Close Menu
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
What's Hot

माजी मंत्री बाळासाहेब थोरात व आमदार सत्यजित तांबे यांच्या निवासस्थानी गणरायाचे आगमन; पर्यावरणपूरक व त्रासमुक्त गणेशोत्सवाचे आवाहन

14/09/2026

मोठी कारवाई: तीन कुंटणखान्यांवर छापे, ८ महिलांची सुटका; तिघांवर गुन्हे दाखल

14/09/2026

संगमनेरमध्ये १७ ते २० सप्टेंबरदरम्यान अमृत उद्योग समूहातील सहकारी संस्थांच्या वार्षिक सर्वसाधारण सभा; माजी मंत्री बाळासाहेब थोरात, माजी आमदार डॉ. सुधीर तांबे यांची मुख्य उपस्थिती

14/09/2026
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
Home » भोंदू खरातचा आणखी एक नवा कारनामा: शिर्डीत जमिनीच्या व्यवहारात फसवणूक आणि बेकायदेशीर सावकारी; खरातसह पाच जणांवर गुन्हा दाखल, दोघांना अटक
गुन्हेगारी

भोंदू खरातचा आणखी एक नवा कारनामा: शिर्डीत जमिनीच्या व्यवहारात फसवणूक आणि बेकायदेशीर सावकारी; खरातसह पाच जणांवर गुन्हा दाखल, दोघांना अटक

जमीन व्यवहारात कोट्यवधी रुपयांची आर्थिक फसवणूक केल्याप्रकरणी आणि बेकायदेशीर सावकारीच्या माध्यमातून धमकावल्याबद्दल शिर्डी पोलिसांनी मोठी कारवाई केली आहे.
Annant PpangarkarBy Annant Ppangarkar31/03/2026Updated:31/03/2026No Comments2 Mins Read
Facebook Twitter WhatsApp
Share
Facebook Twitter Email Telegram WhatsApp
शिर्डी, विशेष प्रतिनिधी- 
महिलांचे लैंगिक शोषण करणाऱ्या भोंदू बाबा खरात याचा आणखी एक नवा कारनामा समोर आला आहे. यामुळे खरातच्या अडचणीत वाढ झाली आहे. शिर्डी येथील जमीन व्यवहारात कोट्यवधी रुपयांची आर्थिक फसवणूक करत बेकायदेशीर सावकारी प्रकरणी शिर्डी पोलिसांनी मोठी कारवाई केली आहे. या प्रकरणात मुख्य आरोपी कॅप्टन अशोककुमार एकनाथ खरात, त्यांची पत्नी कल्पना खरात आणि इतर तीन साथीदारांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून, पोलिसांनी यातील दोन आरोपींना अटक केली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, ऑगस्ट २०२३ पासून शिर्डी, नाशिक आणि राहाता परिसरात हा जमीन व्यवहाराचा घोळ सुरू होता. पीडित व्यक्तीला पैशांची गरज असताना कॅप्टन अशोककुमार खरात याने दरमहा दोन टक्के व्याजाने पैसे दिले होते. याशिवाय अतिरिक्त २ कोटी ५२ लाख रुपये देऊन त्यातील १ कोटी ६४ लाख रुपये पुन्हा व्याजापोटी विविध मध्यस्थांच्या माध्यमातून परत घेतले. 
पीडित व्यक्तीने व्याजाचे पैसे परत केले असतानाही आणि उर्वरित व्यवहाराचा हिशोब पूर्ण करण्याची तयारी दर्शवली असतानाही, आरोपींनी जाणीवपूर्वक टाळाटाळ केली. एवढेच नव्हे तर पीडित व्यक्तीची हक्काची चार एकर जमीन त्यांच्या नावावर करून न देता आरोपींनी त्यांची फसवणूक केली.
या गंभीर प्रकरणात पीडित व्यक्तीचे स्वाक्षरी केलेले कोरे चेकबुक विश्वासाने एका आरोपीकडे ठेवले होते, याचा गैरवापर करून खात्यातील रक्कम परस्पर वर्ग करण्यात आल्याचेही समोर आले आहे. 
याप्रकरणी फिर्यादीने दिलेल्या तक्रारीवरून शिर्डी पोलीस ठाण्यात गुन्हा रजिस्टर नंबर २१३/२६ नुसार भारतीय न्याय संहिता (BNS) कलम ३१६(२), ३१८(२), ३१८(४) आणि महाराष्ट्र सावकारी अधिनियम २०१४ चे कलम ३९ व ४४ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला असल्याची माहिती वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी दिली.
या प्रकरणात कॅप्टन अशोककुमार खरात, त्याची पत्नी कल्पना खरात, किरण नानासाहेब सोनवणे, अरविंद पांडुरंग वावके आणि अशोक परभत तांबे अशा पाच जणांवर गुन्हा नोंदवण्यात आला असून, पोलिसांनी तात्काळ कारवाई करत आरोपी किरण सोनवणे आणि अरविंद बावके यांना बेड्या ठोकल्या आहेत. या घटनेमुळे शिर्डी परिसरात मोठी खळबळ उडाली असून पोलीस अधिक तपास करत आहेत.

anantpangarkar
Annant Ppangarkar

Post Views: 801
बेकायदेशीर जमीन व्यवहार भोंदू बाबा अशोक खरात शिर्डी पोलीस
Share. Facebook Twitter Pinterest WhatsApp
Annant Ppangarkar
  • Website

Related Posts

मोठी कारवाई: तीन कुंटणखान्यांवर छापे, ८ महिलांची सुटका; तिघांवर गुन्हे दाखल

14/09/2026

समृद्धी महामार्गावर चाकूचा धाक दाखवून दरोडा टाकणाऱ्या सराईत टोळीचा पर्दाफाश; स्थानिक गुन्हे शाखेकडून चार आरोपींना अटक, एक लाख दोन हजारांचा मुद्देमाल जप्त

12/09/2026

चार अवैध कत्तलखान्यांवर एलसीबीचे छापे, १०५० किलो गोमांसासह ९ जनावरांची सुटका

12/09/2026
Leave A Reply Cancel Reply

Document
Our Picks
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
Advertisement 1 Advertisement 2 Advertisement 3 Advertisement 4
Don't Miss
धार्मिक

माजी मंत्री बाळासाहेब थोरात व आमदार सत्यजित तांबे यांच्या निवासस्थानी गणरायाचे आगमन; पर्यावरणपूरक व त्रासमुक्त गणेशोत्सवाचे आवाहन

By Annant Ppangarkar14/09/20260

Annant Ppangarkar महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन – राज्याचे माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांच्या ‘सुदर्शन’ निवासस्थानी…

मोठी कारवाई: तीन कुंटणखान्यांवर छापे, ८ महिलांची सुटका; तिघांवर गुन्हे दाखल

14/09/2026

संगमनेरमध्ये १७ ते २० सप्टेंबरदरम्यान अमृत उद्योग समूहातील सहकारी संस्थांच्या वार्षिक सर्वसाधारण सभा; माजी मंत्री बाळासाहेब थोरात, माजी आमदार डॉ. सुधीर तांबे यांची मुख्य उपस्थिती

14/09/2026

सोमवार १४ सप्टेंबर; जाणून घ्या आजचे राशिभविष्य

14/09/2026
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow

तुमचे हक्काचे व्यासपीठ

Facebook YouTube
Our Picks
September 2026
M T W T F S S
 123456
78910111213
14151617181920
21222324252627
282930  
« Aug    
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • पत्रकारिता
  • फोटो / गॅलरी
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
  • शेती व सहकार
  • सामाजिक
  • CONTACT US
  • ABOUT US
  • PRIVACY POLICY
© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.