Close Menu
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
What's Hot

‘ब्रिक्स’ आंतरराष्ट्रीय महोत्सवात संगमनेरी योगवैभव! अहमदाबादेत ध्रुव ग्लोबलच्या १० खेळाडूंनी घडवले योगपरंपरेचे दर्शन

15/10/2026

१९७२ पेक्षा भयावह दुष्काळ; राजकारण बाजूला ठेवून जनतेला दिलासा द्या, मागेल त्याला पिण्याच्या पाण्याचे टँकर द्या – सत्यजित तांबे यांचे अधिकाऱ्यांना निर्देश

15/10/2026

गुरुवार, १५ ऑक्टोंबर — आजचा दिवस कसा असेल जाणून घ्या!

15/10/2026
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
Home » संगमनेरमध्ये हनुमान जयंतीचा उत्साह; महिलाशक्तीने ओढला हनुमानरायाचा रथ
सामाजिक

संगमनेरमध्ये हनुमान जयंतीचा उत्साह; महिलाशक्तीने ओढला हनुमानरायाचा रथ

मिरवणूक अत्यंत शांततेत आणि शिस्तबद्ध पद्धतीने पार पडण्यासाठी पोलीस उपाधीक्षक डॉ. कुणाल सोनावणे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक समीर बारवकर यांनी चोख पोलीस बंदोबस्त तैनात केला होता.
Annant PpangarkarBy Annant Ppangarkar02/04/2026Updated:02/04/2026No Comments2 Mins Read
Facebook Twitter WhatsApp
Share
Facebook Twitter Email Telegram WhatsApp

संगमनेर, प्रतिनिधी-
संगमनेर शहरात हनुमान जयंतीचा उत्सव अत्यंत भक्तिमय वातावरणात आणि पारंपरिक पद्धतीने साजरा करण्यात आला. या निमित्ताने आयोजित करण्यात आलेल्या भव्य रथ मिरवणुकीत शेकडो महिलांनी उत्स्फूर्तपणे सहभाग नोंदवत हनुमानाचा रथ ओढण्याची वर्षांनुवर्षांची परंपरा यंदाही मोठ्या उत्साहात जपली.
सकाळी आठ वाजता शहर पोलीस स्थानकापासून पोलीस निरीक्षक समीर बारवकर यांनी आपल्या पोलीस पथकासह मानाचा भगवा ध्वज हाती घेत जयघोषात चंद्रशेखर चौकात हनुमान रथापाशी आणला. तेथे सजवलेल्या रथावर विधीवत ध्वज फडकवण्यात आला.
आमदार अमोल खताळ तसेच पोलीस निरीक्षक समीर बारवकर यांच्या हस्ते पवनपुत्र हनुमानरायाची महाआरती करण्यात आली. यानंतर रथाचा दोर हातात धरत नगराध्यक्ष डॉ. मैथिली तांबे, माजी नगराध्यक्ष दुर्गाताई तांबे, डॉ. जयश्री थोरात, आमदार खताळ यांच्या पत्नी नीलम खताळ यांच्यासह शेकडो महिलांनी उत्साहात रथ ओढत मिरवणुकीला सुरुवात केली.
चंद्रशेखर चौकातून निघालेली ही मिरवणूक रंगार गल्ली, कॅप्टन लक्ष्मी चौक, लालबहादूर शास्त्री चौक, नगरपालिका चावडी चौक, जुना कटारिया बाजारपेठ, तेलीखुंट आणि नेहरू चौक अशा विविध मार्गांवरून मार्गस्थ होत पुन्हा मोठ्या मारुती मंदिराजवळ आली. संपूर्ण मार्गावर भाविकांकडून हनुमानाच्या जयघोषाने परिसर दुमदुमून गेला होता. मिरवणुकीच्या यशस्वी आयोजनासाठी श्रीराम नवमी व हनुमान जयंती उत्सव समितीचे अध्यक्ष सोमनाथ पराई आणि उपाध्यक्ष कमलाकर भालेकर आदी मान्यवरांनी विशेष परिश्रम घेतले.
मिरवणूक अत्यंत शांततेत आणि शिस्तबद्ध पद्धतीने पार पडण्यासाठी पोलीस उपाधीक्षक डॉ. कुणाल सोनावणे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक समीर बारवकर यांनी चोख पोलीस बंदोबस्त तैनात केला होता.

विशेष पोलिस महानिरीक्षक श्री दत्तात्रेय कराळे साहेब नाशिक यांनी संगमनेर येथील पारंपारिक रथ उत्सवाला हजेरी लावली होती.

📌 संगमनेरची ही परंपरा केवळ एक धार्मिक विधी नसून ती स्त्रीशक्ती, धैर्य आणि एकजुटीचे प्रतीक आहे. हनुमान जयंतीनिमित्त महिलांनी मोठ्या श्रद्धेने आणि उत्साहाने रथ ओढण्याची ही परंपरा आपल्या संस्कृतीची अभिमानास्पद ओळख असून, महिलांचा हा वाढता सहभाग समाजात निश्चितच सकारात्मक परिवर्तन घडवणारा आहे. हीच एकजूट आणि श्रद्धा पुढील पिढ्यांपर्यंत अखंडपणे पोहोचत राहावी, हीच अपेक्षा. डॉ. मैथिली तांबे, नगराध्यक्ष.

anantpangarkar
Annant Ppangarkar

Views: 520
हनुमान जयंती हनुमान जयंती रथोत्सव
Share. Facebook Twitter Pinterest WhatsApp
Annant Ppangarkar
  • Website

Related Posts

माझं गाव माझा अभिमान… राजापूर

14/10/2026

संगमनेर ड्रग्ज प्रकरणातील सत्य जनतेसमोर आणा; सोशल मीडियावरील ‘मीडिया ट्रायल’ त्वरित थांबवा! — काँग्रेस कार्याध्यक्ष अमोल शेलकर यांचे पोलीस प्रशासनाला आवाहन; वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी संयुक्त पत्रकार परिषद घेऊन पारदर्शक चौकशीचे पुरावे मांडण्याची मागणी

24/09/2026

संगमनेर शहरात वाहतूक कोंडीचा बोजवारा: बेशिस्त रिक्षाचालक, फुटपाथवरील अतिक्रमणे अन् अवैध पार्किंगमुळे नागरिक त्रस्त; पोलीस प्रशासन ढिम्म

24/09/2026
Leave A Reply Cancel Reply

Document
Our Picks
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
Advertisement 1 Advertisement 2 Advertisement 3 Advertisement 4
Don't Miss
पुरस्कार

‘ब्रिक्स’ आंतरराष्ट्रीय महोत्सवात संगमनेरी योगवैभव! अहमदाबादेत ध्रुव ग्लोबलच्या १० खेळाडूंनी घडवले योगपरंपरेचे दर्शन

By Annant Ppangarkar15/10/20260

महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन- केंद्रीय युवा व्यवहार व क्रीडा मंत्रालय आणि गुजरात सरकारच्या संयुक्त विद्यमाने…

१९७२ पेक्षा भयावह दुष्काळ; राजकारण बाजूला ठेवून जनतेला दिलासा द्या, मागेल त्याला पिण्याच्या पाण्याचे टँकर द्या – सत्यजित तांबे यांचे अधिकाऱ्यांना निर्देश

15/10/2026

गुरुवार, १५ ऑक्टोंबर — आजचा दिवस कसा असेल जाणून घ्या!

15/10/2026

संगमनेरच्या बाजारपेठेला मोठा दिलासा, दुष्काळाच्या संकटातही थोरात कारखान्याचा मोठा निर्णय; कामगारांना मिळणार इतका बोनस अन् सानुग्रह अनुदान; ऊस उत्पादकांना प्रतिटन एवढी मदत! लोकनेते बाळासाहेब थोरात यांची घोषणा

14/10/2026
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow

तुमचे हक्काचे व्यासपीठ

Facebook YouTube
Our Picks
October 2026
M T W T F S S
 1234
567891011
12131415161718
19202122232425
262728293031  
« Sep    
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • पत्रकारिता
  • फोटो / गॅलरी
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
  • शेती व सहकार
  • सामाजिक
  • CONTACT US
  • ABOUT US
  • PRIVACY POLICY
© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.