Close Menu
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
What's Hot

आज शनिवार, २९ ऑगस्ट २०२६ — तुमचा आजचा दिवस कसा असेल, जाणून घ्या

29/08/2026

अहिल्यानगरमध्ये वकिलाच्या हत्येप्रकरणी ७ आरोपींना मरेपर्यंत जन्मठेप; जिल्हा न्यायालयाचा मोठा निकाल

28/08/2026

नेपाळमधील महाप्रलयात संगमनेरचे ४५ पर्यटक सुखरूप; उंच ठिकाणावर असल्याने टळला मोठा अनर्थ, आज लुंबिनीतून निघून उद्या भारतात परतणार!

28/08/2026
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
Home » ३३ केव्ही विद्युत वाहिनीच्या विरोधात गावकरी आक्रमक; धोकादायक वाहिनी न हटवल्यास आत्मदहनाचा इशारा
आंदोलन

३३ केव्ही विद्युत वाहिनीच्या विरोधात गावकरी आक्रमक; धोकादायक वाहिनी न हटवल्यास आत्मदहनाचा इशारा

चिखली येथे मोठे आंदोलनही उभारले होते. त्या वेळी महावितरणच्या अभियंत्यांनी १५ दिवसांची मुदत मागूनही ठोस कार्यवाही केलेली नाही.
Annant PpangarkarBy Annant Ppangarkar02/04/2026No Comments2 Mins Read
Facebook Twitter WhatsApp
Share
Facebook Twitter Email Telegram WhatsApp

अहिल्यानगर, विशेष प्रतिनिधी
संगमनेर १३२ केव्ही सबस्टेशन ते धांदरफळ दरम्यान टाकण्यात आलेली ३३ केव्ही उच्चदाब विद्युत वाहिनी अत्यंत धोकादायक आणि बेकायदेशीर असल्याची तक्रार करत, बाधित गावकऱ्यांनी थेट जिल्हाधिकाऱ्यांकडे धाव घेतली आहे. ही वाहिनी तातडीने सुरक्षित ठिकाणी न हलवल्यास जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आत्मदहन करण्याचा इशारा राम अरगडे, सतीश खताळ, अरुण चव्हाण आणि योगेश सातपुते यांच्यासह बाधित गावकऱ्यांनी दिला आहे.
निवेदनात नमूद केल्यानुसार, गेल्या दीड वर्षांपासून संगमनेर शहर, गुंजाळवाडी, राजापूर, मंगळापूर, चिखली आणि धांदरफळ या गावातील नागरिक या अन्यायाविरुद्ध संघर्ष करत आहेत. महावितरणने सुरुवातीला ही वाहिनी संगमनेर ते वाडापूर सबस्टेशनला जोडली जाणार असल्याचे सांगून दिशाभूल केली, मात्र प्रत्यक्षात ती चिखलीकडून धांदरफळच्या दिशेने खाजगी जागेतून नेण्यात आली आहे. प्रशासनाने या कामात हुकूमशाही गाजवून पोलिसांच्या बळाचा वापर करत गावकऱ्यांचा विरोध मोडून काढला आहे.
या कामाबाबत अनेक गंभीर तांत्रिक आणि कायदेशीर त्रुटी समोर येत आहेत. प्रधानमंत्री ग्राम सडक योजना आणि एमएसआरडीसीच्या कार्यक्षेत्रातील रस्त्यांचे मोजमाप न करताच हे काम पूर्ण करण्यात आले आहे. विशेष म्हणजे, कोल्हार-घोटी या एमएसआरडीसीच्या रस्त्यालगत संगमनेर शहराला पाणीपुरवठा करणारी निळवंडे जलवाहिनी आहे. 
याच जलवाहिनीवर ३३ केव्हीचे विद्युत पोल धोकादायक पद्धतीने उभारले असून, यामुळे भविष्यात मोठी दुर्घटना घडण्याची भीती व्यक्त केली जात आहे. संगमनेर नगर परिषदेच्या मुख्याधिकाऱ्यांनी याबाबत महावितरणच्या अभियंत्यांशी दोनदा पत्रव्यवहार करूनही प्रशासनाकडून याकडे पद्धतशीरपणे दुर्लक्ष केले जात आहे.
बाधित गावातील ग्रामपंचायतींनी ग्रामसभेत ठराव घेऊन या कामाला अधिकृतपणे विरोध दर्शविला आहे. याप्रश्नी गावकऱ्यांनी महावितरण कार्यालयासमोर पाच दिवस उपोषण केले होते, तर चिखली येथे मोठे आंदोलनही उभारले होते. त्या वेळी महावितरणच्या अभियंत्यांनी १५ दिवसांची मुदत मागूनही ठोस कार्यवाही केलेली नाही. 
जिल्हाधिकारी यांनी स्वतः दोनदा पत्रव्यवहार करूनही अद्याप या वाहिनीचे तांत्रिक सर्वेक्षण करण्यात आलेले नाही. प्रशासनाच्या या उदासीनतेमुळे संतप्त झालेल्या गावकऱ्यांनी आता थेट आत्मदहनाचा इशारा दिला असून, न्याय न मिळाल्यास तीव्र आंदोलनाचा पवित्रा घेतला आहे. आता जिल्हा प्रशासन या गंभीर विषयावर काय भूमिका घेते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

anantpangarkar
Annant Ppangarkar

Post Views: 832
33 केव्ही उच्चदाब ओव्हरहेड वीज वाहिनी चिखली जिल्हाधिकारी निवेदन
Share. Facebook Twitter Pinterest WhatsApp
Annant Ppangarkar
  • Website

Related Posts

एमआयडीसीच्या जागेवर सौर प्रकल्प चालणार नाही! कौठे मलकापूर येथे भाजपचे आक्रमक आंदोलन; भोसले यांच्यासह पदाधिकाऱ्यांना पोलिसांनी घेतले ताब्यात

19/08/2026

संगमनेर येथे आदिवासी विद्यार्थ्यांचे अर्धनग्न धरणे आंदोलन सुरुच; जयश्री थोरात यांची आंदोलनस्थळी भेट

17/08/2026

बिरेवाडीत पोल्ट्री शेडवर कारवाईसाठी ग्रामपंचायत कार्यालयासमोर उपोषण सुरु; मांडवे-बिरेवाडी हद्दीतील तीन पोल्ट्रीचा वाद पेटला

14/08/2026
Leave A Reply Cancel Reply

Document
Our Picks
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
Advertisement 1 Advertisement 2 Advertisement 3 Advertisement 4
Don't Miss
राशिभविष्य

आज शनिवार, २९ ऑगस्ट २०२६ — तुमचा आजचा दिवस कसा असेल, जाणून घ्या

By Annant Ppangarkar29/08/20260

आजचे राशिभविष्य मेष- आजचा दिवस तुमच्यासाठी अत्यंत उत्साहवर्धक आणि नवीन संधी घेऊन येणारा ठरेल. कार्यक्षेत्रात…

अहिल्यानगरमध्ये वकिलाच्या हत्येप्रकरणी ७ आरोपींना मरेपर्यंत जन्मठेप; जिल्हा न्यायालयाचा मोठा निकाल

28/08/2026

नेपाळमधील महाप्रलयात संगमनेरचे ४५ पर्यटक सुखरूप; उंच ठिकाणावर असल्याने टळला मोठा अनर्थ, आज लुंबिनीतून निघून उद्या भारतात परतणार!

28/08/2026

संगमनेरकरांच्या अभिप्रेत असलेलेच छत्रपती शिवाजी महाराजांचे भव्य-दिव्य स्मारक उभारणार! “दीड वर्षे खाती हातात असूनही वाढीव जागेचा प्रश्न सोडवला नाही; आता स्मारकाच्या कामात खोडा घालून संगमनेरकरांची दिशाभूल करू नका”

28/08/2026
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow

तुमचे हक्काचे व्यासपीठ

Facebook YouTube
Our Picks
August 2026
M T W T F S S
 12
3456789
10111213141516
17181920212223
24252627282930
31  
« Jul    
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • पत्रकारिता
  • फोटो / गॅलरी
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
  • शेती व सहकार
  • सामाजिक
  • CONTACT US
  • ABOUT US
  • PRIVACY POLICY
© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.