Close Menu
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
What's Hot

थोरात सहकारी साखर कारखान्याच्या गळीत हंगामाचा उद्या शुभारंभ; जाणून घ्या कितवा आहे हा हंगाम!

13/10/2026

पंचनाम्यात वेळ घालवू नका, सरसकट मदत करा! दिल्लीवरून थेट शेतकऱ्यांच्या बांधावर पोहोचून बाळासाहेब थोरात आक्रमक!

13/10/2026

डीजेचा आवाज आणि लेझर लाईट्स खरोखरच जीवघेणे ठरू शकतात? तज्ज्ञ डॉक्टर काय म्हणतात, पाहा… शिंदेवाडीतील विद्यार्थ्यांच्या शिबिरात नेमकं काय घडलं…

13/10/2026
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
Home » अवकाळीच्या संकटात बाळासाहेब थोरात शेतकऱ्यांच्या बांधावर; तातडीने भरीव मदत देण्याची सरकारकडे मागणी
नैसर्गिक आपत्ती

अवकाळीच्या संकटात बाळासाहेब थोरात शेतकऱ्यांच्या बांधावर; तातडीने भरीव मदत देण्याची सरकारकडे मागणी

नुकसानीचे तातडीने पंचनामे करून सर्व शेतकरी व बाधित नागरिकांना त्वरित भरीव मदत मिळावी.
Annant PpangarkarBy Annant Ppangarkar30/03/2026No Comments2 Mins Read
Facebook Twitter WhatsApp
Share
Facebook Twitter Email Telegram WhatsApp

संगमनेर, प्रतिनिधी-
रविवारी संगमनेर तालुक्यातील पश्चिम भागात अवकाळी पावसाने शेतकऱ्यांची पिकांचे मोठे नुकसान झाले असून हातातोंडाशी आलेले पीक वाया गेले आहे. याचबरोबर अनेक घरांचेही मोठे नुकसान झाले आहे. या पार्श्वभूमीवर राज्याचे माजी मंत्री, लोकनेते बाळासाहेब थोरात यांनी या नुकसानग्रस्त भागाची पाहणी करून नागरिकांना दिलासा दिला याचबरोबर सरकारने तातडीने पंचनामे करून सर्व नुकसानग्रस्तांना भरीव मदत करावी अशी आग्रही मागणी केली.
निमज, धांदरफळ खुर्द, धांदरफळ बुद्रुक येथे अवकाळी पावसाने झालेल्या नुकसानीची पाहणी बाळासाहेब थोरात यांनी केली. यावेळी समवेत अहिल्यानगर जिल्हा परिषदेचे माजी सदस्य रामहरी कातोरे, संपतराव डोंगरे, अनिल काळे, बाळासाहेब देशमाने, अरुण गुंजाळ, सागर डोंगरे, मंगेश मतकर, रमेश गुंजाळ, विजय राहणे, दत्तू कोकणे, सतीश गुंजाळ, तुकाराम गुंजाळ, गंगाधर डोंगरे, संदीप गुंजाळ यांच्यासह गावांमधील विविध कार्यकर्ते व युवक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
यावेळी बोलताना थोरात म्हणाले की, भारत हा कृषिप्रधान देश आहे. मात्र शेतकरी हा कायम संकटात आहे. मोठ्या अडचणीवर मात करून तो पीक पिकवतो. मात्र अस्मानी संकटामुळे अनेकदा पिके वाया जातात. आलेल्या पिकांना भाव मिळत नाही. अवकाळी पावसाने हातातोंडाशी आलेले पीक वाया गेले आहे. यामुळे अनेक शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. याचबरोबर जोरदार वादळामुळे अनेक घरांची पडझड झाली आहे. जनावरांचे गोठे पडले आहेत. या भागात डाळिंब, कांदा, मका याचबरोबर उभे असलेले सर्व पिके वाया गेले असून या सर्व नुकसानीचे तातडीने पंचनामे करून सर्व शेतकरी व बाधित नागरिकांना त्वरित भरीव मदत मिळावी.
काल अचानक आलेल्या अवकाळी पावसाने मोठे नुकसान झाले. यानंतर लोकनेते थोरात यांनी तातडीने आपल्या यंत्रणेला संबंधित शेतकऱ्यांना मदतीच्या सूचना दिल्या, याचबरोबर फोनद्वारे अनेक शेतकऱ्यांची संपर्क साधला. बाळासाहेब देशमाने व रामहरी कातोरे यांनी तातडीने विविध भागांची पाहणी करून नागरिकांना दिलासा दिला.
यावेळी निमज येथील अरुण गुंजाळ म्हणाले की, अचानक आलेल्या पावसाने शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. ज्या-ज्या वेळी संकट येते त्यावेळी लोकनेते बाळासाहेब थोरात हे शेतकऱ्यांच्या मदतीला आले आहेत. सरकार कोणतेही असो माजी मंत्री बाळासाहेब थोरात हे कायम जनतेच्या पाठीशी उभे राहिले आहेत.
यावेळी धांदरफळ बुद्रुक, धांदरफळ खुर्द, निमज येथील विविध नुकसानग्रस्त शेतकऱ्यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या. शेतकरी महिलांना झालेल्या नुकसानीमुळे अश्रू आवरता आले नाही.

anantpangarkar
Annant Ppangarkar

Post Views: 693
अवकाळी पाऊस पाहणी बाळासाहेब थोरात
Share. Facebook Twitter Pinterest WhatsApp
Annant Ppangarkar
  • Website

Related Posts

थोरात सहकारी साखर कारखान्याच्या गळीत हंगामाचा उद्या शुभारंभ; जाणून घ्या कितवा आहे हा हंगाम!

13/10/2026

पंचनाम्यात वेळ घालवू नका, सरसकट मदत करा! दिल्लीवरून थेट शेतकऱ्यांच्या बांधावर पोहोचून बाळासाहेब थोरात आक्रमक!

13/10/2026

दिल्लीतील भव्य आंदोलनात बाळासाहेब थोरात यांचा सहभाग: लोकशाही आणि संविधान वाचवण्यासाठी मुख्य निवडणूक आयुक्तांचा राजीनामा आवश्यक

12/10/2026
Leave A Reply Cancel Reply

Document
Our Picks
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
Advertisement 1 Advertisement 2 Advertisement 3 Advertisement 4
Don't Miss
शेती व सहकार

थोरात सहकारी साखर कारखान्याच्या गळीत हंगामाचा उद्या शुभारंभ; जाणून घ्या कितवा आहे हा हंगाम!

By Annant Ppangarkar13/10/20260

महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन- सहकारमहर्षी भाऊसाहेब थोरात सहकारी साखर कारखान्याच्या गळीत हंगामाचा शुभारंभ उद्या बुधवारी…

पंचनाम्यात वेळ घालवू नका, सरसकट मदत करा! दिल्लीवरून थेट शेतकऱ्यांच्या बांधावर पोहोचून बाळासाहेब थोरात आक्रमक!

13/10/2026

डीजेचा आवाज आणि लेझर लाईट्स खरोखरच जीवघेणे ठरू शकतात? तज्ज्ञ डॉक्टर काय म्हणतात, पाहा… शिंदेवाडीतील विद्यार्थ्यांच्या शिबिरात नेमकं काय घडलं…

13/10/2026

शिक्षण क्षेत्राची मान उंचावणारी बातमी! संगमनेरच्या या लेखकाच्या चार पुस्तकांचा शासनमान्य ग्रंथ निवडसुचित समावेश; वाचा सविस्तर

13/10/2026
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow

तुमचे हक्काचे व्यासपीठ

Facebook YouTube
Our Picks
October 2026
M T W T F S S
 1234
567891011
12131415161718
19202122232425
262728293031  
« Sep    
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • पत्रकारिता
  • फोटो / गॅलरी
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
  • शेती व सहकार
  • सामाजिक
  • CONTACT US
  • ABOUT US
  • PRIVACY POLICY
© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.