिवेशनात उत्तर महाराष्ट्राच्या प्रश्नांवर अभ्यासपूर्ण मांडणी; नाशिक-पुणे रेल्वेसह बेरोजगारी आणि महिला सुरक्षेवर वेधले सरकारचे लक्ष
राजकारण

आमदार सत्यजित तांबे यांची अर्थसंकल्पीय अधिवेशनात उत्तर महाराष्ट्राच्या प्रश्नांवर अभ्यासपूर्ण मांडणी; नाशिक-पुणे रेल्वेसह बेरोजगारी आणि महिला सुरक्षेवर वेधले सरकारचे लक्ष

त्यांनी केलेल्या पाठपुराव्याचे मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांसह सर्वच स्तरांतून कौतुक होत आहे.
Annant PpangarkarBy Annant Ppangarkar29/03/2026No Comments2 Mins Read
Facebook Twitter WhatsApp
Share
Facebook Twitter Email Telegram WhatsApp

संगमनेर, प्रतिनिधी –
नव्या पिढीतील अभ्यासू लोकप्रतिनिधी म्हणून ओळख निर्माण केलेले आमदार सत्यजित तांबे यांनी मुंबई येथे संपन्न झालेल्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात उत्तर महाराष्ट्रासह राज्यातील विविध ज्वलंत प्रश्नांची प्रभावी मांडणी केली आहे.
सहकारमहर्षी भाऊसाहेब थोरात यांच्या विचारांचा वारसा जपत आणि माजी महसूलमंत्री बाळासाहेब थोरात व माजी आमदार डॉ. सुधीर तांबे यांच्या मार्गदर्शनाखाली कार्य करणाऱ्या आमदार तांबे यांनी या अधिवेशनात युवकांची बेरोजगारी, महिला सुरक्षा, नाशिक-पुणे रेल्वे आणि शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर सरकारला धारेवर धरले. त्यांच्या या अभ्यासपूर्ण आणि आक्रमक मांडणीची सध्या राज्यभर चर्चा होत आहे.
अधिवेशनातील उपस्थिती आणि कामकाजाच्या बाबतीत आमदार सत्यजित तांबे यांनी आपला वेगळा ठसा उमटवला आहे. १९ दिवसांच्या कामकाजापैकी १७ दिवस त्यांनी प्रत्यक्ष उपस्थिती दर्शवली असून, या काळात त्यांनी तब्बल १५२ तारांकित प्रश्न सभागृहात मांडले. याशिवाय ३५ लक्षवेधी सूचना, ६ सर्वसाधारण अर्धा तास चर्चा, ६ शासकीय ठराव आणि १८ औचित्याचे मुद्दे मांडून त्यांनी विविध विभागांच्या कामकाजाकडे लक्ष वेधले.
१८ विशेष उल्लेख, ६ अल्पकालीन चर्चा आणि १५ नियम ९३ अन्वये सूचनांच्या माध्यमातून त्यांनी जनसामान्यांचे प्रश्न सभागृहासमोर ठेवले. विविध विधेयकांवरील चर्चेत आणि अर्थसंकल्पीय विश्लेषणात त्यांचा सहभाग अत्यंत लक्षवेधी ठरला असून, त्यांनी मांडलेल्या १४ पॉईंट ऑफ इन्फॉर्मेशनमुळे सभागृहाचे कामकाज अधिक प्रभावी झाले.
या अधिवेशनात आमदार तांबे यांनी नाशिक-पुणे रेल्वेचा मुद्दा संगमनेर मार्गे नेण्याबाबत अत्यंत प्रभावीपणे मांडला. राज्यातील तरुणांच्या प्रश्नांसाठी त्यांनी स्वतंत्र ‘युवक कल्याण मंत्रालय’ आणि ‘युवक आयोगा’ची केलेली मागणी विशेष महत्त्वपूर्ण ठरली आहे. सरकारने जाहीर केलेली ७५ हजार पदांची भरती तातडीने पूर्ण करावी, अशी आग्रही मागणी करतानाच त्यांनी पोलीस दलातील अपुरे मनुष्यबळ आणि महिलांच्या सुरक्षेसाठी सीसीटीव्ही यंत्रणेची देखभाल या विषयांकडेही सरकारचे लक्ष वेधले. मायक्रो फायनान्स कंपन्यांकडून होणारी सर्वसामान्यांची फसवणूक थांबवण्यासोबतच संगमनेर आणि पारनेर तालुक्यात नवीन एमआयडीसी सुरू करण्याची मागणी त्यांनी यावेळी लावून धरली.
औद्योगिक विकासाबाबत बोलताना त्यांनी महाराष्ट्रातील वाढीव वीजदराबाबत चिंता व्यक्त केली. गुजरातसारख्या शेजारील राज्यांच्या तुलनेत महाराष्ट्रात वीजदर जास्त असल्याने उद्योग स्थलांतरित होत असल्याचे त्यांनी निदर्शनास आणून दिले. विदर्भाच्या धर्तीवर उत्तर महाराष्ट्राच्या विकासासाठी ‘ॲडवांटेज उत्तर महाराष्ट्र’ ही परिषद आयोजित करण्याची सूचना त्यांनी केली. यासोबतच संगमनेर येथील मंजूर महिला रुग्णालयाचे काम तातडीने पूर्ण करणे, वावी येथील ट्रॉमा केअर सेंटर सुरू करणे, वकील संरक्षण कायदा आणि सायबर गुन्हेगारी रोखण्यासाठी उपाययोजना अशा अनेक विषयांवर त्यांनी अभ्यासपूर्ण भाष्य केले. कांदा उत्पादक शेतकरी आणि शासकीय कर्मचाऱ्यांच्या प्रश्नांवर त्यांनी केलेल्या पाठपुराव्याचे मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांसह सर्वच स्तरांतून कौतुक होत आहे.

anantpangarkar
Annant Ppangarkar

Views: 373
अधिवेशन आढावा सत्यजित तांबे
Share. Facebook Twitter Pinterest WhatsApp
Annant Ppangarkar
  • Website

Related Posts

१९७२ पेक्षा भयावह दुष्काळ; राजकारण बाजूला ठेवून जनतेला दिलासा द्या, मागेल त्याला पिण्याच्या पाण्याचे टँकर द्या – सत्यजित तांबे यांचे अधिकाऱ्यांना निर्देश

15/10/2026

नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना आर्थिक मदत कधी मिळणार? आमदार अमोल खताळांनी दिली ही माहिती

13/10/2026

संगमनेर आगारात आणखी पाच इलेक्ट्रिक शिवाई बसेस; जिल्ह्यांतर्गत मार्गांवर धावणार

12/10/2026
Leave A Reply Cancel Reply

Document
Our Picks
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
Advertisement 1 Advertisement 2 Advertisement 3 Advertisement 4
Don't Miss
बैठक

१९७२ पेक्षा भयावह दुष्काळ; राजकारण बाजूला ठेवून जनतेला दिलासा द्या, मागेल त्याला पिण्याच्या पाण्याचे टँकर द्या – सत्यजित तांबे यांचे अधिकाऱ्यांना निर्देश

By Annant Ppangarkar15/10/20260

महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन- संगमनेर तालुका विस्ताराने मोठा असून यंदा पावसात झालेल्या मोठ्या घटीमुळे तालुक्यात…

गुरुवार, १५ ऑक्टोंबर — आजचा दिवस कसा असेल जाणून घ्या!

15/10/2026

संगमनेरच्या बाजारपेठेला मोठा दिलासा, दुष्काळाच्या संकटातही थोरात कारखान्याचा मोठा निर्णय; कामगारांना मिळणार इतका बोनस अन् सानुग्रह अनुदान; ऊस उत्पादकांना प्रतिटन एवढी मदत! लोकनेते बाळासाहेब थोरात यांची घोषणा

14/10/2026

रस्त्यावरील वादातून मारहाण, जीवे मारण्याची धमकी; संगमनेर न्यायालयाने सुनावली ही शिक्षा

14/10/2026
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow

तुमचे हक्काचे व्यासपीठ

Facebook YouTube
Our Picks
October 2026
M T W T F S S
 1234
567891011
12131415161718
19202122232425
262728293031  
« Sep    
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • पत्रकारिता
  • फोटो / गॅलरी
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
  • शेती व सहकार
  • सामाजिक
  • CONTACT US
  • ABOUT US
  • PRIVACY POLICY
© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.