Close Menu
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
What's Hot

नाशिक-पुणे रेल्वेसाठी ९ ऑगस्टला महामार्गावर चक्काजाम; आमदार सत्यजीत तांबे यांच्याकडून जनआंदोलनाची हाक

July 31, 2026

आज, शुक्रवार ३१ जुलै २०२६ – कसा असेल तुमचा आजचा दिवस जाणून घ्या

July 31, 2026

संगमनेरमध्ये ‘छत्रपती शिवाजी महाराजस्व अभियान’ अंतर्गत तालुकास्तरीय शिबिर; मालपाणी लॉन्सवर विविध लाभांचे होणार वाटप

July 30, 2026
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
Home » संगमनेरमध्ये दारूच्या दुकानात तोडफोड आणि दुकानदाराला धमकी; १२ जणांविरुद्ध गुन्हा दाखल
गुन्हेगारी

संगमनेरमध्ये दारूच्या दुकानात तोडफोड आणि दुकानदाराला धमकी; १२ जणांविरुद्ध गुन्हा दाखल

या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस कॉन्स्टेबल संगीता शिवाजी कोकणे करत आहेत.
अनंत पांगारकरBy अनंत पांगारकरApril 4, 2026No Comments2 Mins Read
Facebook Twitter WhatsApp
Share
Facebook Twitter Email Telegram WhatsApp

महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन, संगमनेर
समनापूर येथे दारूच्या दुकानात घुसून तोडफोड केल्याप्रकरणी आणि दुकानदाराला जीवे मारण्याची धमकी दिल्याप्रकरणी १२ जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना गुरुवारी (२ एप्रिल) सकाळी ११ ते १२ च्या सुमारास घडली. या प्रकरणी दिनेश मुरलीधर मिलाने यांनी संगमनेर शहर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
फिर्यादी दिनेश मिलाने हे हॉटेल व्यावसायिक असून समनापूर गावात त्यांचे सरकारमान्य देशी दारूचे दुकान आहे. घटनेच्या दिवशी आरोपी देवा शेरमाळे आणि वंदना शेरमाळे यांनी दुकानात येऊन तेथे दारूचा व्यवसाय करू नये, असे म्हणत दुकानातील कामगार संतोष रावसाहेब गवळी याला शिवीगाळ केली.
त्यानंतर संतोष यांनी घटनेची माहिती दुकानमालक दिनेश मिलाने यांना दिली. दिनेश मिलाने घटनास्थळी पोहोचले असता, तिथे देवा शेरमाळे, वंदना शेरमाळे, रियाज सिराज शेख, रियाजची पत्नी, रियाजची आई, राजु आबु शेख, माम्या शेरमाळे, बंडू इनामदार, संतोष शेरमाळे, प्रविण गायकवाड, संदीप दळवी आणि योगेश नवनाथ आव्हाड हे सर्वजण एकत्र आले.
आरोपींनी दुकानातील कामगाराला शिवीगाळ करत दुकानातील दारूचे बॉक्स आणि ग्लास फोडून मोठे नुकसान केले. तसेच, दुकानातील सीसीटीव्ही कॅमेरे आणि डीव्हीआर तोडून टाकले. यावेळी दिनेश मिलाने यांनी आरोपींना समजावण्याचा प्रयत्न केला असता, त्यांनाही शिवीगाळ करण्यात आली. यापुढे दुकान चालवायचे नाही, अशी धमकी देत आरोपींनी दुकानाचे शटर बंद करून कुलूप लावले आणि तेथून निघून गेले.
दिनेश मिलाने यांच्या तक्रारीवरून पोलिसांनी भारतीय न्याय संहिताच्या विविध कलमान्वये गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस कॉन्स्टेबल संगीता शिवाजी कोकणे करत आहेत.

anantpangarkar
अनंत पांगारकर

Post Views: 1,484
तोडफोड देशी दारू दुकान धमकी
Share. Facebook Twitter Pinterest WhatsApp
अनंत पांगारकर
  • Website

Related Posts

संगमनेर तालुक्यात लपून-छपून उरकला बालविवाह; ५ जणांवर घारगाव पोलिसांत गुन्हा

July 30, 2026

कचरा वेचण्याच्या बहाण्याने ‘रेकी’; बंद घरे गाठून घरफोडी करणाऱ्या दोन महिला जेरबंद

July 25, 2026

संघटित गुन्हेगारीविरोधात मोठे पाऊल; गोवंश तस्करीप्रकरणी ‘बीएनएस’ कलम १११ अन्वये दोघांवर पहिली मोठी कारवाई संगमनेरात

July 24, 2026
Leave A Reply Cancel Reply

Document
Our Picks
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
Advertisement 1 Advertisement 2 Advertisement 3 Advertisement 4
Don't Miss
आंदोलन

नाशिक-पुणे रेल्वेसाठी ९ ऑगस्टला महामार्गावर चक्काजाम; आमदार सत्यजीत तांबे यांच्याकडून जनआंदोलनाची हाक

By अनंत पांगारकरJuly 31, 20260

महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन संगमनेर: नाशिक – पुणे सरळ रेल्वे मार्गाच्या मागणीचा लढा आता एका…

आज, शुक्रवार ३१ जुलै २०२६ – कसा असेल तुमचा आजचा दिवस जाणून घ्या

July 31, 2026

संगमनेरमध्ये ‘छत्रपती शिवाजी महाराजस्व अभियान’ अंतर्गत तालुकास्तरीय शिबिर; मालपाणी लॉन्सवर विविध लाभांचे होणार वाटप

July 30, 2026

आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून संगमनेरकर अजिंक्य राहाणेची निवृत्ती; भावुक होत व्यक्त केला कृतज्ञता भाव

July 30, 2026
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow

तुमचे हक्काचे व्यासपीठ

Facebook YouTube
Our Picks
July 2026
M T W T F S S
 12345
6789101112
13141516171819
20212223242526
2728293031  
« Jun    
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • पत्रकारिता
  • फोटो / गॅलरी
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
  • शेती व सहकार
  • सामाजिक
  • CONTACT US
  • ABOUT US
  • PRIVACY POLICY
© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.