Close Menu
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
What's Hot

कर्ज वसुलीच्या नावाखाली संगमनेरात महिलेचा विनयभंग; आरोपीवर गुन्हा दाखल

15/10/2026

‘ब्रिक्स’ आंतरराष्ट्रीय महोत्सवात संगमनेरी योगवैभव! अहमदाबादेत ध्रुव ग्लोबलच्या १० खेळाडूंनी घडवले योगपरंपरेचे दर्शन

15/10/2026

१९७२ पेक्षा भयावह दुष्काळ; राजकारण बाजूला ठेवून जनतेला दिलासा द्या, मागेल त्याला पिण्याच्या पाण्याचे टँकर द्या – सत्यजित तांबे यांचे अधिकाऱ्यांना निर्देश

15/10/2026
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
Home » ॲसिड हल्ला पीडितेच्या पाठीशी शासन खंबीर; सर्व उपचारांचा खर्च उचलण्याची मंत्री आदिती तटकरे यांची ग्वाही
महाराष्ट्र संवाद विशेष

ॲसिड हल्ला पीडितेच्या पाठीशी शासन खंबीर; सर्व उपचारांचा खर्च उचलण्याची मंत्री आदिती तटकरे यांची ग्वाही

आमदार काशिनाथ दाते, आमदार अमोल खताळ, जिल्हा पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे, अपर पोलीस अधीक्षक सोमनाथ वाकचौरे आणि जिल्हा महिला व बालविकास अधिकारी संजय कदम आदी मान्यवर उपस्थित होते.
Annant PpangarkarBy Annant Ppangarkar05/04/2026No Comments2 Mins Read
Facebook Twitter WhatsApp
Share
Facebook Twitter Email Telegram WhatsApp

महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन, शिर्डी
संगमनेर तालुक्यातील वडगावपान येथील ॲसिड हल्ला प्रकरणातील पीडित मुलीची महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी रविवारी लोणी येथील प्रवरा रुग्णालयात जाऊन भेट घेतली. या निंदनीय घटनेतील पीडितेच्या पाठीशी शासन पूर्ण ताकदीने उभे असून, तिच्या पुढील उपचारांचा संपूर्ण खर्च शासन करणार असल्याची स्पष्ट ग्वाही त्यांनी दिली.
रुग्णालयात उपचार घेत असलेल्या या मुलीची प्रकृती सध्या स्थिर असल्याचे डॉक्टरांनी सांगितले आहे. मात्र, तिचे वय लहान असल्याने आणि त्वचा संवेदनशील असल्याने तिला आणखी काही दिवस विशेष उपचारांची तसेच एका शस्त्रक्रियेची आवश्यकता आहे.
प्रशासनाकडून तिची उत्तम काळजी घेतली जात असून, विशेष समुपदेशकाद्वारे तिचे समुपदेशन करण्यात आले आहे. हे समुपदेशन स्थानिक डॉक्टरांच्या मदतीने पुढेही प्रभावीपणे सुरू ठेवण्याबाबत मंत्री तटकरे यांनी सूचना दिल्या आहेत.
पीडितेच्या कुटुंबावर उपचारांचा कोणताही आर्थिक भार पडू नये, यासाठी पालकमंत्री डॉ. राधाकृष्ण विखे-पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली शासन सर्वतोपरी मदत करत आहे. यामध्ये महिला व बालविकास विभागाच्या ‘मनोधैर्य’ योजनेअंतर्गत पीडितेस एक लाख रुपयांचे आर्थिक साहाय्य तत्काळ दिले जाणार आहे. तसेच, न्याय विभागाच्या ‘व्हिक्टिम कॉम्पेन्सेशन स्कीम २०२२’ अंतर्गत पीडितेच्या कुटुंबाला तातडीची मदत म्हणून ३ लाख रुपयांचा निधी आधीच वितरित करण्यात आला आहे.
या प्रकरणाच्या तपासाबाबत माहिती देताना मंत्री तटकरे यांनी सांगितले की, आपण घटनेच्या दिवसापासूनच पोलीस अधीक्षकांच्या संपर्कात आहोत. स्थानिक लोकप्रतिनिधींनीही हा प्रश्न सभागृहात लावून धरला होता. सध्या आरोपीचा शोध घेण्यासाठी पोलिसांकडून युद्धपातळीवर तपास सुरू असून, त्यासाठी विविध यंत्रणांची मदत घेतली जात आहे. कुटुंबाकडे या प्रकरणाबाबत काही विशेष माहिती असल्यास त्यांनी ती पोलिसांना द्यावी, तसेच त्यांच्या काही अन्य मागण्या असल्यास त्या मांडाव्यात, असे आवाहनही त्यांनी या वेळी केले.
या सांत्वनपर भेटीच्या वेळी पीडित मुलीची आई, मावशी व मामा उपस्थित होते. त्यांच्यासोबत आमदार काशिनाथ दाते, आमदार अमोल खताळ, जिल्हा पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे, अपर पोलीस अधीक्षक सोमनाथ वाकचौरे आणि जिल्हा महिला व बालविकास अधिकारी संजय कदम आदी मान्यवर उपस्थित होते.

anantpangarkar
Annant Ppangarkar

Views: 1,183
अमोल खताळ अल्पवयीन मुलीवर ॲसिड हल्ला आदिती तटकरे काशिनाथ दाते प्रवरा रुग्णालय भेट
Share. Facebook Twitter Pinterest WhatsApp
Annant Ppangarkar
  • Website

Related Posts

नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना आर्थिक मदत कधी मिळणार? आमदार अमोल खताळांनी दिली ही माहिती

13/10/2026

संगमनेर आगारात आणखी पाच इलेक्ट्रिक शिवाई बसेस; जिल्ह्यांतर्गत मार्गांवर धावणार

12/10/2026

कौठे मलकापूर येथेच एमआयडीसी होणार; प्रस्तावित जागेची आमदार अमोल खताळ यांनी केली पाहणी

12/10/2026
Leave A Reply Cancel Reply

Document
Our Picks
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
Advertisement 1 Advertisement 2 Advertisement 3 Advertisement 4
Don't Miss
गुन्हेगारी

कर्ज वसुलीच्या नावाखाली संगमनेरात महिलेचा विनयभंग; आरोपीवर गुन्हा दाखल

By Annant Ppangarkar15/10/20260

महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन- खाजगी बँकेच्या कर्जाचा हप्ता भरण्यासाठी सतत फोन करून धमकावणे, घरी येऊन…

‘ब्रिक्स’ आंतरराष्ट्रीय महोत्सवात संगमनेरी योगवैभव! अहमदाबादेत ध्रुव ग्लोबलच्या १० खेळाडूंनी घडवले योगपरंपरेचे दर्शन

15/10/2026

१९७२ पेक्षा भयावह दुष्काळ; राजकारण बाजूला ठेवून जनतेला दिलासा द्या, मागेल त्याला पिण्याच्या पाण्याचे टँकर द्या – सत्यजित तांबे यांचे अधिकाऱ्यांना निर्देश

15/10/2026

गुरुवार, १५ ऑक्टोंबर — आजचा दिवस कसा असेल जाणून घ्या!

15/10/2026
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow

तुमचे हक्काचे व्यासपीठ

Facebook YouTube
Our Picks
October 2026
M T W T F S S
 1234
567891011
12131415161718
19202122232425
262728293031  
« Sep    
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • पत्रकारिता
  • फोटो / गॅलरी
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
  • शेती व सहकार
  • सामाजिक
  • CONTACT US
  • ABOUT US
  • PRIVACY POLICY
© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.