Close Menu
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
What's Hot

दसरा विशेष: संगमनेरच्या मालपाणी पार्कमध्ये होणाऱ्या ‘या’ खास सोहळ्याचे संपूर्ण वेळापत्रक आणि प्रमुख आकर्षणे एका क्लिकवर!

16/10/2026

२ वर्षे २ महिने तुरुंगवास अन् अखेर न्याय! पोक्सो खटल्यातून संगमनेरच्या तरुणाची सुटका; न्यायालयाचा ‘हा’ महत्त्वाचा निर्णय

16/10/2026

वय विसरले अन् झिंगाटवर थिरकले! ४० वर्षांनंतर भेटले सेवानिवृत्त शिक्षक मित्र; भंडारदऱ्यातील भाऊक ‘गेट-टुगेदर’ची खास बातमी

16/10/2026
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
Home » बिबट्याचा धुमाकूळ: तिघे गंभीर जखमी, उपचारासाठी अहिल्यानगरला हलविले; नागरिकांमध्ये दहशतीचे वातावरण
महाराष्ट्र संवाद विशेष

बिबट्याचा धुमाकूळ: तिघे गंभीर जखमी, उपचारासाठी अहिल्यानगरला हलविले; नागरिकांमध्ये दहशतीचे वातावरण

याआधीही या परिसरात बिबट्याने अनेकदा पशुधनावर आणि माणसांवर हल्ले केले आहेत. वारंवार होणाऱ्या या हल्ल्यांमुळे ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण असून, वनविभागाने या बिबट्याचा त्वरित बंदोबस्त करावा आणि परिसरात पिंजरा लावून त्याला जेरबंद करावे, अशी आग्रही मागणी आता जोर धरू लागली आहे
Annant PpangarkarBy Annant Ppangarkar06/04/2026No Comments2 Mins Read
Facebook Twitter WhatsApp
(संग्रह छायाचित्र)
Share
Facebook Twitter Email Telegram WhatsApp

महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन | संगमनेर
संगमनेर तालुक्यातील उंबरी बाळापूर शिवारात रविवारी (दि. ५) सायंकाळच्या सुमारास बिबट्याने अत्यंत हिंसक पवित्रा घेत तिघांवर प्राणघातक हल्ले केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या एकापाठोपाठ झालेल्या दोन हल्ल्यांमध्ये दुचाकीस्वार तरुण आणि एका डॉक्टरांना गंभीर दुखापत झाली असून, या घटनेने संपूर्ण परिसरात मोठी खळबळ उडाली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, रविवारी सायंकाळी ७:४५ च्या सुमारास अभिषेक केशव खेमनर (वय ३४) आणि सार्थक सुनील खेमनर (वय १७) हे दोघे दुचाकीवरून लेंडी नाल्याजवळून जात असताना तेथे दबा धरून बसलेल्या बिबट्याने त्यांच्यावर अचानक जीवघेणा हल्ला चढवला. 
या अनपेक्षित आक्रमणामुळे दोघांनीही मदतीसाठी मोठा आरडाओरडा सुरू केला. त्यांचा आवाज ऐकताच बापूसाहेब निर्मळ, संदीप भुसाळ, विलास निर्मळ, सोमनाथ शिंदे, सचिन शिंदे, पप्पू होडगर आणि पप्पू निर्मळ हे स्थानिक ग्रामस्थ तातडीने मदतीसाठी धावून आले. नागरिकांची धावपळ आणि आरडाओरडा पाहून बिबट्याने तेथून जवळच असलेल्या शेतात पळ काढला.
या घटनेची भीषणता ओसरते न ओसरते तोच काही वेळातच उंबरी येथील रहिवासी असलेले डॉ. मारुती उंबरकर (वय ५२) हे आपल्या घरी जात असताना बिबट्याने त्यांच्यावरही हल्ला केला. या हल्ल्यात डॉ. उंबरकर गंभीर जखमी झाले. बिबट्याने केलेल्या या दोन्ही हल्ल्यांमध्ये तिघांच्याही पायाला आणि मांडीला गंभीर जखमा झाल्या आहेत. स्थानिकांनी तत्काळ तिन्ही जखमींना निमगाव जाळी येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल केले. तिथे डॉ. तय्यब तांबोळी, आरोग्य सेविका वैशाली ठुबे, आरोग्य सेवक तेजस भांड आणि नरेंद्र पोटे यांनी जखमींवर तातडीने प्राथमिक उपचार केले.
जखमींना पुढील उपचारासाठी अहिल्यानगर येथे हलवले आहे. तसेच, या प्रकरणाची दखल घेत वनविभागाचे वनपाल आर. के. पवार, वनसंरक्षक राहुल सातपुते, बाळासाहेब डेंगळे आणि अरुण साळवे यांनी रुग्णालयात जाऊन जखमींची विचारपूस केली आणि घटनेचा पंचनामा केला.
उंबरी बाळापूर परिसरात बिबट्याचा हा वावर आणि मानवी वस्तीवर होणारे हल्ले आता चिंतेचा विषय बनले आहेत. याआधीही या परिसरात बिबट्याने अनेकदा पशुधनावर आणि माणसांवर हल्ले केले आहेत. वारंवार होणाऱ्या या हल्ल्यांमुळे ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण असून, वनविभागाने या बिबट्याचा त्वरित बंदोबस्त करावा आणि परिसरात पिंजरा लावून त्याला जेरबंद करावे, अशी आग्रही मागणी आता जोर धरू लागली आहे. या परिसरातील नागरिकांनी रात्रीच्या वेळी सतर्क राहावे, असे आवाहनही प्रशासनाकडून करण्यात आले आहे.

anantpangarkar
Annant Ppangarkar

Views: 1,271
बिबट्या हल्ला
Share. Facebook Twitter Pinterest WhatsApp
Annant Ppangarkar
  • Website

Related Posts

वय विसरले अन् झिंगाटवर थिरकले! ४० वर्षांनंतर भेटले सेवानिवृत्त शिक्षक मित्र; भंडारदऱ्यातील भाऊक ‘गेट-टुगेदर’ची खास बातमी

16/10/2026

“राजा किती क्रूर आणि खोटारडा आहे…” आई-बाळाची आर्त हाक अन् पोलिसांचा पाशवी हात; संजय राऊतांनी शेअर केलेल्या ‘त्या’ एका छायाचित्राने हादरवला महाराष्ट्र!

12/10/2026

MPSC आंदोलनाला डॉ. जयश्रीताई थोरात यांचा पाठिंबा; समाज आणि आयोगातील ब्लड कॅन्सर ठीक करायचाय!

10/10/2026
Leave A Reply Cancel Reply

Document
Our Picks
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
Advertisement 1 Advertisement 2 Advertisement 3 Advertisement 4
Don't Miss
Uncategorized

दसरा विशेष: संगमनेरच्या मालपाणी पार्कमध्ये होणाऱ्या ‘या’ खास सोहळ्याचे संपूर्ण वेळापत्रक आणि प्रमुख आकर्षणे एका क्लिकवर!

By Annant Ppangarkar16/10/20260

महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन- विजयादशमीच्या मंगलपर्वानिमित्त संगमनेरमधील अकोले रोडवरील मालपाणी इंडस्ट्रियल पार्कमध्ये मंगळवारी, (२० ऑक्टोंबर)…

२ वर्षे २ महिने तुरुंगवास अन् अखेर न्याय! पोक्सो खटल्यातून संगमनेरच्या तरुणाची सुटका; न्यायालयाचा ‘हा’ महत्त्वाचा निर्णय

16/10/2026

वय विसरले अन् झिंगाटवर थिरकले! ४० वर्षांनंतर भेटले सेवानिवृत्त शिक्षक मित्र; भंडारदऱ्यातील भाऊक ‘गेट-टुगेदर’ची खास बातमी

16/10/2026

आदिवासी बांधवांचा शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश! आमदार खताळ सोडविणार शिरसगाव धुप्याचा पाणी, रस्ते, वीज प्रश्न

16/10/2026
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow

तुमचे हक्काचे व्यासपीठ

Facebook YouTube
Our Picks
October 2026
M T W T F S S
 1234
567891011
12131415161718
19202122232425
262728293031  
« Sep    
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • पत्रकारिता
  • फोटो / गॅलरी
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
  • शेती व सहकार
  • सामाजिक
  • CONTACT US
  • ABOUT US
  • PRIVACY POLICY
© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.