Close Menu
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
What's Hot

माझं गाव माझा अभिमान… राजापूर

14/10/2026

“गंभीर दुष्काळाने साखर कारखानदारी अडचणीत; सरकारने तातडीने मदत करावी” – बाळासाहेब थोरात यांची जोरदार मागणी

14/10/2026

‘ये पब्लिक है, सब जानती है!’ — निळवंडेच्या पाण्याचे श्रेय लाटणाऱ्याना संगमनेरची जनता निवडणुकीत देणार सडेतोड उत्तर; अमोल शेलकर यांचा घणाघात

14/10/2026
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
Home » वडगावपान येथील बहुचर्चित खून खटल्याचा निकाल: मुख्य आरोपीला जन्मठेप तर अन्य आरोपींना १० वर्ष कारावासाची शिक्षा
न्यायालय

वडगावपान येथील बहुचर्चित खून खटल्याचा निकाल: मुख्य आरोपीला जन्मठेप तर अन्य आरोपींना १० वर्ष कारावासाची शिक्षा

या खटल्याची सुनावणी अतिरिक्त सत्र न्यायाधीश व्ही. बी. गव्हाणे यांच्यासमोर पार पडली. सरकारी वकील जयंत दिवटे यांनी कोर्टासमोर एकूण १५ साक्षीदार तपासले. यामध्ये विशेषतः प्रत्यक्षदर्शी साक्षीदार, वैद्यकीय अधिकारी डॉ. संदीप कचेरीया आणि तपास अधिकारी यांची साक्ष अत्यंत महत्त्वाची ठरली.
Annant PpangarkarBy Annant Ppangarkar30/03/2026Updated:30/03/2026No Comments2 Mins Read
Facebook Twitter WhatsApp
Share
Facebook Twitter Email Telegram WhatsApp

संगमनेर, प्रतिनिधी-
संगमनेर तालुक्यातील वडगावपान येथे घडलेल्या बहुचर्चित खुनाच्या घटनेतील आरोपींना न्यायालयाने अखेर शिक्षा सुनावली आहे. सोमवारी न्यायालयाने मुख्य आरोपीला जन्मठेप तर अन्य दोघांपैकी एका आरोपीला दहा वर्षाची सक्त मजुरी व तिसऱ्या आरोपीला दहा वर्षे साध्या कैदेची शिक्षा न्यायालयाने ठोठावली आहे.
या खटल्याची सविस्तर पार्श्वभूमी अशी की, २२ जून २०२० रोजी सायंकाळी सात वाजेच्या सुमारास वडगावपान येथील फिर्यादी प्रतीक बाबासाहेब चत्तर यांच्या ‘कमळेश्वर चिकन शॉप’वर ही घटना घडली होती. आदल्या दिवशी झालेल्या भांडणावरून पोलिसांत दिलेल्या तक्रारीचा राग मनात धरून आरोपी राहुल देविदास काळे, देविदास हरिभाऊ काळे आणि रामनाथ सावित्रा गायकवाड हे तेथे आले होते.
त्यांनी फिर्यादीचे वडील बाळासाहेब चत्तर यांना शिवीगाळ करत मारहाण करण्यास सुरुवात केली. याच भांडणादरम्यान आरोपी राहुल काळे याने बाळासाहेब चत्तर यांना जीवे मारण्याच्या उद्देशाने त्यांच्या डोक्यावर, पाठीवर आणि छातीवर चाकूने सपासप वार केले. यात त्यांचा मृत्यू झाला. वडिलांना वाचवण्यासाठी गेलेला मुलगा प्रतीक याच्यावरही राहुलने चाकूने वार करून त्याला जीवे मारण्याचा प्रयत्न केला होता.
या हल्ल्यानंतर गंभीर जखमी अवस्थेत प्रतीक चत्तर याने खासगी हॉस्पिटलमध्ये दिलेल्या जबाबावरून संगमनेर तालुका पोलीस ठाण्यात गु.र.नं. २९४/२०२० नुसार भा.दं.वि. कलम ३०२, ३०७, २०१, ३४ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला होता.
या गुन्ह्याचा तपास तत्कालीन पोलीस निरीक्षक पी. वाय. कादरी यांनी अत्यंत जिद्दीने करून आरोपींविरुद्ध भौतिक, परिस्थितीजन्य आणि वैद्यकीय पुरावे उपलब्ध केले व न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले होते.
या खटल्याची सुनावणी अतिरिक्त सत्र न्यायाधीश व्ही. बी. गव्हाणे यांच्यासमोर पार पडली. सरकारी वकील जयंत दिवटे यांनी कोर्टासमोर एकूण १५ साक्षीदार तपासले. यामध्ये विशेषतः प्रत्यक्षदर्शी साक्षीदार, वैद्यकीय अधिकारी डॉ. संदीप कचेरीया आणि तपास अधिकारी यांची साक्ष अत्यंत महत्त्वाची ठरली. सरकारी पक्षाचा प्रबळ युक्तिवाद आणि सादर केलेले पुरावे ग्राह्य धरून न्यायालयाने आरोपींना कठोर शिक्षा सुनावली आहे.
मुख्य आरोपी राहुल देविदास काळे याला कलम ३०२ अन्वये जन्मठेप आणि २०,०००/- रुपये दंड, कलम ३०७ अन्वये १० वर्षे सक्तमजुरी व १०,०००/- रुपये दंड, कलम २०१ अन्वये ३ वर्षे सक्तमजुरी व ५,०००/- रुपये दंड आणि कलम ३२४ अन्वये २ वर्षे सक्तमजुरीची शिक्षा ठोठावण्यात आली आहे. तसेच आरोपी देविदास काळे याला १० वर्षे साधी कैद आणि ७६,०००/- रुपये दंडाची शिक्षा सुनावण्यात आली असून आरोपी रामनाथ सावित्रा गायकवाड याला १० वर्षे सक्तमजुरी व १६,०००/- रुपये दंडाची शिक्षा देण्यात आली आहे. या दंडातून ३,०००/- रुपये सरकारजमा करून उर्वरित रक्कम फिर्यादीच्या कुटुंबाला देण्याचे आदेश न्यायालयाने दिले आहेत.
या संपूर्ण खटल्यात सरकार पक्षाला पैरवी अधिकारी म्हणून सहाय्यक फौजदार प्रवीण डावरे, नयना पंडित आणि शीतल तोरकडी यांनी मोलाचे सहकार्य केले.

anantpangarkar
Annant Ppangarkar

Post Views: 2,292
जिल्हा व अतिरिक्त सत्र न्यायालय निर्णय
Share. Facebook Twitter Pinterest WhatsApp
Annant Ppangarkar
  • Website

Related Posts

दूध भेसळ प्रकरणी मुख्य आरोपीला सात दिवसांत अटकपूर्व जामीन मंजूर

11/10/2026

३९ ग्रॅम एमडी ड्रग्ज जप्त, तरी आरोपीला जामीन! संगमनेर न्यायालयाच्या आदेशात नेमके काय?

09/10/2026

सायखिंडी फाटा गांजा तस्करीत आरोपींना पुन्हा १२ ऑक्टोबरपर्यंत पोलीस कस्टडी; बँक खात्यांचे आर्थिक व्यवहार पोलिसांच्या रडारवर

09/10/2026
Leave A Reply Cancel Reply

Document
Our Picks
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
Advertisement 1 Advertisement 2 Advertisement 3 Advertisement 4
Don't Miss
सामाजिक

माझं गाव माझा अभिमान… राजापूर

By Annant Ppangarkar14/10/20260

माझा गाव माझा अभिमान… राजापूर भाऊसाहेब गणपत हासे, अध्यक्ष, महात्मा गांधी तंटामुक्ती समिती, राजापूर. (मो.…

“गंभीर दुष्काळाने साखर कारखानदारी अडचणीत; सरकारने तातडीने मदत करावी” – बाळासाहेब थोरात यांची जोरदार मागणी

14/10/2026

‘ये पब्लिक है, सब जानती है!’ — निळवंडेच्या पाण्याचे श्रेय लाटणाऱ्याना संगमनेरची जनता निवडणुकीत देणार सडेतोड उत्तर; अमोल शेलकर यांचा घणाघात

14/10/2026

सरकारी जमिनीवर अतिक्रमण! प्रशासनाचा डोळेझाक कारभार; अधिकाऱ्यांना सरकारी मालमत्ता सांभाळता येईना

14/10/2026
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow

तुमचे हक्काचे व्यासपीठ

Facebook YouTube
Our Picks
October 2026
M T W T F S S
 1234
567891011
12131415161718
19202122232425
262728293031  
« Sep    
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • पत्रकारिता
  • फोटो / गॅलरी
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
  • शेती व सहकार
  • सामाजिक
  • CONTACT US
  • ABOUT US
  • PRIVACY POLICY
© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.