Close Menu
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
What's Hot

लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांचे संगमनेर शहरात अद्यावत स्मारक उभारणार : माजी आमदार डॉ. सुधीर तांबे

August 1, 2026

‘कडलग इन्व्हेस्टमेंट’च्या आर्थिक साक्षरता कार्यशाळेला गुंतवणूकदारांचा प्रतिसाद

August 1, 2026

शनिवार, १ ऑगस्ट २०२६ — आजचा तुमचा दिवस कसा असेल

August 1, 2026
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
Home » संगमनेरमधील अल्पवयीन मुलीवरील ॲसिड हल्ला प्रकरण: १५ दिवस उलटूनही आरोपी अद्याप मोकाटच; माहिती देणाऱ्यास २ लाखांचे बक्षीस जाहीर
गुन्हेगारी

संगमनेरमधील अल्पवयीन मुलीवरील ॲसिड हल्ला प्रकरण: १५ दिवस उलटूनही आरोपी अद्याप मोकाटच; माहिती देणाऱ्यास २ लाखांचे बक्षीस जाहीर

तपासाचा एक भाग म्हणून पोलिसांनी पीडित मुलीने दिलेल्या वर्णनावरून संशयित आरोपीचे रेखाचित्र (स्केच) प्रसिद्ध केले आहे.
अनंत पांगारकरBy अनंत पांगारकरApril 1, 2026No Comments2 Mins Read
Facebook Twitter WhatsApp
Share
Facebook Twitter Email Telegram WhatsApp

अहिल्यानगर, विशेष प्रतिनिधी
संगमनेर तालुक्यातील कोल्हार-घोटी मार्गावरील वडगाव पान येथे इयत्ता सहावीत शिकणाऱ्या एका अल्पवयीन मुलीवर झालेल्या भीषण ॲसिड हल्ल्याच्या घटनेला आता १५ दिवस उलटून गेले आहेत. मात्र, एवढा काळ लोटूनही पोलीस प्रशासनाला या प्रकरणातील मुख्य आरोपीचा शोध घेण्यात यश आलेले नाही. या धक्कादायक घटनेमुळे संपूर्ण जिल्ह्यात संतापाची लाट असून पोलिसांच्या तपास यंत्रणेसमोर मोठे आव्हान उभे राहिले आहे. या प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेऊन आता अहिल्यानगर पोलीस दलाच्या गुन्हे शाखेने आरोपीची ओळख पटवणाऱ्या किंवा माहिती देणाऱ्या व्यक्तीस २ लाख रुपयांचे रोख बक्षीस जाहीर केले आहे.
ही दुर्दैवी घटना पंधरा दिवसांपूर्वी घडली होती. पीडित मुलगी दुपारी शाळेतून घरी परतत होती. ती एकटीच रत्याने जात असल्याचे पाहून एका अज्ञात इसमाने तिच्यावर अचानक ॲसिड फेकले आणि तिथून पळ काढला. या भीषण हल्ल्यात मुलगी गंभीररीत्या भाजली असून तिच्यावर सध्या खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
या घटनेचे पडसाद राज्य विधिमंडळाच्या अधिवेशनातही उमटले असून जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी या प्रकरणाची सखोल चौकशी करून आरोपीवर कठोर कारवाई करण्याचे आदेश प्रशासनाला दिले आहेत.
तपासादरम्यान पोलिसांना अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे. ज्या परिसरात ही घटना घडली, तिथे कुठेही सीसीटीव्ही कॅमेरे उपलब्ध नाहीत. तसेच मुलगी एकटीच असल्याने या घटनेचा कोणताही प्रत्यक्षदर्शी पुरावा पोलिसांच्या हाती लागलेला नाही.
स्थानिक गुन्हे शाखेसह पोलीस अधिकारी आणि कर्मचाऱ्यांची पथके दिवसरात्र या प्रकरणाचा तपास करत आहेत. पोलिसांनी अनेक संशयितांना ताब्यात घेऊन त्यांची चौकशी केली आणि अनेकांचे जबाबही नोंदवले, परंतु अद्याप कोणत्याही ठोस निष्कर्षापर्यंत पोहोचता आलेले नाही. मुलीला नक्की कोणत्या कारणातून लक्ष्य करण्यात आले, याचा उलगडा होणे अद्याप बाकी आहे.
तपासाचा एक भाग म्हणून पोलिसांनी पीडित मुलीने दिलेल्या वर्णनावरून संशयित आरोपीचे रेखाचित्र (स्केच) प्रसिद्ध केले आहे. हे रेखाचित्र जिल्ह्यातील सर्व प्रमुख ठिकाणी आणि सोशल मीडियावर प्रसारित करण्यात आले आहे. नागरिकांना आवाहन करण्यात आले आहे की, या रेखाचित्रातील व्यक्तीबाबत कोणासही काही माहिती मिळाल्यास किंवा ओळख पटल्यास त्यांनी तातडीने पोलीस प्रशासनाशी संपर्क साधावा. माहिती देणाऱ्याचे नाव पूर्णतः गुप्त ठेवले जाईल, असे आश्वासनही पोलिसांनी दिले आहे.
या प्रकरणाच्या माहितीसाठी स्थानिक गुन्हे शाखा, अहिल्यानगर यांच्या ०२४१-२४१६१११ या क्रमांकावर किंवा पोलीस निरीक्षक किरणकुमार कबाडी (९८२३२५६९४९), पोलीस उपनिरीक्षक महादेव गुट्टे (८२०८४४६२९३) आणि पोलीस उपनिरीक्षक दीपक मेढे (९१७५२६४९२८) यांच्याशी संपर्क साधता येईल. गुन्हेगाराला लवकरात लवकर बेड्या ठोकण्यासाठी नागरिकांनी सतर्क राहून पोलीस प्रशासनाला सहकार्य करावे, अशी विनंती करण्यात आली आहे.

anantpangarkar
अनंत पांगारकर

Post Views: 1,271
ॲसिड हल्ला अल्पवयीन मुलीवर ॲसिड हल्ला अहिल्यानगर एलसीबी दोन लाख बक्षीस
Share. Facebook Twitter Pinterest WhatsApp
अनंत पांगारकर
  • Website

Related Posts

संगमनेर तालुक्यात लपून-छपून उरकला बालविवाह; ५ जणांवर घारगाव पोलिसांत गुन्हा

July 30, 2026

कचरा वेचण्याच्या बहाण्याने ‘रेकी’; बंद घरे गाठून घरफोडी करणाऱ्या दोन महिला जेरबंद

July 25, 2026

संघटित गुन्हेगारीविरोधात मोठे पाऊल; गोवंश तस्करीप्रकरणी ‘बीएनएस’ कलम १११ अन्वये दोघांवर पहिली मोठी कारवाई संगमनेरात

July 24, 2026
Leave A Reply Cancel Reply

Document
Our Picks
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
Advertisement 1 Advertisement 2 Advertisement 3 Advertisement 4
Don't Miss
सामाजिक

लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांचे संगमनेर शहरात अद्यावत स्मारक उभारणार : माजी आमदार डॉ. सुधीर तांबे

By अनंत पांगारकरAugust 1, 20260

महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन  संगमनेर: दलित, शोषितांचा आपल्या साहित्यातून आवाज बुलंद करणारे आणि हक्कांसाठी लढा…

‘कडलग इन्व्हेस्टमेंट’च्या आर्थिक साक्षरता कार्यशाळेला गुंतवणूकदारांचा प्रतिसाद

August 1, 2026

शनिवार, १ ऑगस्ट २०२६ — आजचा तुमचा दिवस कसा असेल

August 1, 2026

नाशिक-पुणे रेल्वेसाठी ९ ऑगस्टला महामार्गावर चक्काजाम; आमदार सत्यजीत तांबे यांच्याकडून जनआंदोलनाची हाक

July 31, 2026
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow

तुमचे हक्काचे व्यासपीठ

Facebook YouTube
Our Picks
August 2026
M T W T F S S
 12
3456789
10111213141516
17181920212223
24252627282930
31  
« Jul    
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • पत्रकारिता
  • फोटो / गॅलरी
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
  • शेती व सहकार
  • सामाजिक
  • CONTACT US
  • ABOUT US
  • PRIVACY POLICY
© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.