नाशिक –
नाशिक येथील स्वयंघोषित महाराज अशोक खरात याच्या काळ्या कर्तृत्वाचे एकामागून एक धक्कादायक पैलू समोर येत असून यामुळे संपूर्ण महाराष्ट्र हादरला आहे. लैंगिक शोषण, आर्थिक फसवणूक आणि जादूटोणा अशा गंभीर आरोपांखाली सध्या तो पोलीस कोठडीत असून एसआयटीमार्फत या प्रकरणाचा कसून तपास सुरू आहे.
तपासादरम्यान समोर आलेल्या माहितीनुसार, खरातच्या भक्तांमध्ये केवळ सामान्य नागरिकच नव्हे तर बडे सरकारी अधिकारी, उद्योजक आणि राजकारण्यांचाही समावेश होता.
अशोक खरात हा आपल्या श्रीमंत भक्तांच्या घरी किंवा व्यवसायाच्या ठिकाणी मार्गदर्शनासाठी जाण्यासाठी अव्वाच्या सव्वा फी वसूल करत असे. केवळ एका ‘आऊटडोअर व्हिजिट’साठी तो चक्क ५ लाख रुपयांपर्यंतची रक्कम उकळत असल्याचे उघड झाले आहे.
जो भक्त जास्त पैसे देईल, त्यालाच तो प्राधान्य देत असे. धक्कादायक बाब म्हणजे, पुण्यातील एका करोडपती भक्ताला पूजेच्या बहाण्याने त्याने ९० लाख रुपयांची आलिशान कार खरेदी करायला लावली आणि नंतर ती चतुराईने स्वतःच्या नावावर करून घेतली. खरातच्या पोलीस कोठडीची मुदत उद्या संपत असून, पोलीस या प्रकरणातील आणखी धागेदोरे शोधण्याचा प्रयत्न करत आहेत.



नाशिकमधील ढोंगी बाबा अशोक खरातचे धक्कादायक कारनामे उघड; एका भेटीसाठी उकळायचा लाखो रुपये
पुण्यातील एका करोडपती भक्ताला पूजेच्या बहाण्याने त्याने ९० लाख रुपयांची आलिशान कार खरेदी करायला लावली आणि नंतर ती चतुराईने स्वतःच्या नावावर करून घेतली.

