Close Menu
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
What's Hot

माजी मंत्री बाळासाहेब थोरात व आमदार सत्यजित तांबे यांच्या निवासस्थानी गणरायाचे आगमन; पर्यावरणपूरक व त्रासमुक्त गणेशोत्सवाचे आवाहन

14/09/2026

मोठी कारवाई: तीन कुंटणखान्यांवर छापे, ८ महिलांची सुटका; तिघांवर गुन्हे दाखल

14/09/2026

संगमनेरमध्ये १७ ते २० सप्टेंबरदरम्यान अमृत उद्योग समूहातील सहकारी संस्थांच्या वार्षिक सर्वसाधारण सभा; माजी मंत्री बाळासाहेब थोरात, माजी आमदार डॉ. सुधीर तांबे यांची मुख्य उपस्थिती

14/09/2026
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
Home » नाशिकमध्ये पुन्हा खळबळ: भोंदू खरात सारखेच प्रकरण समोर, ऑफिसबॉयच्या चोरीतून पत्रकाराचे काळे कारनामे उघड
गुन्हेगारी

नाशिकमध्ये पुन्हा खळबळ: भोंदू खरात सारखेच प्रकरण समोर, ऑफिसबॉयच्या चोरीतून पत्रकाराचे काळे कारनामे उघड

अटकेनंतर पोलिसांनी जप्त केलेली हार्ड डिस्क, दोन पेनड्राइव्ह आणि मोबाईल यांची तपासणी केली असता, अधिकार्‍यांना धक्काच बसला. त्यात २००३ ते २०२४ या काळात विविध महिलांचे पन्नासपेक्षा जास्त अश्लील व्हिडिओ आढळून आले.
Annant PpangarkarBy Annant Ppangarkar04/04/2026No Comments3 Mins Read
Facebook Twitter WhatsApp
Share
Facebook Twitter Email Telegram WhatsApp

महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन, ​नाशिक
नाशिकमधील सातपूर परिसरात एका धक्कादायक घटनेत एका प्रथितयश पत्रकाराचा खरा चेहरा समोर आला असून, त्याने गेल्या दोन दशकांपासून अनेक गरीब महिलांचे लैंगिक शोषण केल्याचे उघड झाले आहे. खंडणी प्रकरणातील फिर्यादीच आरोपी म्हणून समोर आल्याने मोठी खळबळ उडाली आहे.
​रवींद्र एरंडे (वय ६३) असे या संशयित पत्रकाराचे नाव असून, तो एका साप्ताहिक आणि यूट्यूब चॅनेलशी संबंधित आहे. एरंडे हा सातपूर भागातील कामगारनगर आणि श्रमिकनगरमध्ये लघू उद्योगांसाठी ‘कन्सल्टंट’ म्हणून काम करत असे. लघू उद्योग सुरू करून देण्याचे आमिष दाखवून त्याने सन २००३ ते २०२४ या २१ वर्षांच्या काळात अनेक गरीब महिलांना आपल्या जाळ्यात ओढले. या महिलांच्या हतबलतेचा फायदा घेत, त्याने त्यांचे लैंगिक शोषण केले आणि आपल्या सातपूर कॉलनीतील नीळकंठेश्वर नगरातील कार्यालयात लपून छपून त्याचे चित्रीकरण केले. हे अश्लील व्हिडिओ त्याने एका खासगी टॅब आणि हार्ड डिस्कमध्ये पीडित महिलांच्या नावे स्वतंत्र फोल्डर करून जतन केले होते.
​या संपूर्ण प्रकरणाचा भंडाफोड त्याच्याच कार्यालयातील आकाश बकरे या ऑफिसबॉयने केला. बकरे याला संपादकाच्या या कृत्याचा सुगावा लागला होता. त्याने संधी साधून कार्यालयातून तो टॅब आणि हार्ड डिस्क चोरली. त्यामध्ये पन्नासपेक्षा जास्त अश्लील व्हिडिओ असल्याचे पाहून आकाशने आपल्या तीन मित्रांच्या मदतीने एरंडेला ब्लॅकमेल करण्यास सुरुवात केली. व्हिडिओ व्हायरल न करण्याच्या बदल्यात त्यांनी १२ लाख रुपयांच्या खंडणीची मागणी केली.
या धाकाने घाबरलेल्या एरंडेने सुरुवातीला १० हजार रुपये दिले, मात्र पैशांची मागणी वाढू लागली. वारंवार होणाऱ्या ब्लॅकमेलिंगला कंटाळून आणि आपली बदनामी होईल या भीतीने, एरंडेने २ एप्रिल २०२६ रोजी सातपूर पोलीस ठाण्यात धाव घेतली आणि टॅब व हार्ड डिस्क चोरीची तसेच खंडणीची फिर्याद नोंदवली.
​पोलिसांनी या तक्रारीची दखल घेत तातडीने तपास सुरू केला. पोलीस आयुक्त संदीप कर्णिक आणि झोन दोनचे उपायुक्त किशोर काळे यांनी प्रकरणाचे गांभीर्य ओळखून सातपूरचे वरिष्ठ निरीक्षक प्रकाश अहिरे आणि गुन्हे शाखा युनिट दोनच्या पथकाला तपासाचे आदेश दिले.
पोलिसांनी तांत्रिक विश्लेषण करून संशयितांचा माग काढला आणि गुरुवारी (दि. २) आडगाव शिवारातील दहावा मैल परिसरातून आकाश पुंडलिक बकरे (२८, रा. सातपूर), प्रकाश रामदास पानपाटील (२५, रा. सातपूर कॉलनी), सुरज सुनील गवई (२७, रा. सातपूर) आणि श्रीपत भीमराव शिंदे (३८, रा. त्र्यंबकेश्वर) या चौघांना अटक केली.
​या अटकेनंतर पोलिसांनी जप्त केलेली हार्ड डिस्क, दोन पेनड्राइव्ह आणि मोबाईल यांची तपासणी केली असता, अधिकार्‍यांना धक्काच बसला. त्यात २००३ ते २०२४ या काळात विविध महिलांचे पन्नासपेक्षा जास्त अश्लील व्हिडिओ आढळून आले.
त्यानंतर, पीडित महिलेने दिलेल्या फिर्यादीनुसार, सरकारी नोकरी लावण्याचे आमिष दाखवून विविध हॉटेल्सवर नेऊन लैंगिक शोषण केल्याची बाब समोर आली. या गंभीर प्रकरणाची दखल घेत सातपूर पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा नोंदविण्यात आला.
​पोलिस उपायुक्त किशोर काळे यांनी या प्रकरणावर माहिती देताना सांगितले की, संशयिताकडून हस्तगत केलेल्या डेटावरून संपूर्ण प्रकरणाचे गांभीर्य स्पष्ट होत आहे. जेवढ्या महिला या संशयिताच्या शोषणाला बळी पडल्या आहेत, त्यांनी न घाबरता तक्रार देण्यासाठी पुढे यावे. पीडित महिलांची ओळख पोलीस पूर्णपणे गोपनीय ठेवतील. सध्या या प्रकरणाचा सखोल तपास सुरू असून, दोषींवर कठोर कारवाई केली जाईल, असे आश्वासनही त्यांनी दिले आहे.

anantpangarkar
Annant Ppangarkar

Post Views: 1,215
अशोक खरात रवींद्र एरंडे
Share. Facebook Twitter Pinterest WhatsApp
Annant Ppangarkar
  • Website

Related Posts

मोठी कारवाई: तीन कुंटणखान्यांवर छापे, ८ महिलांची सुटका; तिघांवर गुन्हे दाखल

14/09/2026

समृद्धी महामार्गावर चाकूचा धाक दाखवून दरोडा टाकणाऱ्या सराईत टोळीचा पर्दाफाश; स्थानिक गुन्हे शाखेकडून चार आरोपींना अटक, एक लाख दोन हजारांचा मुद्देमाल जप्त

12/09/2026

चार अवैध कत्तलखान्यांवर एलसीबीचे छापे, १०५० किलो गोमांसासह ९ जनावरांची सुटका

12/09/2026
Leave A Reply Cancel Reply

Document
Our Picks
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
Advertisement 1 Advertisement 2 Advertisement 3 Advertisement 4
Don't Miss
धार्मिक

माजी मंत्री बाळासाहेब थोरात व आमदार सत्यजित तांबे यांच्या निवासस्थानी गणरायाचे आगमन; पर्यावरणपूरक व त्रासमुक्त गणेशोत्सवाचे आवाहन

By Annant Ppangarkar14/09/20260

Annant Ppangarkar महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन – राज्याचे माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांच्या ‘सुदर्शन’ निवासस्थानी…

मोठी कारवाई: तीन कुंटणखान्यांवर छापे, ८ महिलांची सुटका; तिघांवर गुन्हे दाखल

14/09/2026

संगमनेरमध्ये १७ ते २० सप्टेंबरदरम्यान अमृत उद्योग समूहातील सहकारी संस्थांच्या वार्षिक सर्वसाधारण सभा; माजी मंत्री बाळासाहेब थोरात, माजी आमदार डॉ. सुधीर तांबे यांची मुख्य उपस्थिती

14/09/2026

सोमवार १४ सप्टेंबर; जाणून घ्या आजचे राशिभविष्य

14/09/2026
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow

तुमचे हक्काचे व्यासपीठ

Facebook YouTube
Our Picks
September 2026
M T W T F S S
 123456
78910111213
14151617181920
21222324252627
282930  
« Aug    
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • पत्रकारिता
  • फोटो / गॅलरी
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
  • शेती व सहकार
  • सामाजिक
  • CONTACT US
  • ABOUT US
  • PRIVACY POLICY
© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.